‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes

एक नवीन उत्साहपूर्ण आर्थिक वर्ष सुरु झालंय आणि या वर्षाच्या सुरवातीलाच दोन अत्यंत महत्वाचे उत्सव देशात सुरु आहेत. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरं आयपीएल मॅचेस!

खरंतर यातील एक घटना राजकीय आणि दुसरी संपूर्णपणे क्रीडा किंवा मनोरंजन विश्वातली आहे. मग याचा संबंध नवीन आर्थिक वर्षाशी कसा काय?

जरा विचार करा, तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही घटनांमागे ही काही आर्थिक धागे आहेत. या घटना आपल्या आणि पर्यायाने देशाच्या नवीन आर्थिक वर्षाला एक दिशा देऊ शकतात. कसं? हे जरूर वाचा.

 • आयपीएल म्हणजे देशात जल्लोषाचं वातावरण असतं. दरवर्षी मॅचेस होतात कोणीतरी जिंकतं कोणीतरी हारतं. आपण आपल्या किंवा मित्राच्या घरी, रेस्टोरंट, फार्महाउस, माॅल मध्ये टीव्ही  समोर बसून आपल्या जवळच्या माणसांसोबत महिन्याभर याची मजा घेत असतो. स्त्री-पुरुष, वृद्ध, बाल, तरुण, तालुक्याचा किंवा राजधानीच्या ठिकाणीही सगळे त्याच रसिकतेने आयपीएलची मजा लुटत असतात.
 • पण दरवर्षी एवढंच होतं. तुम्हाला माहित नसेल पण या एक आयपीएल मॅच देशात प्रचंड आर्थिक उलाढाल करते. मग आपल्यासाठी मॅच हा फक्त मनोरंजनाचा विषय का असावा? आयपीएल मॅच आपल्याला काही आर्थिक धडे शिकवू शकते, असा विचार केलाय का? हा खरं तर तरुणांच्या कुतूहलाचा विषय असायला हवा. आयपीएल मधून काय आर्थिक टिप्स खरंच मिळतात का?
 • आयपीएल मॅचसाठी तरुण अतिउत्साही असतात तर आर्थिक नियोजन म्हणजे त्यांचा नावडता विषय! हा विषय फक्त प्रौढ आणि वृद्धांसाठी, असं त्यांचं मत. मग दोन्हीची सांगड कशी घालणार? तरुणांचे आर्थिक वर्ष समृद्धीचे जावे यासाठी क्रिकेटमॅच आणि आयपीएल चा आर्थिक विचार करू.

फिल्डची तपासणी करा-

 • मॅच सुरु होण्यापूर्वीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जे मैदान निवडलं आहे त्याची तपासणी करणे.
 • कर्णधार आणि संघ टॉस करण्यापूर्वी मैदान आणि खेळपट्टीकडे विशेष लक्ष देतात. आपण ज्या जमिनीवर पुढचे काही तसं खेळणार आहोत त्या जमिनीची परिस्थिती समजून घेण्यास यामुळे मदत होते. त्याचप्रमाणे, गुंतवणूकीपूर्वी, तुम्ही बाजारातील परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे.
 • गुंतवणूक करताना बाजारातील परिस्थिती; पैशाचा साठा करावा की गुंतवणूक करावी? शेयर खरेदी करणे योग्य की विक्री? असे निर्णय घेताना विचारात घेणे आवश्यक असते.

तुम्ही कर्णधार आहात-

 • तुमच्या वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचे तुम्ही स्वतः कर्णधार आहात, हे आधी स्वतःला सांगा. खरे तर टीममधला प्रत्येक घटक मॅच जिंकण्यासाठी जेव्हा जीवतोड मेहनत करतो, तेव्हा टीम विजयी होते. म्हणजे हे काम एकट्याचे नाही. पण टीममध्ये एक अशी व्यक्ती असते जी या सगळ्यांना दिशा देण्याचे काम करते. ती व्यक्ती म्हणजे कर्णधार!
 • टीम च्या हार-जीत सगळयाची जबाबदारी तो स्वतच्या खांद्यावर घेत असतो. तुमच्या आर्थिक नियोजनाचे तुम्ही कर्णधार आहात, हे आधी ठरवा. घरातील सदस्य तुम्ही दिशा द्याल तसे वागतील आणि तुमच्या नियोजनाचं यश तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवा. कोणत्याही क्षणी कर्णधाराला हलगर्जी राहून चालत नाही त्याप्रमाणे आपल्या गुंतवुकीच्या बाबतीत गाफील राहू नये, हे लक्षात ठेवा.

लक्ष्य ओळखा-

 • गोलंदाज असेल वा फलंदाज, खेळाडूंना त्यांचा पुढील उद्देश काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एकमेकांच्या धोरणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
 • त्याचप्रमाणे, आपले पैसे गुंतवताना, आपण ज्या ठिकाणी पैसा गुंतवणार आहोत त्या संस्थेला आणि त्या व्यवस्थेला जाणून घेणे महत्वाचे आहे. यामुळे पुढचे धोरण ओळखण्यात मदत होते.
 • तसेच,गुंतवणुकीसाठी बाजारपेठेत अजून कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? कुठे किती धोका आहे? किती नफा आहे? आपल्याला नेमकं काय हवं आहे? हे समजून घेण्यास आपल्याला मदत होईल.

योग्य वेळी विश्रांती-

 • प्रत्येक सामन्यात रणनीतीबद्दल चर्चा करण्यासाठी एक ब्रेक असतो. जेथे पुढच्या ओव्हरसाठी धोरणांवर चर्चा करतात. त्याचप्रमाणे, आर्थिक नियोजनात, योग्य वेळी अशा ब्रेकची गरज असते.
 • आपलं लक्ष्य काय? ते कितपत मिळवलं? काय कमी होतं? कोणती सुधारणा गरजेची आहे? हे सगळं बघण्यासाठी प्रत्येकाने वेळ काढला पाहिजे आणि गरज पडल्यास तज्ञ आर्थिक सल्लागारांबरोबर चर्चा केली पाहिजे.

लक्ष केंद्रित करा-

 • अडचणी आल्या तरी त्यांना सामोरे जाऊन संघ शेवटपर्यंत लढतो. त्याचप्रमाणे, आपल्या गुंतवणूकीच्या ध्येयामध्ये अनेक अडथळे येतील. त्याचे स्वरूप बाजारातील अस्थिरता, सुधार आणि चढउतार असे काहीही असेल. अशी कोणतीही आर्थिक परीस्थिती आली तरी ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
 • नोटबंदिसारखा एखादा राष्ट्रीय निर्णय आपल्यासमोर अडचण निर्माण करू शकतो पण आर्थिक ध्येयावरून त्यामुळे लक्ष विचलित होऊ नये.

गुंतवणूकीमध्ये विविधता वाढवा-

 • उच्च ध्येय गाठण्यासाठी संघाचा प्रयत्न आवश्यक आहे. क्रिकेटमधील हे धोरण आपल्याला ही गोष्ट शिकवते की, ठराविक बचत आणि गुंतवणूक करताना आपला निधी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या फंडसमध्ये गुंतवले पाहिजेत.
 • फिल्डचा केलेला अभ्यास इथे कामी येतो. मोठे-कॅप, मिड-कॅप, पायाभूत सुविधा निधी इ. प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक विभाजित केल्यास विविधता वाढविता येते.

बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…,

मासिक बजेट कसे तयार करावे यासाठी ११ पावले,  घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.