पैशाचं पुनरावलोकन करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 4 minutesवाढती महागाई आणि पगार यांच योग्य संतुलन असणं बदलत्या काळाची गरज आहे.म्हणूनच पैशाचंही रोज पुनरावलोकन करणं महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी ‘गुगल ॲनेलिटिक्स’चा वापर करू शकता. रोजचा खर्च आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन मॅट्रिक्स द्वारे करता येते. पैशाचं पुनरावलोकन करण्याची एक पद्धत आहे. ज्यात प्रत्येक दैनंदिन खर्चाचा किंवा बचतीचा मागोवा घेता येतो. 

क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

Reading Time: 3 minutesनवीन वर्षांचे स्वागत, विविध सणवार, स्वातंत्र्य दिन, व्हॅलेन्टाईन डे, या वर्षातील मेगा ऑफर, सुपर बंपर ऑफर अशी विविध कारणे देऊन  क्रेडिट कार्ड देत असलेली कंपनी (बँक/ वित्तीय संस्था) आपल्या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देत असतात. ही रक्कम आपल्या खरेदीच्या बिलातून थेट कमी होते अथवा पूर्ण बिल केल्यानंतर खात्यात वेगळी परत येते. बोनस पॉईंट व्यतिरिक्त अशी संधी मिळत असल्याने, अशा आशयाची सूचना आली की ग्राहक मनातून सुखावतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊयात असा संकल्प सोडतो. कोणतीही गोष्ट मोफत मिळते आहे, याचे सर्वाना आकर्षण असल्याने त्याला आनंद होतो. लोकांच्या याच मनोवृत्तीचा लाभ उठवण्यात येतो. वास्तविक कोणतीही गोष्ट आपल्याला कधीच फुकट मिळत नसते.

Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutesभारत हा विकसनशील देश असला तरी नक्कीच प्रगतीपथावर आहे यात शंकाच नाही. अलिकडच्या काळात स्वत:च असं काहीतरी चालू कराव यासाठी तरूण वर्गामध्ये चढाओढ असते. अर्थातच ९ ते ७ च्या नोकरीच्या फंद्यात अडकण्यापेक्षा स्वत: स्टार्टअपचा विचार करत असतील, तर निश्चित चांगली गोष्ट आहे. सुरूवातीला आपण ‘स्टार्टअप’ म्हणजे काय ते जाणून घेऊ. मागच्या भागात आपण स्टार्ट अप फंडिंग आणि त्याच्या ३ पर्यायांची माहिती घेतली या भागात आपण उर्वरित ३ फंडिंग पर्यायांची माहिती घेऊया. 

वर्षअखेर विशेष – मी पुन्हा येईन…

Reading Time: 3 minutes२०१९ या वर्षात सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेले वाक्य! प्रत्येक मराठी जाणणाऱ्या व्यक्तीने एकदा का होईना समाज माध्यमावर हे वाक्य नक्कीच ट्रोल केले असेल. मी लिहितांना त्याचा अभिप्रेत आर्थिक बाबींशी जोडतोय. उगाच अर्थाचा अन्वयार्थ निघायला नको म्हणून आधीच नमूद केले. बाजारात चक्राकार पद्धतीने येणारी तेजी किंवा मंदी असेल, दुसऱ्याचा परतावा पाहून गुंतवणूक सुरु करणारे आणि थांबविणारे गुंतवणूकदार असतील तसेच कालचा भूतकाळ, आजचा वर्तमानकाळ आणि उदयाचा भविष्यकाळ सुद्धा हेच म्हणेल, मी पुन्हा येईन!

Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutesसध्या युवावर्गाला ९ ते ७ च्या नोकरी करण्यापेक्षा स्टार्टअपचे आकर्षण वाटते. पण अनेकदा कितीही चांगली योजना तयार असली प्रश्न असतो तो स्टार्टअप फंडींगचा (Startup Funding). आजच्या लेखात आपण स्टार्टअप आणि स्टार्टअप फंडिंगबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

हीच ती वेळ आर्थिक नियोजनाची …

Reading Time: 3 minutesएक नवीन वर्ष नव्या स्वप्नांसह आणि नव्या आव्हानांसह तुमची वाट बघत आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, आपल्या गेल्या वर्षाच्या आर्थिक नियोजनाचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. हे फार मोठं काम नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल, तर आपला वर्तमान समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवीन आर्थिक नियोजनासाठी आपली चालू आर्थिक स्थिती व त्याचे मुल्याकंन करणे आवश्यक आहे. आपली आर्थिक स्थिती जाणून घ्यायची सर्वात योग्य वेळ म्हणजे वर्षअखेर! 

भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutesप्रत्येकाला आयुष्यात आता पुढे काय करायच? या प्रश्नाला सामोरे जावे लागतो. करिअर मार्गदर्शन या नावाखाली होणारे अनेक कार्यक्रम  संभ्रम अजुनच वाढतात. सध्या“पारंपरिक प्रसिद्ध” पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.  या लेखमालेचा हा दुसरा व अंतिम भाग

कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत – कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम

Reading Time: 4 minutesकार्डवर वाय फाय सारखे चिन्ह असेल, तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो.  या संदर्भात माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच. सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर समस्या आणि त्यावरील उपाय

Reading Time: 4 minutesअनेकदा पालकांना स्वत:च्या मुलांवर पोलीस केस करण्याची सुद्धा वेळ येते. म्हातारपणी जवळ साठवलेली पुंजी पोटच्या पोरांनी हडप करून राहायला जागा सुद्धा न देणे हे पाहणे आणि सोसणे तितकेच वेदनादायक ठरते शिवाय मुलांविरुद्ध लढण्याचा स्टॅमिना आणि इच्छा दोन्हीही उरलेली नसते. अनेक असे दुर्दैवी पालक आपण हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगताना पाहतो. भारतीय राज्यघटनेची जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या तत्वांतर्गत राज्याने वायोवृद्ध नागरिकांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या हक्काचे संरक्षण केले पाहिजे, त्यांचे सामाजिक अधिकार कसे सुरक्षित राखता येतील, यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले आहे. यासंदर्भात काही कायदे देखील केंद्र सरकारने पारित केलेले आहेत. आता ते कायदे पाहण्याच्या पूर्वी आपण काही मुलभूत गोष्टी पाहू.

शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या पुढे का पळतो आहे?

Reading Time: 4 minutesभारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवीत आहेत तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे?