पॅन कार्डमधील चुका दुरूस्त करा आता एका क्लिकवर..!!

Reading Time: 2 minutesपॅन कार्डमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करणे आवश्यक आहे. काही वेळेस नाव, जन्मतारखेमध्ये चुक होऊ शकते. अशा वेळेस त्या चुका दुरूस्त करणे गरजेचे आहे. जर पॅन कार्डमध्ये एका अक्षराची जरी चुक असेल तर पॅन कार्ड अमान्य ठरू शकते. पॅन कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करण्यासाठी देखील ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे ९ महत्वाचे फायदे

Reading Time: 3 minutesतुम्ही देखील क्रेडिट कार्डचा वापर करता का? जर हो, तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. हो, पण त्याच बरोबर क्रेडिट कार्डचा वापर करताना काळजी घेणे देखील गरजेचे आहे. जर क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात देखील अडकू शकता. या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नये याच कारणामुळे अनेक जण डेबिट कार्ड वापरणे पसंत करत असत. परंतु आज अनेक जण क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड वापरताना त्याचा वापर सुयोग्य पध्दतीने करणे गरजेचे असते. क्रेडिट कार्ड वापरण्याचे काय फायदे आहेत ते पाहुया.

भारतीय सैन्याला आर्थिक मदत करण्याचे हे पर्याय तुम्हाला माहित आहेत का ?

Reading Time: 2 minutesज्याच्यामुळे आपण रात्री निश्चिंतपणे झोपू शकतो. त्यांच्यासाठी कृतज्ञ भाव हवाच. ज्या आर्मीमुळे, पॅरामिलिटरी फोर्सेसमुळे, संरक्षक संस्थांममुळे आपण देशाच्या अंतर्भागात निर्भयतेने राहतो, खातो, पितो, मजा करतो त्या संरक्षक फोर्सेसकरिता मनात धन्यवाद देण्याचा भाव असावाच. मग आपल्यासाठी जे जवान स्वतः  सीमेवर जागतात, लढतात, त्यांच्यासाठी आपण काहीही करू नये ?

“व्हॅलेन्टाईन डे”नंतरचे आर्थिक नियोजन 

Reading Time: 3 minutesLoves me … Loves me not…. च्या चक्रातून संत व्हॅलेंटाईनच्या आशीर्वादाने बाहेर पडलेले आणि आपलं ‘रिलेशनशिप स्टेटस’ बदलायच्या विचारात असणारे तरुण तरुणी सध्या स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतील. प्रेमात पडल्यावर सारं जग गुलाबी सुंदर वाटू लागतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ‘कमिटमेंट’ची किंवा लग्नाची वेळ येते, तेव्हा मात्र वास्तवाचा लालभडक रंग समोर येतो. जबाबदारी हा शब्दच आजच्या तरुण पिढीला अवघड आणि अवजड वाटतो. पण विवाहपूर्व आर्थिक नियोजन केल्यास जबाबदारी हा शब्दही गोड वाटू लागेल.

केबल चॅनेल निवड आणि ग्राहकांचा संभ्रम

Reading Time: 3 minutesकशी करायची चॅनेल निवड? निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?  या बदललेल्या नियमांमुळे नक्की काय साध्य होणार आहे? गेले कित्येक दिवस प्रत्येक चॅनेल आपआपल्या चॅनेल पॅकची जाहिरात करत आहे. आपलीच चॅनेल्स कशी  उत्तम आणि स्वस्त आहेत हे पटवून देण्याचा आटापिटा जरी चॅनेल्सकडून होत असला तरी प्रत्यक्ष चॅनेल निवडीबाबत मात्र  ग्राहकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. याचं कारण म्हणजे डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांची याबाबत असलेली उदासीनता. या उदासीनतेचे कारण काहीही असलं तरी त्याचा भुर्दंड मात्र ग्राहक चुकवत आहेत. कंपन्यांच्या हेल्पलाईनवर योग्य ती माहिती उपलब्ध नसणं, ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांना त्याबद्दल माहिती नसणं इथपासून ते अगदी हेल्पलाईन नंबरवर संपर्क न होऊन टीव्ही चॅनेल्स दिसणं आपोआप बंद होणे अशा अनेक प्रकारचे त्रास ग्राहक सध्या सहन करत आहेत.

टीव्ही चॅनेल्स निवडीचा पर्याय आणि ट्रायचे नवीन नियम

Reading Time: 3 minutesट्रायच्या नव्या नियमांमुळे ग्राहक सध्या गोंधळात आहे. नक्की काय करायचं? कोणतं पॅकेज निवडायचं? या साऱ्याबद्दल मनात अनेक प्रश्न आहेत. पण हळूहळू गोष्टी आणखी स्पष्ट होतील. निवडणूकीच्या काळात प्रजा अगदी राजा असते तसंच सध्या टेलिकॉम सुविधांच्या बाबतीत ‘ग्राहकसुद्धा राजा आहे’ असं म्हणायला हरकत नाही.

बँकेच्या वैशिष्टयपूर्ण सवलतींची आपणास माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesकोणतीही सेवा-सुविधा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचायला हवी, हे सामाजिक न्यायाचे महत्त्वाचे तत्व आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सुलभता हा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. अनेकदा असे होतं की खास ग्राहकांसाठी काय सोई सुविधा आहेत हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यांनी त्या दिल्या पाहिजेत त्यांना त्यात विशेष स्वारस्य अथवा जबाबदारीची जाणीव नाही. बँकिंग व्यवहार करताना अशा कोणत्या सोई सवलती खास ग्राहकांना उपलब्ध आहेत याची माहिती घेऊयात.

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना?

Reading Time: 3 minutesप्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक सरकारची महत्वाची कर्ज योजना असून मुद्रा (Micro unit deployment & refinance agency Ltd) या नावाने एक संस्था स्थापन केली असून त्यांनी काढलेल्या कर्ज योजना या मुद्राकर्ज नावाने ओळखली जाते. यातून प्रत्येक उद्योगी गरजवंताला ‘अकृषी उद्योगासाठी’ सुलभ कर्ज मिळू शकते.

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १

Reading Time: 3 minutesयोग्य प्लॅनिंन केल्यास अर्धे काम तिथेच यशस्वी होतं म्हणतात. आपण सहलींचं, सिनेमाला जाण्याचं प्लॅनिंग, बजेट तयार  करतो. अतिमहत्वाचं जे फॅमिली प्लॅनिंग ते सुद्धा करतो. पण एक अत्यंत महत्वाच्या अश्या गोष्टीचं प्लॅनिंग किंवा बजेट तयार करताना बरेचदा कंटाळा करतो ते घरघुती मासिक बजेटचं.

अर्थसाक्षरतेचं एक वर्ष..!

Reading Time: 2 minutesअर्थ!!! सामान्य माणसापासून ते अगदी जागतिक महासत्तेपर्यंत सगळ्यांसाठीच आवशयक असणारा असा हा घटक. अर्थार्जन हा जगण्यासाठी आवश्यक असणारा मूलभूत घटक आहे. आपण कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन व विनियोग करणे खूप आवश्यक आहे. यासाठी गरज असते ती अर्थसाक्षरतेची!