Reading Time: 3 minutes

२०१९ या वर्षात सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेले वाक्य! प्रत्येक मराठी जाणणाऱ्या व्यक्तीने एकदा का होईना समाज माध्यमावर हे वाक्य नक्कीच ट्रोल केले असेल. मी लिहितांना त्याचा अभिप्रेत आर्थिक बाबींशी जोडतोय. उगाच अर्थाचा अन्वयार्थ निघायला नको म्हणून आधीच नमूद केले. 

बाजारात चक्राकार पद्धतीने येणारी तेजी किंवा मंदी असेल, दुसऱ्याचा परतावा पाहून गुंतवणूक सुरु करणारे आणि थांबविणारे गुंतवणूकदार असतील तसेच कालचा भूतकाळ, आजचा वर्तमानकाळ आणि उदयाचा भविष्यकाळ सुद्धा हेच म्हणेल, मी पुन्हा येईन!

गुंतवणूक – कला का शास्त्र?

एप्रिलमधे सुरु झालेला लेख प्रपंच वर्षाखेरीस सजग वाचकांच्या प्रतिसादामुळे सलग १९ व्या लेखापर्यंत येऊन पोहचला, यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. या गुंतवणूक साक्षरता अभियानातून एक जरी वाचक अर्थसाक्षरतेच्या मार्गाने जाण्यास सक्षम झाला असेल तर त्यापेक्षा दुसरा नैतिक आनंद नसेल. संपूर्ण महाराष्ट्रात किमान २० शहरांत वाचकरूपी नविन मित्र जोडले गेले, हे ही नसे थोडके. 

२०१९ साल संपतांना खूप साऱ्या घटना आठवणीत ठेवून जाणार आहे- 

– रिझर्व्ह बँकेने सलग ५ वेळा केलेली दर कपात, 

– गुंतवणूकदारांच्या पदरात नफा न टाकताच शेअर बाजाराने गाठलेला उच्चांक, 

– कांद्याने केलेला महागाईचा वांदा, 

– विमा नियंत्रकांनी विम्याच्या हफ्त्यात केलेली वाढ, 

– बँकांचे विलिनीकरण, 

– आर्थिक मंदीची चाहूल, 

– केंद्रातल्या व राज्यातल्या निवडणूका, नागरिकत्व कायद्यात येऊ घातलेली दुरुस्ती.

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

  • संपत्ती निर्माणासाठी गुंतवणूक करणे अनिवार्य असते. परंतु गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचे अभ्यासक त्यांचे निरीक्षण नोंदवितांना नमूद करतात की, “गुंतवणूक ही कायमच वैकल्पिक ठेवली जाते.” याच विषयाची चर्चा विविध मार्गाने गेल्या ९ महिन्यात करण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देखील भरपूर मिळाले. त्यातून प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे गुंतवणूक सुरु करण्यापूर्वीच परताव्याबाबत असणारी अवास्तव अपेक्षा. 
  • आर्थिक सल्ला मागतांना आभासी सल्ल्याची अपेक्षा ठेवत असेल, तर तुम्हाला “विक्रेत्याची” गरज आहे, “सल्लागाराची” नाही.
  • गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून नवीन ४ लाख कोटी रुपये बाजारात गुंतविले गेले. त्यामुळे गुंतवणूकीचा टप्पा २७ लाख कोटींच्या पल्याड जाऊन पोहचला. परंतु काही गुंतवणूकदार भिती व्यक्त करतात की एवढया मोठया प्रमाणात जर बाजारात गुंतवणूक येत असेल, तर परतावा मिळेल का? 
  • जगाचा भौगोलिक आकार जरी स्थिर असला तरी लोकसंख्या वाढत आहे. म्हणजेच परिणामी मागणी वाढतच जाणार आहे. मग अशी शंका उपस्थित करणे म्हणजे आपल्या आजूबाजूला लक्ष न देण्यासारखे आहे. तुम्हाला या वर्षभरात किती लग्नांचे निमंत्रण होते? एकदा तपासून पहा.

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

  • भारतातील स्मार्ट फोन वापरकर्ते प्रति वर्ष प्रति माणशी सरासरी १८०० तास स्क्रीनवर असतात. म्हणजे रोज अंदाजे ५ तास आपण ऑनलाईन आहोत. यात वेळेचा सदुपयोग किती? हा वादाचा मुद्दा होईल. 
  • गेल्या वर्षभरात राजकीय विषयांवर जेवढी चर्चा समाजमाध्यमांवर झाली त्याच्या १% देखील चर्चा गुंतवणूक या विषयावर झाली नाही. मानवी स्वभावानुसार माणूस गुंतवणुकीची पद्धत समजावून घेण्यापेक्षा परताव्याकडे आकर्षित होतो. म्हणूनच १३० कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ ८.५ कोटी म्युच्युअल फंड खाती आहेत. 
  • एक वाचक नाताळाची सुट्टी घालवायला कोकणात सहकुटुंब गेले आहेत. तिकडे गेल्यावर त्यांना या आर्थिक वर्षात साधारण २२,००० कर भरावा लागणार आहे याची आठवण झाली. त्यांनी तिथून फोन करून विचारले, मला कर वाचविण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? म्हणजे आपण सुट्टीचा आनंद घ्यायचा तेव्हा पैशांचा विचार करतो. मग पैसे कमविण्यासाठी काम करतो तेव्हा काय करत असतो? 
  • उसना मिळालेला जीव सांभाळण्यासाठी किंवा वाचविण्यासाठी आपण निष्णात डॉक्टर्स शोधून त्यांची भरमसाठ फी देण्याची तयारी ठेवतो. मग कष्ट करून कमविलेल्या पैशांच्या नियोजनासाठी “मोफत सल्ला” का शोधत असतो? 
  • पैसा गुंतविणे म्हणजे मुदत ठेव, पोस्टाच्या योजना, विमा योजना किंवा जमीन व सोने यापलीकडे काही असते याची माहिती असून देखील आपली सशुल्क सल्ला घेण्याची मानसिकता अजून तयार झाली नाही.
  • एका व्यापारी माणसाने पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी म्हणून फी देऊन नियोजन तयार करून घेतले. दहा वर्षांच्या कालावधीत महिना काही हजार रुपये नियोजनबद्धरीत्या गुंतवून अंदाजे २५ लाखांची पुंजी तयार करायची होती. पण मधेच कुठली तरी योजना ज्यात आजन्म खात्रीशीर पेन्शन मिळणार अशी जाहिरात बघितली आणि त्यांनी एकरकमी १० लाखांची गुंतवणूक केली. मला आश्चर्य याचे वाटले की त्यांनी त्यांच्याच व्यापारात जरी एवढी मोठी रक्कम गुंतविली असती तरी त्यांना वार्षिक १२% नफा सहज मिळाला असता. परंतु त्यांनी वार्षिक ६% निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी १० लाखांची रक्कम कायमस्वरूपी गुंतविली. याला काय म्हणायचे?

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

  • नुकत्याच वाचनात आलेल्या सरकारी राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या १० वर्षांच्या कालावधीत खासगी शैक्षणिक संस्थांच्या शुल्कात ११ पट वाढ झाली आहे. त्यामुळे मला श्रीमंत व्हायचंय…. हे दिवास्वप्न राहण्याची शक्यता अधिक आहे. 
  • ऑनलाईनच्या जमान्यात आपण औषधांपासून सगळ्याच गोष्टी एका क्लिकवर मागवू शकतो. तुमच्या पाल्यांना डॉक्टर, इंजिनियर बनविण्यासाठी एवढा पैसा का खर्च करताय? कारण तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी मोबाईल किंवा संगणकावर नियंत्रित करायच्या आहेत.  मग तुमच्या पाल्यांना काम कोण देणार? डॉक्टर झाल्यावर त्यांच्याकडे सल्ला घ्यायला कोण येणार? तंत्रज्ञान नक्कीच विकसित झालं पाहिजे. त्याचा वापर तुलना करण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी व साठविण्यासाठी, मनोरंजनासाठी इतपत ठीक आहे. परंतु उपकरणं जर तुमचे साथीदार होणार असतील तर आयुष्य नक्कीच निरस होईल.

प्रत्येकाला यश, आनंद, समारंभ किंवा उत्सव साजरे करण्यासाठी आपलं कुणीतरी सोबत असावं असं नक्कीच वाटत असतं. का? कारण माझी प्रगती पहावी, कौतुक करावं आणि शाबासकीची थाप दयावी म्हणून. 

येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला अशाच व्यक्तींचा सहवास आणि आर्थिक आघाडीवर संपन्नता प्राप्त होऊ देत, या शुभेच्छांसह मी आश्वासन नव्हे, तर वचन देतो, मी पुन्हा येईन!

मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

– अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

9423187598

[email protected]

(लेखक सशुल्क “जोखीमांक चाचणी” करून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुचवितात.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.