केबल चॅनेल निवड आणि ग्राहकांचा संभ्रम

Reading Time: 3 minutes

गेले कित्येक दिवस प्रत्येक चॅनेल आपआपल्या चॅनेल पॅकची जाहिरात करत आहे. आपलीच चॅनेल्स कशी  उत्तम आणि स्वस्त आहेत हे पटवून देण्याचा आटापिटा जरी चॅनेल्सकडून होत असला तरी प्रत्यक्ष चॅनेल निवडीबाबत मात्र  ग्राहकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. याचं कारण म्हणजे डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांची याबाबत असलेली उदासीनता. या उदासीनतेचे कारण काहीही असलं तरी त्याचा भुर्दंड मात्र ग्राहक चुकवत आहेत. कंपन्यांच्या हेल्पलाईनवर योग्य ती माहिती उपलब्ध नसणं, ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांना त्याबद्दल माहिती नसणं इथपासून ते अगदी हेल्पलाईन नंबरवर संपर्क न होऊन टीव्ही चॅनेल्स दिसणं आपोआप बंद होणे अशा अनेक प्रकारचे त्रास ग्राहक सध्या सहन करत आहेत.

कशी करायची चॅनेल निवड? निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?  या बदललेल्या नियमांमुळे नक्की काय साध्य होणार आहे?

  • एक फेब्रुवारी पासून ट्राय टेलिकॉम औथोरिटी रेग्युलेटरी ऑफ इंडियाने निर्देशित केलेले केबल चॅनल्स संबंधित नवे नियम लागू झाले आहेत. पण अजूनही ज्या ग्राहकांनी आपल्या वाहिनींची निवड कळवली नाहीये त्यामुळे आता त्यांना दूरदर्शनचे फ्री टू एअर चॅनल्सच बघावे लागणार आहे. त्यांना पुन्हा नव्वदीच्या काळातील डीडी दूरदर्शन अनुभव येणार. त्या काळात गेल्याचा अनुभव येणार आहे. फक्त दूरदर्शनचा तो गोळा मोठा होत असतानाचा  ‘तो’ आवाज, आणि ‘जिंदगी मिले ना दोबारा’मध्ये रितिक रोशनने आळवलेला ‘तो’ आवाज, ऐकू येणार नाही.
  • ट्रायने निर्देशित केलेले वा लादलेले नियम योग्य की अयोग्य याबद्दल अजूनही अनेकजण गोंधळात आहेत. दिवसेंदिवस नवंनवे टीव्ही चॅनल्स सुरू होत आहेत, त्यानुसार केबलचे, डिटीएचचे शुल्क आपल्या मनानुसार केबल चॅनल्स वितरक वाढवत आहेत. म्हणून ट्रायने नवी नियमावली सुरू केली आहे. यामध्ये आता ग्राहकांना आपल्याला हवे तेच चॅनल्स बघता येणार आहेत आणि फक्त तेवढ्याच चॅनल्सचे शुल्क भरावं लागेल. वरकरणी हा नियम ग्राहकांना आनंददायी वाटतो. पण मेख अशी की फक्त शंभर चॅनल्स ग्राहकांना निवडता येणार आहेत.
  • ज्या कंपनीचा मोबाईल घेतला जातो त्यात त्या कंपनीचे इनबिल्ट एप्स असतात जे डिलीट करता येत नाहीत आणि उगाच जागा अडवून फोन मेमरी कमी करीत असतात. त्याचप्रमाणे या शंभर चॅनल्समध्ये २६ चॅनल्स सरकारी दूरदर्शनचे इनबिल्ट असणार आहेत. उरलेल्या ७४ मध्ये आपल्या चॅनल्सची निवड करायची आहे. या शंभर चॅनल्सला घरात आणण्यासाठी १३० रुपये, जीएसटीचे २४ रुपये धरून १५४ रुपये ग्राहकांना बेसिक रेंटल  भरायचा आहे. यानंतर जे चॅनल्स ग्राहक निवडतील त्यांचे शुल्क भरावे लागतील.
  • एसडी म्हणजे स्टँडर्ड डायमेंशन असलेले चॅनल्सचा जास्तीत जास्त दर १९ रुपये असेल तर हाय डायमेंशन म्हणजे एचडी चॅनल्सचा जास्तीत जास्त दर ६० रुपये असतील. शंभरहुन अधिक चॅनल्स बघायचे असतील तर प्रथम पहिल्या अतिरिक्त २५ चॅनल्ससाठी २० रुपये  नेटवर्क कॅपिटेशन शुल्क भरावे लागेल. म्हणजे शंभर शिवाय २५ चॅनल्सची ‘स्पेस’ विकत घेताना अतिरिक्त २० रुपये भरावे लागतील. त्यानंतर त्या निवडलेल्या २५ चॅनल्सचे चॅनल्स वा मीडिया हाऊसने ठरवलेले शुल्क भरावे लागेल.
  • ग्राहकांनी त्यांना हव्या त्याच वाहिन्यांची निवड केल्यास त्यांचं बिल कमी येऊ शकेल. आता कोणाला शंका निर्माण होऊ शकते की जर व्यक्तीने वर्षभरासाठी वा सहा महिन्यांसाठी डिटीएच, केबलवाल्याचं शुल्क भरलं असेल तर काय? ते पैसे वाया गेले का? तर नाही, ते पैसे वाया गेले नाहीत. १ फेब्रुवारीपर्यंत जुन्या नियमाप्रमाणे आधी भरलेल्या शुल्कातून शुल्क कट करून उरलेले पैसे ग्राहकाच्या खात्यात भरले जाणार आहे. त्यानंतर ट्रायच्या नियमांप्रमाणे शुल्क भरावे लागेल. वाहिन्यांची निवड करावी लागेल.
  • ट्रायने मोठ्या मीडिया हाऊसना आपापल्या चॅनल्सचा बुके पॅकेज करायला परवानगी दिली आहे. त्यानुसार झी, सोनी, स्टार अशा मीडिया हाऊसना आपआपल्या अनेक चॅनल्सचं मिळून एक पॅकेज करून ग्राहकांना ऑफर करता येणार आहे.
  • स्टार चॅनल्स बुके ४९ रुपयात मिळतोय. याबद्दलच्या जाहिराती सध्या सगळीकडे दिसत आहेत. आमिर खान सांगतोय ४९ रुपयात स्टार पॅकेज घ्यायला. डिज्ने या लहान मुलांच्या वाहिन्यांचा बुके १० रुपयात मिळतोय. कार्टून नेटवर्क ज्यात पोगो चॅनल आहे तो साडे चार रुपयात, तर कलर्स समूहाच्या टीव्ही १८ समूहाच्या १९ वाहिन्या पंचवीस रुपयात उपलब्ध आहेत.
  • टेन स्पोर्ट्स वगळता सोनी एंटरटेनमेंटच्या सर्व वाहिन्या ३१ रुपयात, झी चा बुके ४५ रुपयात आहे. १२५ चॅनल्ससह नेटवर्क कॅपासिटीचे १५० रुपये ग्राहकांना भरावे लागतील. वरील सर्व वाहिन्यांचे बुके घेतल्यास १७१ रुपये.  याप्रमाणे जीएसटी सोडून ३२१ रुपये ग्राहकांना दर महिन्याला भरावे लागतील.
  • वरवर पाहता हा निर्णय जरी ग्राहकांना लाभदायक ठरणार असे वाटत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती पाहता ग्राहकांना कमी चॅनेल्ससाठी जास्त रक्कम भरावी लागणार आहे. शिवाय चॅनेल्सनाही या नियमाचा फटका बसणार आहे.

आमचे इतर काही महत्वपूर्ण लेख:

ट्रायच्या नवीन नियमामागचं कारण काय आहे?,    घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १,

पगारच पुरत नाही…बचत कशी करू? विवाहानंतरचे आर्थिक नियोजन 

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *