आधार कार्ड अपडेट हिस्ट्री आता एका क्लिकवर

Reading Time: 3 minutes

श्री. अजय  नोकरीच्या निमित्त्याने सतत एका गावावरून दुसऱ्या गावी स्थलांतर करत असतात. नोकरी सोबतच त्यांचा घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक, बँकेचे तपशील बरेचदा बदलत असतात. त्यामुळे त्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये सतत बदल करावे लागतात. पण हे सतत चे बदल त्यांना स्वतःला देखील गोंधळात टाकतात. नेमके कोणकोणते बदल आपण केले? किंवा चालू आधार कार्ड सोबत नक्की कोणते तपशील भरले आहेत? हेच त्यांना आठवेनासे झाले.

असा प्रसंग आला तर काय करायचे?

 • काळजी करू नका. आता तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये केलेल्या बदलांचा मागोवा घेऊ शकता.
 • बरेचदा नोकरीच्या निमित्याने, किंवा महिलेचे लग्न झाल्यानंतर, नावातील बदल किंवा पत्ता, मोबाईल क्रमांक अशा अनेक सुधारणा करायची वेळ येते, त्याचा योग्य तपशील आणि तुमच्या आधार कार्डवरील योग्य माहितीची खात्री करणे गरजेचे आहे.
 • त्यामुळे आधार एक नवीन सुविधा घेऊन आलंय. ज्यामुळे तुम्ही तुमची अद्ययावत महिती आणि मागील सुधारणा घरबसल्या तपासू शकता.

होय! तुम्ही तुमच्या आधार कार्डचा अद्ययावत इतिहास आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून तपासू शकता.

 • आपल्या बँकेच्या पासबुकवर ज्या प्रकारे आपल्या सर्व व्यवहाराची माहिती भरून येते. म्हणजे कोणाकडून किती पैसे घेतले? कोणाला किती पैसे पाठवले? कधी आणि कसे पाठवले? याचा लेखाजोखा आपल्याला पासबुकवर मिळतो.
 • त्यावरून आपल्या व्यवहारांचा इतिहास सहज पडताळता येतो आणि आपल्या व्यवहारांविषयी जर संभ्रम असतील तर ते दूर होतात. अगदी त्याच पद्धतीने आधार कार्ड आणि याचा सुधारणाचा लेखाजोखा तुम्ही आता ऑनलाईन बघू शकता.

ऑनलाइन आधार अद्यतन इतिहास (Update History) कसे तपासावे?

 • यूआयडीएआय पोर्टलला (UIDAI) https://www.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन आधार अद्यतन इतिहास ऑनलाइन तपासणे शक्य आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर युआयडीएआयच्या डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
  • आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून यूआयडीएआय पोर्टलला भेट द्या.
  • माझा आधारवर क्लिक करून “आधार अद्ययावत” अथवा”आधार अद्ययावत इतिहास” पर्याय निवडा
  • आपला आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी आणि सुरक्षा कोड तिथे भरा
  • आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल किंवा  एमआधार ऍपवर TOTP (टाइम-आधारित ओटीपी) पाठवण्याचा पर्याय निवडा.
  • आपण “ओटीपी पाठवा” निवडल्यास, ओटीपी तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल
  • आता हा टाइम-आधारित ओटीपी आपल्या एमआधार पोर्टल वर प्रविष्ट करू शकता
  • ओटीपी / TOTP नोंदवून “सबमिट” बटणावर क्लिक करा
  • ऑनलाइन/ऑफलाइन किंवा बायोमेट्रिक/लोकसंख्याशास्त्रीय सर्व प्रकारचा डेटा अद्ययावत केलेली माहिती घटनाक्रमाने स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.
  • जर आपला आधार ई-मेल आधारशी जोडलेला असेल तर, यूआयडीएआय अद्ययावत इतिहास डाउनलोड करण्यासाठी ई-मेल पाठवला जाईल.
  • तुमचा इतिहास कोणी पाहिला किंवा फाईल कोणी डाउनलोड केली, हे जाणून घेण्यासाठी ही अतिरिक्त सुरक्षा आहे.

आधार अद्ययावत इतिहासात तुम्ही पुढील तपशील पडताळू शकता-

 • तपासणीची तारीख व वेळ:- आधार अपडेटची तारीख आणि वेळ स्क्रीनवर नमूद केले असते.
 • यूआरएन:- विनंती करताना तयार केलेला विनंती क्रमांकाचा उल्लेख सर्वप्रथम केलेला असतो. अपडेट स्थिती तपासण्यासाठी हा ‘यूआरएन’ वापरला जातो
 • अद्यतनाची तारीख:– आपणकोणत्या तारखेला आपला तपशील अद्ययावत करण्याची विनंती केली आहे ती तारीख येथे पाहायला मिळते.
 • अपडेटचे प्रकार:– अपडेट केलेली माहिती बायोमेट्रिक आहे की लोकसंख्याशास्त्रीय किंवा नवीन विनंतीची आहे हे तेथे नमूद केलेले असते.
 • वापरकर्त्याचा फोटो:- वापरकर्त्याचा आधार कार्डवर दिसणारा अद्ययावत फोटो येथे असतो.
 • लोकसंख्याशास्त्रीय तपशील:– सांखिक माहिती जसे की नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता यासारख्या तपशीलाचा उल्लेख इथे असतो.

आधार अद्यतन इतिहास मुख्य वैशिष्ट्ये-

 • आपला आधार अद्यतन इतिहास तपासण्यासाठी आपण आधार व्हर्च्युअल आयडी वापरू शकता.
 • आपण आपल्या आधार तपशील मध्ये कोणकोणते बदल केव्हा केले हे आपण पाहू शकता.
 • आपल्या नकळत कोणी आपल्या आधार कार्डची माहिती बदलली किंवा तपासली असल्यास आपण तपासू शकतो. संशयास्पद नोंदी आढळल्यास शक्य तितक्या लवकर यूआयडीएआयला याची तक्रार करा.
 • ही माहिती आधार कार्ड धाराकाला फक्त स्वतःच्या कार्डसंदर्भातच मिळवता येते, या तपशीलांमध्ये इतर कोणीही प्रवेश करू शकत नाही.
 • ही सुविधा ऑफलाइन उपलब्ध नाही. परंतु, आपल्या जवळील आधार केंद्रात यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकते.

आधार अद्यतन इतिहास तपासा तेव्हा लक्षात ठेवा-

 • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार नंबरला जोडला पाहिजे.
 • जर आपण आपल्या स्मार्टफोनमधून आधार कार्ड अपडेट केले असेल तर आपण मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविण्याऐवजी प्रमाणीकरणासाठी TOTP प्रविष्ट करू शकता.
 • केवळ आतापर्यंत केलेलेच सर्व अद्यतने स्क्रीनवर प्रदर्शित होती.
 • ही माहिती तुमच्या इमेल वर पाठवली जाते. याशिवाय तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन भविष्यातील संदर्भासाठी ते जतन करू शकता.

आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?, आधार बरोबर पॅन लिंक करणे अनिवार्य !

प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर |

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.