कार खरेदीचा निर्णय? थांबा …. आधी हे वाचा – भाग २

Reading Time: 3 minutes

मागच्या भागात आपण पाहिलं, कार ही मानाची बाब, खूण मानणाऱ्या संदीपने कर्ज घेऊन चारचाकी ऐरावत घरी आणला. दररोज तो ऑफिसमध्ये डोळ्यांवर महागडा चष्मा आणि हाती कारचं सुकाणू फिरवत कार मिरवत जाऊ लागला.

आता बघूया अमितने काय केलं.

 • अमितच्या डोक्यात वेगळंच होतं. त्याने आपल्या स्मार्टफोनवर काही ‘ट्रान्सपोरटेशन प्स’  डाउनलोड करून, त्यांचा उपयोग तो करू लागला. दररोज प्रवास करणार असल्याने त्याला त्या वाहन कंपनीच्या प्सकडून वेगवेगळ्या ऑफर्सही मिळाल्या. त्याशिवाय कार शेअरिंगच्या पर्यायाचा वापरही तो अधूनमधून करू लागला. यामुळे त्याचा रोजच्या जाण्या येण्यावरचा खर्च थोडा कमी झाला. कॅबमध्येही काही शेअर कॅब्स मिळायच्या अमितने त्याचाही वापर सुरू केला.
 • रोजच्या सोबतीच्या प्रवासाने त्याच्या चांगल्या ओळखी झाल्या. ज्याचा उपयोग पुढे अनेक ठिकाणी त्याला झाला. अमित त्याला हवं तेव्हा वाहतूकीचा पर्याय बदलू शकत होता. कधी कॅब, कधी शेअर कॅब किंवा कार तर कधी ऑटो करू शकत होता.
 • अमितसुद्धा दर महिन्याला ६०० किमी प्रवास करतो. पण त्याने कार घेतली नसल्याने ती सांभाळण्याचा खर्चही त्याला नव्हता. त्याला कारचा इंश्युरन्स काढायचा नव्हता. टायर किती झिजले किंवा कसे आहेत याची काळजी नव्हती.
 • कार पार्किंग ही भारतातील एक सगळ्यात मोठी समस्या आहे. अमितला कार पार्किंगची काळजी नव्हती. तो सहजपणे, हवं तेव्हा आपल्या फोनवरून कॅब बुक करायचा आणि निवांतपणे बसून प्रवास करायचा, घरी यायचा. यामुळे अमितला २० रुपये पर किमी नुसार महिन्याला ६००× २० असे एकूण १२००० रुपये खर्च येऊ लागला.
 • त्यानेही पंधरा हजार वाहतुकीचा खर्च म्हणून वेगळे काढले होते. त्याचं ३००० सेविंग वाढलं आणि ते वाचलेले पैसे त्याने सिप (SIP) योजनेमध्ये गुंतवायला सुरवात केली.
 • अमितला याहून सगळ्यात मोठा फायदा हा झाला की त्याला स्वतःला कार ड्राईव्ह करायची नसल्याने तो फक्त मोबाईल प्सवरून हवं तेव्हा कॅब बुक करायचा आणि शांतपणे मागे बसून मोबाईलवर महत्त्वाचे कॉल करत, लॅपटॉपवर काम करत, वर्तमानपत्र वाचत, कधी गेम खेळत तर कधी निवांतपणे बसून गाणी ऐकत ऑफिसला जायचा. त्यामुळे तो कायम फ्रेश असायचा. संदीप मात्र घरून ऑफीसपर्यंत पोहचेपर्यंत स्वतः ड्राईव्ह करत असल्याने पूर्णपणे थकून जायचा.
 • अशाप्रकारे सात वर्षे गेली. संदीपची कार सात वर्षे जुनी झाली. ती कार अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पण सस्पेन्शन आणि इतर काही मेंटेनन्सचे त्रास सुरू झाले.
 • आता सात वर्षांनी ती कार संदीपला विकायची असल्यास त्याला ती अडीच लाखात विकता येईल. एकडे अमित मात्र दर महिन्याला ३००० रुपये वाचवत ते सिपमध्ये गुंतवत राहिला. सात वर्षांनी त्याला लक्षणीय परतावा मिळणार होता.
 • म्हणजे सात वर्षांनी संदीपने इतका त्रास सहन करत, दररोज थकून घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर करत प्रवास, गाडीचा मेंटेनन्स करत त्याच्याकडे शेवटी अडीच लाख मार्केट किंमत असलेली कार आहे. अमितकडे सात वर्षे निवांत राहून त्यापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक जमा आहे.

आता फायदा कोणाचा झाला?

 • फायदा कोणाचा झाला? हा पूर्णपणे व्यक्तिगत विचारांचा प्रश्न आहे.
 • भारतातील रस्ते हे योग्य प्रतीचे नाहीत. वाहतूक ही कधीही विस्कळित होत असते. अशावेळी पाऊस, पूर आला असता गाड्या पाण्यातून जात नाहीत. मग कित्येकदा आपली गाडी पाण्यात, रस्त्यात ठेऊन पायी जावं लागतं. मग गाडीची काळजी मनाला लागते. शेवटी ज्यांच्याकडे गाडी नाही ते रस्त्यावरून पायी चालत जातात आणिज्यांच्याकडे स्वतःची गाडी आहे तो ही रस्त्यावरून पायी चालत जातो. 
 • अमित आणि संदीपने याही गोष्टींचा अनुभव घेतला. त्यामुळे अमित आपल्या गाडी विकत न घेण्याच्या निर्णयावर खुश होता. अडचणींच्या वेळी संदीपला आपली गाडी घरी ठेऊन इतर पर्यायाने प्रवास करावा लागे.

पण दरवेळी काय अमितचाच फायदा झाला नाही.

 • काहीवेळा खेडेगावात किंवा शहराबाहेरच्या अशा ठिकणी अमित आणि संदीपला जावं लागत होतं जिथे कॅब्स जात नाहीत. मग अमितची पंचाईत व्हायची. कधीकधी पावसात अमितला गाडी मिळेपर्यंत किंवा न मिळाल्याने भिजावंही लागायचं. तर संदीप मात्र सहजपणे आपल्या कारने हवं तेव्हा कुठेही जाऊ शकायचा.

केशव हा तिसरा मित्र. त्याने एक वेगळा निर्णय घेतला. पुण्यातील पीएमटी बसेस तो घर ते ऑफिस ते घर वापरू लागला.

 • त्याचा रोजचा खर्च १०० रुपये असायचा. सुट्टीच्या दिवशी तो कॅब बुक करायचा आणि हवं तिथे फिरून यायचा. यामुळे त्याचा महिन्याचा खर्च फक्त अडीच ते तीन हजार होऊ लागला. त्यानेही पंधरा हजार वाहतुकीचा खर्च म्हणून काढून ठेवले होते. उरलेले बारा हजार त्यानेही दर महिन्याला ‘आरडी’मध्ये गुंतवले. अडीच वर्षांत त्याच्याकडे तीन ते साडेतीन लाख जमा झाले.
 • आता केशव निर्णय घेतला की  एक कमी खर्चाची तीन साडेतीन लाखांची एक कार घ्यावी. पण ती कर्जाच्या हप्त्यांवर न घेता सरळ पूर्ण पेमेंट करून घ्यावी. आणि क्वचित काही अडचणींच्यावेळी वापरावी. गरज म्हणून घ्यावी,  स्टेटस सिम्बॉल म्हणून नाही. केशवकडे सेविंग्समधून मिळालेले साडेतीन लाख होतेच.
 • म्हणजे अडीच वर्षांत केशवकडे एक साधी कमी किंमतीची कधीही अडचणीवेळी वापरायची कार घरी होती. एरवी तो सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होता. फक्त कार घेण्याचा निर्णय अडीच वर्षे लांबवून त्याच्याकडे पूर्ण पेमेंट केलेली एक लो कॉस्ट कार उपलब्ध होती.

आता अमित योग्य की संदीप की केशव हा वैयक्तिक प्रश्न, विचार आणि निर्णय आहे.

टीप:- भारतात वाहतुकीची समस्या खूप गंभीर आहे आणि ती वाढतच जाणार आहे. यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करायला हवाच. यामुळे इंधन बचतही होईल. कारला स्टेटस सिम्बल बनवणं चुकीचं आहे. ही मानसिकता आता संपायला हवी.

कार घेताय? थांबा… आधी हे वाचा भाग १,

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? पहिली बाजू,

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? दुसरी बाजू ,

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला info@arthasakshar.com वर संपर्क करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]