Candlestick Patterns: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी उपयुक्त असे महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न

Reading Time: 4 minutes

Candlestick Patterns

तांत्रिक विश्लेषणात महत्वाचा भाग म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न (Candlestick Patterns) होय. यामध्ये आपणास अनेकप्रकारचे पॅटर्न दिसून येतात. त्यापैकी काही अत्यंत महत्वाचे पॅटर्न आणि ट्रेडिंग व गुंतवणूक करताना त्याचा वापर कसा करावा व ते कसे उपयुक्त असतात याबद्दल माहिती घेऊया.

Candlestick Patterns: महत्वाचे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न

१. डोजी (Doji)

 • डोजी म्हणजे एखाद्या कॅडलमध्ये किमंत सुरु झाल्यापासून ती किमंत वर-खाली जाऊन पून्हा त्या ठिकाणी येऊन बंद होते. 
 • या कॅन्डलमध्ये ओपन् व क्लोज प्राईज सारखी असते. तसेच खरेदी व विक्री करणारे सारखे असतात.
 • या कॅन्डलला बॉडी नसते. त्यामुळे ही कॅन्डल बाजारातील अनिश्चतता दर्शिविते. 
 • अनेकदा डोजी ट्रेंड रेव्हर्सलचा संकेत देतात. जर शेअर मध्ये डाऊन ट्रेंड सुरु असेल आणि बॉटमला डोजी तयार झाली, तर आपण अंदाज करू शकतो की शेअर मध्ये तेजी येऊ शकते. याउलट जर शेअरमध्ये अप ट्रेंड सुरु असेल आणि टॉप वर डोजी तयार झाली, तर  ट्रेंड रिव्हर्सलचे संकेत मिळतात. 
 • साईड वेज बाजारात डोजी निश्चितपणे संकेत देत नाही.  

या डोजी आपणास अनेक वेगवेगळया प्रकारे दिसून येतात.  

 • ड्रॅगनफ्लाय डोजी (Dragonfly doji): या डोजीचा आकार लहान उडणाऱ्या किड्यासारखा असतो. 
 • ग्रेवस्टोन डोजी (Gravestone doji): याचा आकार हा कबर मधील उभ्या दगडासारखा असतो. 
 • लॉन्ग लेड डोजी (Long led doji): या डोजीचा आकार म्हणजे कॅन्डलच्या खाली- वर उंच पायासारख्या ‘शॅडो’ असतात. 

२. हॅमर (Hammer) 

 • हॅमरचा आकार हा हातोडी सारखा दिसतो. जसा वरील लोखंडी भाग व खाली लाकडाचा लांब दांड्यासारखा दिसतो हॅमरमध्ये लहान बॉडी असते ती बुलिश व बेरीश असू शकते. 
 • यात किमंत ओपन झाल्यापासून सेलर त्याच्या किमतीस खाली आणतात, पण बायर किमंत पुन्हा वर घेऊन जातात.  
 • या पॅटर्नमध्ये ‘ओपन किमंत’ हिच त्या कॅन्डलचा‘हाय’ असते. जर शेअरमध्ये सततच्या मंदीनंतर बॉटमला हॅमर तयार झाला, तर शेअरमध्ये तेजीचे संकेत मिळतात.
 • हॅमरमध्ये आपणास इन्व्हर्टेड हॅमर हा बुलिश् प्रकार दिसून येतो. कॅन्डलस्टिक पॅटर्नचा हॅमरच्या उलटा दिसतो. 

३. शूटिंग स्टार (Shooting star)

 • शुटिंग स्टार हे नाव तुटत्या ताऱ्यावरून जपान मधील ट्रेडर यांनी ठेवले आहे. ह्या कॅन्डलची बॉडी लहान असून शॅडो खूप लांब असते.
 • हा पॅटर्न खूप तेजी त्या दिवशी दाखवून ज्या ठिकाणी शेअरची किंमत सुरु झालेली असते त्या ठिकाणी किंवा त्या किंमतीच्या आसपास बंद करतो. 
 • हा चार्टच्या नेहमी टॉपवर तयार होऊन तेजीचा ट्रेंड बंद करून मंदी प्रदर्शित करतो मग चार्टमध्ये बेरीश कॅन्डल असो की बुलिश, तेजी समाप्त झाली असून आता मंदी चालू होणार असे संकेत देतो. 
 • जर शेअरमध्ये सतत तेजी असेल आणि टॉपवर शूटिंग चार्ट पॅटर्न तयार झाला तर, अनेकदा त्या शेअरमध्ये मंदी येणार असल्याचे दिसून येते.

४. हँगिंग मेन ((Hanging man)

 • हँगिंग मेन हा बुलिश कॅण्डेलास्टिक पॅटर्नमधील अत्यंत महत्वाचा पॅटर्न आहे. 
 • हा आकारने फासावर चढावलेल्या माणसा सारखा असतो.
 • त्याची शाडो त्याच्या बॉडीपेक्षा दुप्पट किंवा लांब असते. हा नेहमी शेअरच्या तेजीत टॉप वर बनून, शेअरमध्ये तेजी समाप्त होणार व मंदी चालू होणार हे प्रदर्शित करतो.
 • यात कॅन्डल बेरीश असो की बुलिश, हा पॅटर्न मंदीदर्शक आहे. जर कॅन्डल लाल असेल तर अनेकदा खूप मोठी मंदी पहायला मिळते.

५. मारुबोझु (Marubozu)

 • मारुबोझू हा अत्यंत महत्वचा पॅटर्न आहे. याचा अर्थ टक्कल पडलेला असा होतो. 
 • या कॅन्डलला कोणतीही शॅडो वर-खाली नसते. 
 • या कॅन्डल आपणास दोन प्रकारे दिसून येतात.
 • बुलिश मारुबोझू ओपन प्राईज हिच लो प्राईज असून, हाय प्राईज ही क्लोज झालेली प्राईज असते, तर बेरीश मारुबोझू कॅन्डलमध्ये ओपन प्राईज ही कॅन्डलची हाय प्राईज असते, तर क्लोज प्राईज ही लो प्राईज असते.
 • जेव्हा शेअरमध्ये बुलिश कॅन्डल तयार होते तेव्हा पुढे आपणास खूप तेजी पाहायला मिळते व बेरीश कॅन्डल तयार झाल्यास मंदी दिसून येते.

६. मॉर्निंग स्टार व इव्हिनिंग स्टार (Morning star & Evening star)

 • मॉर्निंग स्टार हे नाव उगवत्या ताऱ्यावरून ठेवले आहे. शेअर मध्ये खूप दिवसाच्या मंदीनंतर याचा उदय होतो.
 • हा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असून जेव्हा तयार होतो तेव्हा शेअरमध्ये खूप मोठी तेजी पाहायला मिळते.
 • हा पॅटर्न चित्रात दाखवल्या प्रमाणे तीन कॅन्डलने तयार होतो.
 • इव्हिनिंग स्टार हा पॅटर्न मॉर्निंग स्टारच्या उलट असतो. मावळत्या ताऱ्यावरून हे नाव ठेवले आहे.
 • खूप दिवसाच्या तेजीनंतर शेअर मध्ये मंदी येणार, असे हा पॅटर्न प्रदर्शीत करतो.

अशाप्रकारे शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग व गुंतवणूक करताना कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करून काम केले तर आपणास शेअर खरेदी विक्री करण्याची योग्य वेळ समजते. शेअरचा बॉटम टॉप समजेल. माझ्या अभ्यासानुसार मूलभूत विश्लेषण आपणास योग्य शेअर कोणता हे दाखवतो, पण योग्य शेअर योग्य किमतीस कधी खरेदी करावा हे तांत्रिक विश्लेषण  सांगते. त्यामुळे कॅन्डलस्टिक पॅटर्न हा ट्रेडिंगचा आत्मा आहे. 

– शरद गोडांबे

९६५७९८०३०९

sharadgodambe92@gmail.com 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.