Browsing Category
कर्ज
135 posts
Top- Up Home Loan: काय आहे गृहकर्ज टॉप अप?
Reading Time: 2 minutes‘वाढीव कर्ज’ अर्थात ज्याला आपण टॅाप अप लोन म्हणतो, हे आपल्या चालू गृहकर्जावर घेतलेले अधिकचे कर्ज असते. नियमित आणि शिस्तबद्ध ग्राहकासाठी बँका आणि तत्सम संस्था एक सोय उपलब्ध करून देतात. ती म्हणजे जर तुमचे सर्व व्यवहार स्पष्ट, पारदर्शक आणि नियमित असतील तर त्याच चालू कर्जावर तुम्ही वाढीव कर्ज घेऊ शकता.
Guarantor -कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा…
Reading Time: 3 minutesअनेकदा आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी, उच्चशिक्षण, शुभकार्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी कर्ज घयायची वेळ येते. काही वेळा बँकेच्या नियमानुसार कर्जदार त्याला हव्या असणाऱ्या रकमेच्या कर्जासाठी अपात्र ठरत असल्यास अथवा काही वेळा बँकेच्या नियमांनुसार कर्जदाराला कर्ज घेताना जामीनदारांची आवश्यकता भासते. उदा. कर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, सतत बदलल्या जाणाऱ्या नोकऱ्या किंवा सततची बदलीची नोकरी, कमी मासिक उत्पन्न, तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी असणे यासारख्या अनेक कारणांमुळे कर्ज घेताना जमीनदाराची गरज भासते.
करोना कर्ज म्हणजे काय?
Reading Time: 2 minutesकोविड १९ मुळे अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी सरकार आणि रिझर्व बँकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे करोना कर्ज. भविष्याची अनिश्चितता, पगारातील कपात, टाळलेली पगारवाढ, नोकरीची अशाश्वतता यामुळे फक्त अत्यावश्यक खर्चांकडे लक्ष दिले जात आहे.
क्रेडीट कार्ड देणे रक्कम भरण्यास मुदतवाढ : तुम्ही काय कराल ?
Reading Time: 3 minutesआरबीआय’ने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कर्जप्रकारांमध्ये “क्रेडीट कार्ड”च्या बाकी रकमांचाही समावेश होतो. “मोराटोरीयम” म्हणजे मान्य केलेल्या वेळेसाठी एखादी क्रीया, व्यवहार तात्पुरता स्थगित करणे. क्रेडीट कार्ड बाकी रकमेच्या परतफेडीसाठी तुम्ही मोराटोरीयमचा स्वीकार केला तर काय होईल ?(credit card moratorium)
कोरोना: ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?
Reading Time: 3 minutesआरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २२ मे २०२० रोजी कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोनामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. आपण घेतलेल्या कर्ज रकमांची परतफेड उत्पन्नाअभावी कशी करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आ वासून उभा आहे. आरबीआयने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या म्हणजेच ईएमआय मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.