गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय

Reading Time: 4 minutes आपल्या घरकुलाचे स्वप्न घेऊन अनेक जणांनी गेल्या आठवड्यात ‘बीकेसी’तील स्थावर मालमत्ता प्रदर्शनास भेट दिली. तिथे मुंबई ग्राहक पंचायतीने, ग्राहक जागृती आणि शिक्षणासाठी जे दालन सजवले होते, त्याचा लाभ अनेकांनी घेतला. प्रश्न विचारले समस्या सांगितल्या. मालमत्तेच्या किमती पाहता कर्जाशिवाय मालमत्ता खरेदी करणे जवळपास अशक्यच आहे. असे गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, बँका, एकसमान मासिक हप्त्याने कर्ज फेडण्याशिवाय कर्ज परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध करून देत आहेत त्यातील फरक आणि बारकावे समजले तर निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. तेव्हा या पर्यायांचा तुलनात्मक आढावा घेण्याचा हा प्रयत्न.       

शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून… 

Reading Time: 5 minutes ‘काळ बदलला, हे आजकालचे परवलीचे वाक्य बहुतेकदा खरेही असणारे, पण कर्ज या शब्दाला चिकटलेली एकतर्फी नकारात्मक, अपराधी भावना आजही तितकीशी बदललेली नाही. हाच धागा पकडून कर्ज या संकल्पनेबद्दलचे गैरसमज दूर करता आले, तर पहावे या हेतूने हा शब्द्च्छल (आणि वाचकांचा छळ).

ऋण व्याजदराने गृहकर्ज?

Reading Time: 2 minutes घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यावरील व्याज यामुळे घर घेणाऱ्याची सर्व मिळकत पणास लागते. आयुष्यातील उमेदीची वर्ष फक्त कर्ज फेडण्यासाठी खर्च होतात, इतर खर्चाना मुरड घालावी लागते. जरी हे कर्ज ८.५% दराने इतक्या कमी व्याजदराने घेतले तरी १ लाख रुपये कर्ज १० वर्षात फेडण्यासाठी साधारणत: दीड लाख, २० वर्षात २ लाख १० हजार तर, ३० वर्षात २ लाख ७५ हजार रुपयांची परतफेड करावी लागते. 

कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३

Reading Time: 4 minutes तुमची सगळ्यात जास्त काळजी घरातल्या सख्ख्या लोकांपेक्षा कर्ज देणाऱ्या सावकाराला असते. त्याचबरोबर कर्ज परतफेड करायची चिंता भरपूर कर्ज घेतलेल्यांना सुद्धा असते. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आवश्यक आहे.  या कर्जमुक्तीच्या लेखमालेतील हा तिसरा लेख ! मागील भागापर्यंत आपण कर्जमुक्तीसाठी  एकूण ४ कृती बघीतल्या होत्या. आता या भागात कृती क्रमांक ५ व कृती क्रमांक ६ पाहूया.

टॉप-अप कर्ज का घ्यावे?

Reading Time: 3 minutes बँकेचे जे ग्राहक नियमित आणि पद्धतशीर कर्जाची परतफेड करतात, ज्यांचा सर्व आर्थिक व्यवहारांचा इतिहास स्पष्ट आहे, त्यांच्यासाठी खास फायदा म्हणून हे कर्ज घेण्याची मुभा त्यांना देण्यात येते. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेऊ शकता शिवाय तुम्ही कशासाठी हे कर्ज घेत आहात हेही बँकेला सांगयची गरज नाही. 

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग २

Reading Time: 4 minutes कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध घेणाऱ्या लेख मालिकेतील हा दुसरा लेख. खर्च करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर बँकांकडून कर्ज घेतले जाते. याबदल्यात मासिक परतफेड मात्र व्याजासहित करावी लागते.“आपल्याला गरज आहे म्हणून कर्ज घ्यायचे की बँक कर्ज देते आहे म्हणून आपल्या अनावश्यक गरजा वाढवायच्या?”  याचा विचार न करता घेतलेले कर्ज तुम्हाला “कर्जबाजारी” बनवते.

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग १

Reading Time: 3 minutes आग, कर्ज किंवा शत्रू अगदी थोड्या प्रमाणात जरी शिल्लक असतील तर त्यांना लगेच संपवा कारण ते अस्तित्वात राहिले तर पुन्हा पुन्हा वाढतात.  कर्जामुळे अनेक न संपणाऱ्या अडचणी निर्माण होतात. कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध या लेख मालिकेत आपण घेणार आहोत. 

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

Reading Time: 2 minutes ‘कर्ज’ हा एक शब्द अनेक भावनांना साद घालतो. प्रत्येक व्यक्तीनुसार या शब्दाभोवती असणाऱ्या भावना बदलत जातात. लहानपणापासून घरात कर्जावरून ताणतणाव बघितलेल्यांना ‘कर्ज’ शब्द ऐकल्यावर एकप्रकारची शिसारी येते. “कर्ज घेणे चांगले की वाईट?” या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे तर आहेच त्याचबरोबर ते व्यक्तिसापेक्षही आहे. 

क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २

Reading Time: 3 minutes आपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या  पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला  दिल्यावर आपण परत घ्यायचे विसरलो म्हणून!

क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर

Reading Time: 2 minutes कोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना आपला सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. हा स्कोअर आपल्या कोणत्याही एकाच व्यवहारावर ठरत नसतो. आपला सिबिल स्कोअर म्हणजे आपण सातत्याने करत आलेल्या सर्व आर्थिक उलाढालींचा एकत्रित परिणाम असतो. या स्कोअरवर कर्ज मंजूर वा नामंजूर होणे अवलंबून असते. हा स्कोअर खराब असल्यास आपण कर्ज घेण्यास पात्र ठरण्यासाठी तो सुधारायला साधारण ४ ते १२ महिने लागू शकतात.