असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण व्हॅलेंटाईन डे

Reading Time: 3 minutes

प्रेमाचा गुलाबी रंग ओसरल्यावर वास्तवाचा पांढरा शुभ्र कोरा कॅनव्हास समोर दिसू लागतो. या शुभ्र कॅनव्हासवर रेखाटण्यासाठी तुमच्या नात्याचं सुंदर चित्र तयार असू द्या. तुमच्या नात्याला सुंदर बनविण्यासाठी यावर्षी एक वेगळा विचार करा. तो म्हणजे “इकॉनॉमी व्हॅलेंटाईन डे”!

डेटिंग आणि बजेटिंग :

http://bit.ly/39rFssj
 • तुमच्या डेटिंगच्या  तारखा निश्चित असोत व नसोत, तुमच्या आर्थिक नियोजनाच्या आणि त्याच्या रिव्ह्यूच्या तारखा मात्र नक्की  निश्चित करा. कारण यावरूनच तुम्हाला तुमच्या डेटिंगचे बजेट ठरवायचे आहे. 
 • तुम्ही जर तुमच्या नात्याचा गांभीर्याने विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. कारण तुमच्या नात्याला पूर्णत्व देण्यासाठी आणि तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सगळे “भाव” समजून घेणं आवश्यक आहे. 
 • तुमचे खर्च व बचत यासोबत तुम्ही गुंतवणुकीचा विचार कारणंही आवश्यक आहे. तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर त्यासोबत फर्निचर, इलेक्टोनिक अप्लायन्सेस, इत्यादी वस्तूंच्या खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. 

डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

तू तू मैं मैं : 

 • तू तू मैं मैं हा प्रत्येक नात्याचा एक अविभाज्य भाग असतो. थोडीशी तू तू मैं मैं तर नात्यामध्ये गोडवा आणते. पण तरीही तुझं, माझं आणि आपलं काय हे निश्चित करण्याइतपत नात्यामध्ये पारदर्शीपणा असणे आवश्यक आहे. 
 • डेटिंगवर होणारा वारेमाप खर्च अधूनमधून शेअर करण्याइतपत म्हणजे सध्याच्या भाषेत TTMM करण्याचा समंजसपणा तुमच्याकडे व तुमच्या जोडीदाराकडे असणे आवश्यक आहे.  
 • तसंच जर तुम्ही तुमच्या नात्याला विवाह बंधनात बांधणार असाल तर, मोकळेपणा, स्पष्टपणा आणि पारदर्शीपणा आल्यावर तुम्ही विवाहपूर्व आर्थिक नियोजनाची तयारी करू शकाल. 

“व्हॅलेन्टाईन डे”नंतरचे आर्थिक नियोजन 

गिफ्ट की गिफ्ट व्हाउचर?

 • सरर्प्राइज गिफ्ट कोणाला आवडत नाही? पण प्रत्येक वेळी सरप्राईज गिफ्ट म्हणून एखादी वस्तू देण्याची खरंच आवश्यकता असते का? 
 • एखाद्या वेळी गिफ्ट ऐवजी तुम्ही गिफ्ट व्हाऊचरही देऊ शकता. अर्थात यातून तुमची जोडीदार “रोझ बुके” खरेदी करणार नाही पण तिला गुलकंद हवा असेल तर, ती हे व्हाउचर नक्की वापरेल. 
 • गिफ्ट व्हाऊचरमुळे तुमचा जोडीदार त्याला आवश्यक असणारी वस्तू खरेदी करू शकेल. तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत व जोडीदाराचीही बचत होईल. 
 • “राज की बात” सांगायची तर ६९९ ऐवजी ५००, ११९९ ऐवजी १०००, १७९९ ऐवजी १५०० या हिशोबाने तुमचेही शे दीडशे वाचतील शिवाय जोडीदाराच्या चेहऱ्यावरचा आनंदही कायम राहील.

एक दुजे के वास्ते:

http://bit.ly/2HgzyOL
 • प्रेमात पडल्यावर सर्वांनाच आपण “एक दुजे के वास्ते” आहोत असं वाटत असतं. पण काही दिवसानंतर मात्र एकमेकांमधले दोष खटकायला लागतात.
 • लक्षात ठेवा कोणताच माणूस जगात १००% चांगला किंवा वाईट नसतो. त्यामुळे जोडीदाराच्या गुणांसकट दोष स्वीकारायची तयारीही ठेवा
 • एकमेकांसाठी वेळ द्या, एकमेकांची स्वप्ने, अपेक्षा, विचार, जीवनशैली समजून घ्या. एकमेकांशी खोटं बोलू नका. 
 • “एक दुजे के वास्ते” म्हणजेच आयुष्यभरासाठीचं नातं जोडण्यापूर्वी एकमेकांची मानसिक, वैचारिक तसेच आर्थिक भावना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
 • पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे पण पैसा हा अनेक नात्यांमधल्या वादाचे कारण आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक गोष्टी कुठे, कधी, केव्हा आणि कशा पद्धतीने एकमेकांना सांगायच्या याचा सुयोग्य विचार करणे आवश्यक आहे.

“व्हॅलेंटाईन विक”मागचं खरं अर्थकारण

प्रेम ही एक सुंदर भावना आहे, तर पैसा हे आयुष्याचं वास्तव आहे. या दोघांनाही एकमेकांशी व्यवस्थित जोडलं, तर तुमचं नातं बहरेल आणि त्यातून आनंदाचा सुगंध पसरेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जगात १००%  परफेक्ट असं काहीच नसतं, ना व्यक्ती, ना नातं, ना आयुष्य. तेव्हा या “व्हॅलेंटाईन डे” ला परफेक्शन पेक्षा जास्त इमपरफेक्शनचा विचार करा, त्याला स्वीकारा आणि “परफेक्टली इनपरफेक्ट” असणाऱ्या आयुष्यामध्ये रंग भरणाऱ्या या नात्यालाही तेवढंच महत्व द्या आणि त्यातला गोडवा टिकवून ठेवा. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *