‘आरबिआय’च्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutes सध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा ऑनलाईन व्यवहारांनाच ग्राहक जास्त पसंती देत आहेत. रोख रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा कार्ड पेमेंट व वॉलेट पेमेंटला पसंती दिली जात आहे. पण “सोय तितकी गैरसोय” या म्हणीनुसार काही वेळा ‘Transaction failed” हा मेसेज समोर दिसल्यावर अनेकांचा हिरमोड होतो. एकीकडे खात्यातून पैसे डेबिट झालेले असतात पण लाभार्थीच्या खात्यात मात्र जमा होत नाहीत.  अशा प्रसंगी मग नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. 

आधार- पॅन लिंकींगला मुदतवाढ, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग? 

Reading Time: 2 minutes “पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी” म्हणजेच  आधार – पॅन लिंकिंग ही केंद्रासारकरच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८.४७ कोटी नोंदणीकृत पॅन कार्ड धारकांपैकी केवळ ६.७७ कोटी धारकांनी पॅन क्रमांक आधारशी जोडला आहे. यापूर्वी मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार -पॅन लिंक केलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, यासाठीची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

कशी आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (Gift City)?

Reading Time: 3 minutes साबरमती नदीच्या काठावर गांधीनगर येथे ‘गिफ्ट सिटी’ हा गुजरात सरकारने सहकार्यातून निर्मिती केलेला व्यापारी जिल्हा आहे. अशा प्रकारे अस्तित्वात आलेले आणि अद्यायावत शहर (Smart City) योजनेअंतर्गत ८८६ एकर जमिनीवर विकसित करण्यात आलेले, भविष्यातील मोठे होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आहे. 

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, तुम्ही काय कराल?

Reading Time: 2 minutes आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी बातमी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर आजपासून म्हणजेच २३ सप्टेंबर २०१९ पासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले आहेत. आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ कलम ३५/ए (१) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सदर निर्बंध घातले आहेत. 

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

To do list: कशी तयार कराल प्राधान्य यादी?

Reading Time: 3 minutes शाळा, महाविद्यालय, नोकरी, निवृत्ती अगदी घरात असणाऱ्या व्यक्तींनीही स्वतःच्या कामाची आखणी करायला हवी. आतापर्यंत सवय लागली नाही, काही हरकत नाही. आता तुम्ही हे करूच शकता. तुम्हाला करायचं एकच आहे, आपल्या कामाची यादी बनवायची आहे. कोणत्या कामाला किती वेळ लागू शकतो? किती वेळेच्या आत हे काम व्हायला हवं? कोणते काम अधिक महत्वाचे आहे?अशा प्रश्नाची उत्तरे शोधून आपल्या कामांचा अग्रक्रम ठरवा. आपली प्राधान्य यादी डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास तुमच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. 

One Person Company: सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी

Reading Time: 3 minutes खाजगी मर्यादित कंपनी स्थापन करण्यास किमान दोन व्यक्तींची गरज असते. यासाठी व्यवसायात आपल्या मनाप्रमाणे भागीदार मिळणे हे सुयोग्य जीवनसाथी मिळण्याएवढे कठीण आहे. एकल कंपनीचे स्वतंत्र आणि कायदेशीर अस्तित्व मान्य  केल्याने त्यानुसार उपलब्ध सोई सवलती यांचा लाभ घेता येतो. व्यवसायवृद्धीकरिता याचा फायदा होतो. कराचा बोजा कमी होतो.

आयफोन ११ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes स्मार्टफोनने आयुष्यात अनेक बदल घडवले. आजपर्यंत अनेक कंपन्या ‘मोस्ट सेलिंग स्मार्टफोन’च्या स्पर्धेत आल्या आणि गेल्या. पण या साऱ्या गदारोळात एक कंपनी आपले अव्वल स्थान टिकवून आहे. ती कुठली हे तुम्ही ओळखलंच असेल. बरोबर! ती कंपनी आहे “ॲपल आयफोन(Apple iPhone )”! भारतीय शेअर बाजारात नोंदल्या गेलेल्या सर्व कंपन्यांचे मिळून जे काही “मार्केट कॅपिटल” असेल त्याच्या जवळपास निम्मं व्हॅल्यूएशन म्हणजे तब्बल ७२ लाख कोटी रुपये म्हणजे १ ट्रिलीयन डॉलर्स इतके एकट्या ॲपलचे आहे. सध्या चर्चा आहे ती ॲपल कंपनीने नव्याने लॉंच केलेल्या आयफोन ११ सीरिजची.

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

Reading Time: 2 minutes विना भांडवल व्यवसायाचे असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. परंतु अनेक वेळा हे काय करायचं? असं म्हणून या छोट्या पण चांगला नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांकडे दुर्लक्ष करतो. मॅक्डोनल्ड, पिझ्झा हट, डॉमिनोज यासारख्या फूड चेन किंवा मॉन्जिनीजसारख्या केक शॉपनी आज भारतातल्या छोट्या शहरातही आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. फिटनेस, न्यूट्रिशन या क्षेत्रांतील व्यक्तींना मोठमोठे सेलिब्रिटी विशेष मान देतात. ऋजुता दिवेकर यांनी याच क्षेत्रात काम करून स्वतःचं करिअर घडवलं आहे. “कुठलंही काम सोपं नसतं आणि कमीपणाचंही नसतं.” जेव्हा ही गोष्ट तुम्हाला पटेल तेव्हा तुमच्या व्यावसायिक होण्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु होईल.