क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग १

Reading Time: 3 minutes

असं म्हणतात की भारतामध्ये दोनच मुख्य धर्म आहेत, एक क्रिकेट आणि दुसरा आहे राजकारण. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये या दोन्हींचा प्रभाव पाडणे हे अगदीच अपेक्षित आहे. राष्ट्रीय खेळ असला तरीही, क्रिकेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे क्रिकेटच्या अनुषंगाने आर्थिक क्षेत्राशी निगडित आपल्याला कोणते धडे घेता येतील, या संदर्भात या लेखांमध्ये आपण चर्चा करणार आहोत

‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

१. आपली उद्दिष्टे ओळखा

 • प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करणे हे प्रत्येक संघाचे उद्दिष्ट असते. अशा प्रकारच्या सामन्यासाठी स्वतःची तयारी करताना हेच जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते की तुमचा प्रतिस्पर्धी नक्की कोण आहे. तयारीचा पहिला नियम हाच आहे, की तुमच्या प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी  लेखणे
 • जरी तुम्ही कितीही श्रेष्ठ आणि महान असला तरी सुद्धा. तुमच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी आहेतवाढता महागाईचा दर आणि दोलायमान शेअर बाजार. त्यामुळे, तुमच्या तयारीची पहिली पायरी असली पाहिजे, SMART! Smart (चलाखीने), Measurable (मोजता येण्यासारखे), Achievable (सहजसाध्य), Realistic (वास्तववादी), आणि Time-bound (सुनियोजित वेळापत्रकानुरूप) आर्थिक उद्दिष्ट
 • तुमची उद्दिष्टे कितीही सहज किंवा कितीही अवघड/ कितीही कठीण असो, जर तुमची तयारी योग्य असेल, तर, तुम्ही त्यांना निश्चितपणे प्राप्त करू शकता.

२. लवकरात लवकर एक चांगली सुरुवात करणे.  

 • कोणत्याही सामन्यामध्ये जर सुरुवात चांगली मिळाली, तर संघाला ठरवलेली उद्दिष्टे प्राप्त करणे सोपे जाते.
 • उदाहरणार्थ, दुसऱ्यांदा फलंदाजी करताना जर तुम्हाला खूप मोठी धावसंख्या साधायची असेल, तर, सुरुवातीला येणाऱ्या फलंदाजांकडून सहाजिकच खूप मोठ्या धावसंख्येचे अपेक्षा केली जाते. त्यामध्ये चौकार असतील, षटकार असतील, जेणेकरून नंतर येणाऱ्या फलंदाजांवरचा ताण कमी होतो सहजतेने उद्दिष्ट प्राप्त करता येते. त्याचप्रकारे, एक गुंतवणूकदार म्हणून विचार करताना, लवकरात लवकर काही ठराविक रकमेची गुंतवणूक करणे हे कधीही शहाणपणाचे ठरते
 • लवकरात लवकर जर तुम्हाला अगदी छोटीशी ही रक्कम गुंतवता आली आणि हळूहळू ही रक्कम वाढवत नेता आलीतर, भविष्यात तुम्ही खूप मोठी गंगाजळी उत्पन्न करू शकता. उलटपक्षी, जेवढ्या उशिराने तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात कराल, त्याच प्रमाणामध्ये ती ठराविक रक्कम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अधिकची गुंतवणूक करावी लागेल, नाहीतर, आपल्याला ठरावीक मुदतीमध्ये अपेक्षित रक्कम प्राप्त करता येणार नाही

बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया 

३. सुरक्षा कवच

 • सुरक्षा साधने किंवा सुरक्षा कवचात शिवाय खेळायला उतरू नका
 • सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्याने खेळताना खेळाडूला इजा होऊ शकते. त्याचप्रकारे तुमच्या आर्थिक नियोजनात मध्ये जर सुरक्षेचा मुद्दा विचारात घेतला नसेल, तर, अनेक धोक्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो
 • संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी आर्थिक आणि आरोग्याशी निगडीत धोक्यांचा सामना करता येईल अशाप्रकारे स्वतःची आर्थिक तयारी करूनच मग सुरुवात करणे कधीही योग्य.  
 • अडीअडचणीच्या आणि आपत्कालीन स्थितीमध्ये लगेच हाताशी येईल आणि सुरक्षित असेल अशा प्रकारे आर्थिक नियोजन किंवा एक ठराविक रक्कम बाजूला ठेवूनच गुंतवणुकीचा विचार करणे फायद्याचे आहे

कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

४. योग्य संघाची निवड 

 • क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. त्यामध्ये खेळणाऱ्या अकरा पैकी प्रत्येक खेळाडूचे योगदान हे विजयासाठी अत्यंत महत्त्वाचे असते
 • एखाद्या सामन्यामध्ये एखादा खेळाडू सामना फिरवू शकतो, पण नेहमी असे होत नाही. विजय प्राप्तीसाठी सर्वच्या सर्व अकरा खेळाडूंचे योगदान अतिशय महत्त्वाचे असते
 • उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळचे वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया असे संघ घ्यानाहीतर हल्लीच्या काळातला भारताच्या संघाचा विचार कराप्रत्येक खेळाडू जवळपास प्रत्येक सामन्यामध्ये लहान मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचे बहुमूल्य योगदान देतो आणिसंघ विजयी मुकुट धारण करतो. 
 • त्याचप्रमाणे, आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपला संघ हा योग्य असणे अतिशय गरजेचे असते
 • आर्थिक नियोजनासाठी जेव्हा आपण संघ म्हणतो, तेव्हा त्यामध्ये गुंतवलेल्या संपत्तीचे वर्गीकरण आणि त्याचे मूल्यांकन असे काही मुद्दे आपल्याला अपेक्षित असतात ज्यात असेट्स, इक्विटी, डेबटरिअल इस्टेट, आणि सोने असे काही भाग आहेत. या सगळ्यांमध्ये योग्य प्रमाणामध्ये संपत्तीचे वर्गीकरण केल्यास नुकसानीचा धोका कमी होऊन दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने आपल्याला मार्गक्रमण करता येते

५. खूप जास्त वेळेसाठी टिकून रहा.

 • कोणताही महत्वाचा सामना खेळताना उत्तेजीत होऊन कसेही वेडेवाकडे फटके मारणे किंवा दडपणाखाली येऊन खेळणे हे प्रत्येक फलंदाजासाठी नुकसानीचेच ठरते.  
 • त्याचप्रमाणे गुंतवणूक करण्यासाठी ज्याला लवकरात लवकर खूप जास्त पैसे मिळवायची घाई आहे किंवा असले तरी दडपण आहे असे लोक बर्याचदा शेअर बाजाराच्या दोलायमान स्थितीचा अभ्यास करता अचानक त्यातून बाहेर पडतात आणि खूप मोठे नुकसान करून घेतात.

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

क्रिकेट आणि आर्थिक नियोजनाच्या बाबतीतील आणखी काही सामायिक दुव्याबादल आपण पुढच्या लेखात चर्चा करू

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *