अर्थसाक्षर कार लोन रिपेमेंट
https://bit.ly/3eSnnpC
Reading Time: 2 minutes

कार लोन रिपेमेंट केल्यावर या गोष्टी विसरू नका !

लोन रिपेमेंट म्हणजेच कर्जाची परतफेड झाल्यावर प्रत्येकाला आनंद होतो. खास करून हे कर्ज जेव्हा होम लोन किंवा कार लोन असते तेव्हा रिपेमेंटचा क्षण नेहमीच उत्साही असतो. पण या उत्साहाच्या भरात झालेली एखादी चूक देखील तुमच्या आनंदावर विरजण घालू शकते. 

आपल्या मालकीची कार असावी, हे तर प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचे स्वप्न असते. त्यासाठी बहुतांशी व्यक्ती कार लोन घेऊन हे स्वप्न पूर्ण करतात. विहित काळात त्याचे सारे हफ्तेही आपण चुकवतो. कार लोनचा शेवटचा हप्ता भरून पूर्ण कर्ज फेडल्याचा आनंद नक्कीच खूप मोठा असतो. पण त्या आनंदामध्ये हे विसरून चालणार नाही, की कार लोन फिटले म्हणजे तुमचे काम संपले, असे होत नाही. 

कार घेताय? थांबा… आधी हे वाचा

कार लोन पूर्ण फेडल्यावर, कायदेशीररित्या तुमच्या गाडीचा मालकी हक्क तुम्हाला तुमच्याकडे घेण्यासाठी काही महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. या कागदपत्रांबद्दल आणि ती कशी मिळवायची याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

१. कार लोनच्या शेवटच्या हप्त्याची पावती:

  • तुमच्या ‘कार लोन’चे रिपेमेंट करताना  एकत्र तुम्ही हप्ते भरून अथवा लोन संपायच्या वेळेआधी उरलेली रक्कम एकदम भरून करता.
  • कार लोन फेडल्यावर  शेवटच्या पावतीमध्ये बँकेमध्येभरलेली एकूण रक्कम, कर्ज फेडल्याची शेवटची तारीख आणि कार लोन पूर्ण फिटल्याची नोंद, इत्यादी सविस्तर माहिती असते.
  • ही पावती न विसरता संबंधित बँक अथवा संस्थेकडून घ्यावी.

२. कार लोनच्या खात्याचे स्टेटमेंट: 

  • कार लोन फिटल्यानंतर तुमच्या खात्याचे संपूर्ण स्टेटमेंट घेणे अत्यावश्यक आहे.
  • या स्टेटमेंटमध्ये तुम्ही सुरुवातीपासून कशा प्रकारे पैसे भरले आहेत याची सविस्तर नोंद असते.
  • भविष्यातील संदर्भांच्या दृष्टिकोनातून हे स्टेटमेंट जतन करून ठेवणे महत्वाचे आहे.

कार खरेदीचा निर्णय? थांबा …. आधी हे वाचा – भाग २

३. लोन क्लोजर/नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र:  

  • कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर २ ते ३ आठवड्यामध्ये संबंधित बँक अथवा संस्थेकडून तुम्हांला काही महत्वाची कागदपत्रे येणे अपेक्षित असते. सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे लोन क्लोजर किंवा नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र. 
  • यामध्ये असे सांगितलेले असते की आता तुमची काहीही रक्कम फेडणे बाकी नाही. हे लोन क्लोजर किंवा नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्राची एक प्रत आरटीओ  ऑफिसला आणि एक प्रत इन्शुरन्स कंपनीला पाठवली जाते. 
  • यासोबतच फॉर्म ३५ पाठवला जातो. हा फॉर्म तुमच्या गाडीच्या आर.सी बुकवरून तुमच्यातील आणि संबंधित बँक / संस्थेमधील हायपोथिकेशन व्यवहार रद्द करण्यासाठी आरटीओ ऑफिसला सादर करायचा असतो. 
  • यासोबतच तुम्ही कर्ज घेतेवेळी सादर केलेली सर्व कागदपत्रेही बँकेला तुम्हांला परत द्यावी लागतात.
  • ही सर्व कागदपत्रे २ ते ३ आठवड्यात तुम्हाला न मिळाल्यास त्यासंदर्भात संबंधित बँक / संस्थेकडे चौकशी करून कागदपत्रे  मिळवावी.

४. इन्शुरन्स पॉलिसी अपडेट करून घेणे: 

  • कार लोन संपुष्टात आल्यावर संबंधित बँक/संस्थेकडून जे लोन क्लोजर/नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र मिळते ते तीन महिन्यांपर्यंतच व्हॅलिड असते. 
  • ते मिळाल्यावर लगेच इन्शुरन्स कंपनीला सादर करून तुमच्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी अपडेट करून घ्यावी लागते.
  • ही अपडेट केलेली पॉलिसी हायपोथिकेशन रद्द करून घेण्यासाठी आरटीओ ऑफिसला सादर करावी लागते. 

वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

५. हायपोथिकेशन रद्द करून घेणे: 

  • लोन क्लोजर/नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र मिळालेल्या तारखेपासून तीन महिन्यांसाठीच व्हॅलिड असते तोपर्यंतच वर सांगितलेला फॉर्म ३५, अपडेटेड इन्शुरन्स पॉलिसी आणि इतर आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुमचा रहिवासी पुरावा (address proof), इत्यादी आरटीओला सादर करून तुमच्या गाडीचे आर.सी. (RC) अपडेट करून घ्यावे लागते व गाडी पूर्णपणे तुमच्या नावावर करून घ्यावी लागते. 
  • हे झाल्याशिवाय तुम्ही गाडी संदर्भात कोणतेही व्यवहार उदा. गाडीची विक्री, इ. करू शकत नाही. तुम्हालाआरटीओ ऑफिस कडून एक पावती दिली जाते ती तुम्ही अपडेटेड आर.सी. बुक मिळेपर्यंत आर.सी. (RC) म्हणून वापरू/दाखवू शकता.

६. क्रेडिट ब्युरोमध्ये कर्ज परतफेडीची नोंद करून घेणे: 

  • तुमचे कोणतेही कर्ज मजूर झाल्यावर त्वरित बँक क्रेडिट ब्युरोमध्ये याची नोंद करून घेते, पण कर्जाची परतफेड झाल्यावर तितक्याच तातडीने बँक याची माहिती क्रेडिट ब्युरोला कळवेलच असे नाही. 
  • बँकेने त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये जर सदर नोंद अपडेट करून घेतली नाही, तर संबंधित क्रेडिट ब्युरोच्या वेबसाईटवर तुमच्या कर्जाचे स्टेटस अपडेट करण्यासाठी ऑनलाईन विनंती करू शकता.

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Car loan Repayment Marathi Mahiti, Car Loan Repayment kase karal? Car Loan Repayment in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…