माझी कन्या भाग्यश्री योजना

Reading Time: 4 minutesकेंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजनाही सुरु केली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी मुलींचे जन्मदर कमी असणाऱ्या भारतातील १०० जिल्ह्यांची निवड करून सदर जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यसरकारने सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना सुरु केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

Reading Time: 3 minutesअन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे वाक्य आपण आयुष्यभर ऐकलेलं असतं. त्यातील निवारा म्हणजेच राहायला घर ही गोष्ट तर आपल्याला सर्व ऋतूंत तिन्ही त्रिकाळ वाचवणारी. शिवाय ते घर जर स्वतःचं असेल तर त्यातून मनाला मिळणाऱ्या आनंदाची गोष्टच वेगळी. मात्र सध्याच्या दिवसात स्वतःचं घर घेणं ही एक मोठी बाब आहे. वाढती महागाई, वाढत्या गरजा यांचा मेळ बसवत स्वतःचं घर खरेदी करणं म्हणजे आकाशाला गवसणी. स्वतःच घर म्हणजे जणू सामान्य लोकांना आवाक्याबाहेर वाटणारी गोष्ट .पण “प्रधानमंत्री आवास योजना” असताना सामान्य नागरिक स्वतःच्या घराचं स्वप्न नक्की पाहू शकतात.

डीजिटलायझेशन आणि रोजगाराच्या संधी

Reading Time: 4 minutesडिजिटल व्यवहार आणि सेवा क्षेत्राचा होत असलेला विस्तार, हा केवढा मोठा आणि सर्वव्यापी बदल आहे, याचे सुरवातीस अनेकांना पुरेसे आकलन झाले नाही, तो बदल शहरी आणि श्रीमंतांसाठीचा आहे, असेही बोलले गेले. पण आता हा समज मागे पडला असून त्याचा स्वीकार आणि व्यापकता वेगाने वाढतच चालली आहे. व्यवहारांच्या शुद्धीकरणासाठी आणि जगासोबत राहण्यासाठी भारताला त्याची गरजच होती.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

Reading Time: 3 minutesया वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PM-SYM) योजना सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५  फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले. या योजनेनुसार यातील लाभार्थीना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3000/- (रुपये तीन हजार) एवढे निश्चित निवृत्तीवेतन मिळेल. या योजनेच्या निवडक लाभार्थीना PM-SYM या पेन्शनकार्डचे वाटप करण्यात आले.

महिला दिन विशेष: महिलांसाठी आर्थिक नियोजनच्या ५ सोप्या स्टेप्स

Reading Time: 4 minutesआज जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्तमानपत्राची पानं बातम्यांपेक्षा जास्त जाहिरातींनीच भरलेली दिसतात. त्यात बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. स्त्रिया म्हणजे शॉपिंग नाही तर त्या उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesकंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

बँक खाते आणि रोख रक्कम मर्यादा

Reading Time: 3 minutesसध्याचे युग हे डिजिटल युग आहे. बँकेचे व्यवहार हे ऑनलाइन होतायत. आयकर खात्याला बँक खात्यावर लक्ष ठेवण्याची वेळ कधी येते किंवा बँकेला आयकर खात्याला विशिष्ट खात्याविषयी कधी सूचना द्यावी लागते? आपल्या बचत खात्यात व्यक्तीला किती रक्कम ठेवता येते, हे प्रश्न बरेचदा सामान्य नागरिकांना पडत असतात.

काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?

Reading Time: 3 minutesकोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं.  अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना. 

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

Reading Time: 3 minutesसुरूवातीला क्रेडिट कार्ड हे वापरण्यास सरळ व सोपे वाटत असते. परंतु, क्रेडिट कार्डच्या वापरात अनेक छुपे खर्च लावण्यात आलेले असतात, ज्याची माहिती आपल्याला नसते.  क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकारचे कर व फी आकरली जात असते. जसे की, उशीर केलेले देय, क्रेडिट कार्ड घेतानाची फी, नुतनीकरणाची फी आणि प्रक्रिया शुल्क असे वेगवेगळे छुपे खर्च कार्डवर लावले जातात.