गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

https://bit.ly/2P3UWdf
2 1,268

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

सर्व अर्थसाक्षर वाचकांना आता थोडं का असेना हायसं वाटत असेल. कारण कर वाचवा, कर वाचवा असे सारखे येणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स आता बंद झाले असतील.  

आर्थिक स्वयंशिस्त असणारे किंबहुना त्याहूनही नसणारे सल्लागार समाज माध्यमातून किती तरी मोठया प्रमाणात ह.भ.प. असल्यासारखे प्रबोधन करत असतात.

या समाज माध्यमी मंडळीच बर असतं पहिली पोस्ट राजकीय विषयावर, दुसरी दुष्काळावर, तिसरी प्रेरणादायक चित्रफितीची आणि मग एखादी आर्थिक गुंतवणुकीची… जनजागृती केल्याचं तेवढंच समाधान मिळतं एवढीच यांची शुद्ध भावना.

 • खर तर १५ ऑगस्टला देशाभिमान बाळगणारे आपण सर्व २६ जानेवारीनंतर सरकारी यंत्रणा फक्त माझ्यासारख्या सामान्य माणसाचा खिसा कापण्यासाठी जन्मास आल्या आहेत, असा समज करून कर वाचविण्यासाठी एखाद प्रोडक्ट शोधात असतो.
 • नाही म्हटलं तरी सरकारने कर वाचविण्यासाठी प्रयोजन करून दिले आहे तर त्याचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे. परंतु खूपदा कर वाचविण्याचा लोभ लाभाचे रुपांतर क्षोभात होऊ देणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
 • ज्याठिकाणी आपण कष्टाचे पैसे वाचवून गुंतवणूक करतो किंवा कर्जाची परतफेड करत असतो त्यांचा अधून मधून पडताळा न घेतल्यास आर्थिक नुकसान होत असते, हे सपशेल विसरतो.
 • भारतात मुदत ठेवींवर कमाल ७.५% वार्षिक परतावा घेणारे किंवा ५.५% वार्षिक परतावा देणारी विमा योजना हे गुंतवणूक साधन म्हणून विकत घेणारे यांना गुंतवणूकदार म्हणून संबोधले जाते. असे धैर्यशील गुंतवणूकदार जेव्हा शेअर्समधे किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात तेव्हा यांना सरासरी किती परतावा हवा? हे ठरवता येत नाही. मग केलेल्या गुंतवणूक रकमेचा दररोज बाजार भाव बघण्यात यांचा गुंतवणूक परतावा देऊ शकते, यावरचा विश्वास उडू लागतो.
 • अमॅझॉन कंपनीचा मालक  जेफ बेझोस व जगातील श्रीमंत गुंतवणूकदार वॉरन बफे यांची भेट झाली तेव्हा त्यांनी बफेना प्रश्न विचारला कि तुम्हाला झटपट श्रीमंत का होता आले नाही? त्यावर बफे म्हणाले, माझा गुंतवणूकीचा मार्ग शाश्वत परंतु धीम्यागतीने श्रीमंत करणारा आहे.
 • बऱ्याचदा गुंतवणूकदार हा मोफत सल्ल्यावर आधारित किंवा आजूबाजूला असणाऱ्या मित्रांशी चर्चा करून गुंतवणुकीचा निर्णय घेत असतो. त्यात चुकीच अथवा वावगं आहे असं अजिबात नाही. परंतु मित्राने ध्येय डोळ्यापुढे ठेवून केलेली गुंतवणुक तुम्हाला सुद्धा कामी येईल, हे कुठल्या आधारावर गृहीत धरतात ते कळायला मार्ग नाही.
 • आज सगळ्याच गोष्टी एक कळ दाबली की हजर होतात. त्यामुळे सगळेच साक्षर जन विश्लेषक असल्यासारखे बोलत असतात. माहिती असणे, गरजेपुरता अभ्यास करणे आणि सतत त्याच क्षेत्रात राहून ज्ञान मिळविणे यात फरक असतो.
 • या सदरातून आपण आर्थिक नियोजन करतांना घडलेल्या आणि बिघडलेल्या चांगल्या-वाईट सर्वच निर्णयांची – परिणामांची सांगोपांग चर्चा करण्याचा प्रयत्न करू. काहीवेळा सल्लागाराकडून देखील नियोजन करतांना चूक झालेली असते. बहुतेकदा गुंतवणूकदाराने सांगितलेले ध्येय त्यासाठी लागणारा कालावधी, अपेक्षित रक्कम यांची सांगड घालूनच सल्लागार नियोजन करत असतो. पण गुंतवणूकदार ध्येयाकडे लक्ष न ठेवता मी केलेली गुंतवणूक योग्य की अयोग्य याबाबत अनेकांचा सल्ला (मोफत) घेत असतो. त्यात असंख्यवेळा वाचनात येणाऱ्या नकारात्मक बातम्या चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतात.
 • मी सरकारी बँकेतून कर्ज घेतले आहे म्हणजेच व्याजदर आपोआप बदलत असतील. शुद्ध विम्याचे हप्ते भरून पैसे परत मिळणार नसतील तर मग शुद्ध विमा का घ्यावा? मी गाडीचा विमा काढला आहे मग वैयक्तिक अपघाती विम्याची गरज काय? सरकार जर मोफत उपचार उपलब्ध करून देते आहे तर आरोग्य विमा घेतलाच पाहिजे का? म्युच्युअल फंड सही है क्या? अशा नानाविध शंका आपल्या मनात डोकावत असतात.

सध्या निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सहज म्हणून संदीप खरेंना गुगल करून त्यांची गाणी ऐकावी असं मनात आलं. त्यांच नाव टाईप केलं, कळ दाबली आणि पहिलच गाणं समोर पडद्यावर झळकल मी मोर्चा नेला नाही… माझही आवडतं गाणं आहे ते. त्यातूनच हे सदर लिहिण्याचं सुचलं. तुम्ही देखील तुमचे बरोबर ठरलेले निर्णय, झालेल्या चूका किंवा सध्या करत असलेले नियोजन यात उपस्थित होणाऱ्या शंका माझ्याशी शेअर करा.

– अतुल प्रकाश कोतकर

9423187598

(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी atulkotkar@yahoo.com वर संपर्क साधून आपले प्रश्न विचारू शकतात.)

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा, गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?,

करबचतीचे सोपे मार्ग,  कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

2 Comments
 1. Sagar Hase Patil says

  Sundar vichar

 2. DR DHAIKAR AAI HOSPITAL says

  VERY SIMPL WAY OF WEALTH CREATION

Leave A Reply

Your email address will not be published.