काटकसरीचे कानमंत्र भाग १

Reading Time: 2 minutes आपण देशतील, जगातील श्रीमंत लोकांकडे पाहतो आणि सहज विचार येतो की, हे श्रीमंत आहेत कारण यांचे पूर्वज श्रीमंत होते किंवा त्यांनी पुढच्या पिढ्या श्रीमंत व्हाव्यात याची सोय खूप पूर्वीच करून ठेवली होती. आपण श्रीमंत नाहीत कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी फार कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाहीत. पण हे साफ चूक आहे. कित्येक श्रीमंतानी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. श्रीमंत होण्यासाठी पूर्वापार संपत्ती किंवा लॉटरीच तिकीट किंवा खजिना सापडावा लागत नाही. गरज आहे ती काही सवयी स्वतः मध्ये रुजवण्याची. मग दहा बाय दहा च्या खोलीत राहणारा आणि महिना १०,००० रुपये कमावणारा माणूस देखील बिलगेट्स, अंबानी, आदानी होऊ शकतो. जाणून घ्या श्रीमंत माणसांचे बचतीचे कानमंत्र.

निवडणूक रोखे (Electoral Bonds) म्हणजे काय ?

Reading Time: 3 minutes विविध राजकीय पक्ष पैसा जमा करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवून देणग्या मिळवत असतात. या देणग्या सर्वसामान्य लोक, व्यापारी , कंपन्या, मोठे उद्योगपती यांच्याकडून रोखीने घेतल्या जात असल्याने आणि त्याचा तपशील ठेवण्याचे कायदेशीर बंधन नसल्याने काळ्या पैशांची निर्मिती होत होती. हे व्यवहार पारदर्शी व्हावेत या हेतूने २०१७/१८ च्या अर्थसंकल्पात राजकिय पक्षांना मदत करण्याचा हेतूने निवडणूक रोख्यांची निर्मिती केली आहे.

आधार कार्ड अपडेट हिस्ट्री आता एका क्लिकवर

Reading Time: 3 minutes श्री. अजय  नोकरीच्या निमित्त्याने सतत एका गावावरून दुसऱ्या गावी स्थलांतर करत असतात. नोकरी सोबतच त्यांचा घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक, बँकेचे तपशील बरेचदा बदलत असतात. त्यामुळे त्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये सतत बदल करावे लागतात. पण हे सतत चे बदल त्यांना स्वतःला देखील गोंधळात टाकतात. नेमके कोणकोणते बदल आपण केले? किंवा चालू आधार कार्ड सोबत नक्की कोणते तपशील भरले आहेत? हेच त्यांना आठवेनासे झाले. असा प्रसंग आला तर अशा वेळी काय करायचे?

शेअर्सची ओपन-क्लोज पोझिशन आणि अल्गोरिदमीक ट्रेडिंग

Reading Time: 2 minutes भांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफएनओ, करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे?  ते जाणून घेऊयात.

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

Reading Time: 3 minutes सर्व अर्थसाक्षर वाचकांना आता थोडं का असेना हायसं वाटत असेल. कारण कर वाचवा, कर वाचवा असे सारखे येणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स आता बंद झाले असतील. आर्थिक स्वयंशिस्त असणारे किंबहुना त्याहूनही नसणारे सल्लागार समाज माध्यमातून किती तरी मोठया प्रमाणात ह.भ.प. असल्यासारखे प्रबोधन करत असतात. या समाज माध्यमी मंडळीच बर असतं पहिली पोस्ट राजकीय विषयावर, दुसरी दुष्काळावर, तिसरी प्रेरणादायक चित्रफितीची आणि मग एखादी आर्थिक गुंतवणुकीची… जनजागृती केल्याचं तेवढंच समाधान मिळतं एवढीच यांची शुद्ध भावना.

‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes एक नवीन उत्साहपूर्ण आर्थिक वर्ष सुरु झालंय आणि या वर्षाच्या सुरवातीलाच दोन अत्यंत महत्वाचे उत्सव देशात सुरु आहेत. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरं आयपीएल मॅचेस! खरंतर यातील एक घटना राजकीय आणि दुसरी संपूर्णपणे क्रीडा किंवा मनोरंजन विश्वातली आहे. मग याचा संबंध नवीन आर्थिक वर्षाशी कसा काय? जरा विचार करा, तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही घटनांमागे ही काही आर्थिक धागे आहेत. या घटना आपल्या आणि पर्यायाने देशाच्या नवीन आर्थिक वर्षाला एक दिशा देऊ शकतात. कसं? हे जरूर वाचा.

Life Insurance: जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

Reading Time: 3 minutes जीवन विमा पॉलिसी आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग तर आहेच शिवाय आजच्या युगात त्याकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितले जाते. ही पॉलिसी केवळ मृत्यूपश्चात कव्हरेज पुरवत नाही तर तात्पुरते अथवा कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आल्यास त्यासाठीही या पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. गुंतवणूक व कर-लाभ (Tax benefit) एकत्रीतपणे मिळवून देणारा एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणजे जीवन विमा पॉलिसी.

डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

Reading Time: 3 minutes मी जितका खोल व्यक्तिगत आर्थिक कुवतीचा विचार करते, तितकं मला जाणवतं की पश्चिमात्याचा दृष्टीकोन हा खूपच उपयुक्त आहे. यूएस मध्ये डेटींगचा एक प्रमुख निर्धारक म्हणजे व्यक्तीचा ‘क्रेडीट स्कोअर’! ज्याप्रमाणे एखादी बँक कर्ज देताना, “व्यक्ती परत फेड करण्या इतकी जबाबदार आहे का?” हे क्रेडीट स्कोअरने तपासते. त्याप्रमाणे, अमेरिकेमध्ये डेट करण्यापूर्वी आपल्या साथीदाराचा क्रेडीटस्कोर तपासतात.

भारतीय बनावटीचे रूपे कार्ड

Reading Time: 3 minutes व्हिझा/मास्टरकार्ड ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये एक पाऊल उचलले. भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळ (NPCI National Payment Corporation of India ) च्या माध्यमातून एक स्वदेशी कार्ड बाजारात आणायचे ठरवले. त्यानुसार मार्च २०१२ मध्ये अधिकृतरित्या रूपे कार्ड देशभरात बाजारात आणले गेले.Rupee आणि Payment या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘RuPay’ हा शब्द तयार केला गेला. भारतीय बाजारात व्यवहार ग्राहकांना व बँकांना सोयीचे व्हावे म्हणून हे रूपे कार्ड सामान्य (domestic) बाजारात आणले गेले.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – बहुउद्देशीय प्रवासी कार्ड

Reading Time: 2 minutes ‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)  हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो. याचे व्यवस्थापन करणे त्रासदायक व खर्चिक आहे. रोकडविराहित व्यवहार आपणास वेगवेगळ्या कार्डसच्या माध्यमातून करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने स्वतःची वेगळी कार्ड पेमेंट व्यवस्था चालू केली.