Reading Time: 3 minutes
  • पुलंनी बटाट्याची चाळमध्ये आणि इतर विनोदी कथांमधून चाळ मालकाच्या ‘माणसाचं’ वर्णन केलंय. ज्यात चाळीच्या मालकापेक्षा चाळीच्या मालकाच्या माणसाचाच तोरा अधिक असायचा. अगदी असाच तोरा पूर्वी नव्वदीच्या काळात ‘केबलवाल्या’ माणसाचा असायचा. तो तोऱ्यात यायचा,  मुळात केबल टीव्ही कनेक्शनमध्ये काही अडचण आल्यास हवं तेव्हा बोलावल्यावर यायचाच नाही, पण मासिक भाडे घ्यायला मात्र बरोबर यायचा. मोठ्या जाड्या वायर्स खिडकीतून, गच्चीतून घरात टाकायचा. अशाप्रकारे तेव्हा ‘ग्राहक’ हा केबलवाल्यावर आणि त्याच्या माणसावर पूर्णपणे अवलंबून असायचा.
  • त्यानंतर डिश टीव्ही व सेटटॉप बॉक्स आले आणि नेहमीची मधल्या माणसाची कटकट कमी झाली. गोष्टी डिजिटल झाल्या.  ग्राहक घरबसल्या केबल टीव्हीचे रिचार्जेस करू लागला. गावातील, शहरातील केबलवाल्याचा, त्याच्या माणसाचा, ‘मिडल मॅन’चा तोरा संपला. लोक एअरटेल डिजिटल, सन डिरेक्ट, टाटा स्काय अशा सर्व्हिसेस घेऊन ‘लाईफ झिंगालाला’ करू लागले.
  • पण इथे एक गोष्ट लक्षात यायला वेळ लागला की आपल्या भागातील केबलवाला हद्दपार झालाही पण ‘मिडल मॅन’ मात्र कायम राहिला आणि यावेळी मिडल मॅन तर आणखीच शक्तीवान होता. आपल्या गावातील, भागातील केबलवाल्याला किमान  “पुढील महिन्यात पैसे देतो”, “नंतर देतो” सांगून वेळ मारून नेता यायची. पण आता या “डिजिटल डिस्ट्रीब्युटर” मिडलमॅनला तेही सांगण्याची सोय नाही. तो तर रिचार्ज संपल्यावर सरळ केबल ‘बंद’ करणार. हा मिडल मॅन आपले पैसेही जास्त घ्यायचा, मनमानी करायचा आणि त्याला हवे ते महागडे पॅकेजेस ठरवायचा.  
  • अगदी मागे तर टाटा स्कायने तर आपल्या पॅकेजमधून सोनीचे चॅनल्सच पूर्णपणे बाद केले होते. एकंदर सगळ्या डिस्ट्रिब्युटर्स मिडलमॅनची मनमानी वाढली होती. ग्राहकांपर्यंत कोणते चॅनल्स पोहचावे हे तेच ठरवत.
  • सोनी, झी, स्टार आदी बलाढय मीडिया हाऊस सुद्धा आपले चॅनल्स लोकांपर्यंत पोहचावे म्हणून या टाटा स्काय आदी  मिडल मॅन डिस्ट्रिब्युटर्सवर अवलंबून असायचे. म्हणूनच टिव्हीवर सतत जाहिराती दिसायच्या की आमचे हे हे चॅनल्स तुम्हाला दिसत नसल्यास आम्हाला कळवावे किंवा आपल्या केबल ऑपरेटरविरुद्ध तक्रार करावी.
  • यामुळे शेवटी सूत्र या सगळ्यांच्या बॉसने हाती घेतले. त्या बॉसचं नाव  ‘ट्राय’ (TRAI) अर्थात “टेलिकॉम रेगुलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया”. ट्राय संपूर्ण टेलिकॉमसंबंधित सुविधांचे नियम ठरवते. ट्रायने एक निरीक्षण केलं की एक कुटुंब सर्वसामान्यपणे महिन्याला फक्त शंभरच चॅनल्स बघतं. यामुळे त्यांनी शंभर चॅनल्सचंच्या क्षमतेचं एक डिजिटल पाईप लाईन तयार केली. ज्याची क्षमता घरापर्यंत शंभर चॅनल्स वाहून आणायची आहे. ते चॅनल्स कोणते हे ट्रायने ठरवलं नाहीये.
  • सध्या अमीर खान आणि इतर कलाकारांच्या चॅनल्स पॅकेजेसबद्दलच्या नव्या नियमांची  माहिती सांगणाऱ्या जाहिराती सुरू आहेत. ज्यात मिडलमॅन केबलवाला अगदी सुता सारखा सरळ झालेला दिसतोय.
  • ट्रायने  नवे नियम तर केलेत. पण त्या बदलेल्या नियमांवर अनेकांची नाराजीसुद्धा आहे. ट्रायने प्रत्येक कुटुंबासाठी नेटवर्कची एक अदृष्य डिजिटल पाईपलाईन दिली ज्यात शंभर चॅनल्स समावण्याची क्षमता आहे. म्हणजेच  आपल्या घरापर्यन्त शंभर चॅनल्स आणल्या जातील आणि याचे मासिक भाडे म्हणून १३० रुपये भरावे लागतील.
  • एक लक्षात घेणं गरजेचं की हे चॅनल्स बघण्याचे पैसे नाहीत  तर चॅनल्स घरापर्यन्त आणण्याचे पैसे आहेत. या शंभर चॅनल्समध्ये मग जे चॅनल्स बघायचे आहेत त्याचे वेगळे पैसे भरावे लागतील. त्यात काही चॅनल्स ‘पेड’ असतील. आता या शंभर चॅनल्सच्या चॅनलमध्ये सरकारी सव्वीस चॅनल्स एअर्स फ्री असतील. म्हणजे एकप्रकारे ‘इनबिल्ट’ असतील. मग शंभर मधून सव्वीस गेल्यावर उरते चौऱ्याहत्तर चॅनल्सची सीमा. या चौऱ्याहत्तर क्षमतेमध्ये आपल्याला हवे ते चॅनल्स घ्यायचे आहेत.
  • ट्रायने पेड चॅनल्सला एक नियम घालून दिला आहे की कोणतेही चॅनल १९ रुपयांपेक्षा जास्त भाड्याचं नसावं. यात आणखी एक ग्यानबाची मेख अशी की हे शंभर चॅनल्स सर्व एसडी आहेत.  एचडी (HD) म्हणजे हाय डिमेन्शन नाही. जर एक एचडी चॅनल हवं असेल तर ते दोन एसडी चॅनल्स म्हणून ग्राह्य धरले जाईल. आणि क्षमता फक्त शंभर उणे सव्वीस म्हणजे चौऱ्याहत्तर फक्त. पण या नियमामुळे सर्व डिस्ट्रीब्युटर्स ताळ्यावर आले आहेत.
  • चॅनल्सच्या किंमती कमी झाल्या आहेत. ट्रायने मोठ्या मीडिया हाऊसला आपापल्या चॅनल्सचा बुके तयार करायला परवानगी दिली आहे. म्हणजे झी एंटरटेनमेंटचे तीसेक चॅनल्स आहेत, तसेच सोनी आणि स्टारचेही स्वतःचे तीस चाळीस चॅनल्स आहेत. या सगळ्यांना त्यांचे सर्व चॅनल्स एकत्र करून एक बुके तयार करून ते पॅकेज ग्राहकांना ऑफर करू शकतात. यामुळे ग्राहकांना  चॅनल्सचं भाडंही कमी द्यावे लागतं.म्हणून सध्या सगळीकडे त्याच जाहिराती सुरू आहेत की ‘झी’ला निवडा, ‘सोनी’ला ‘स्टार’ला निवडा.
  • आता काहीं ग्राहकांना हे रुचलं नाहीये की ट्राय कोण होतं आम्ही किती चॅनल्स बघावे?  ते कोण होतं आम्ही शंभरच चॅनल्स बघावे की कमी अथवा जास्त? पण इथे आणखी एक गोष्ट महत्वाची की ग्राहकांना शंभर चॅनल्सच्या पाईपलाईनची क्षमता वाढवता येते. त्यासाठी नाममात्र शुल्क भरावं लागेल.
  • एकंदर ट्रायच्या नव्या नियमांमुळे ग्राहक सध्या गोंधळात आहे. नक्की काय करायचं? कोणतं पॅकेज निवडायचं? या साऱ्याबद्दल मनात अनेक प्रश्न आहेत. पण हळूहळू गोष्टी आणखी स्पष्ट होतील. निवडणूकीच्या काळात प्रजा अगदी राजा असते तसंच सध्या टेलिकॉम सुविधांच्या बाबतीत ‘ग्राहकसुद्धा राजा आहे’ असं म्हणायला हरकत नाही.

“ग्राहक राजा ऐक सांगतो गुपित जपलं रे चॅनल्सचं पॅकेज मनात लपलंय रे…”

ग्राहक सांगतोय ते आता चॅनल्स कंपनींना ऐकावं लागतंय.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2BuQPky)

आमचे इतर काही महत्वपूर्ण लेख:

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १,   पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन  ,  २०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.