Cyber Security – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

Reading Time: 2 minutesइंटरनेटच्या जगात आपण रोज अनेक वेग वेगळ्या वेबसाइट बघत असतो, कळत नकळत आपण अनेक ठिकाणी क्लीक करतो,  “Download” असं मोठ्या हिरव्या अक्षरात लिहिलेल्या अनेक पाट्या वेबसाईटवर दिसू लागतात, त्यापैकी एकावर आपण क्लीक करतो आणि जाळ्यात अडकतो … तेही एका चुकीच्या क्लीकमुळे. हा हल्ला करणाऱ्याकडून BeEF (बीफ) हे टूल वापरलं जातं. 

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutesगुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Reading Time: 3 minutesकोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutesतंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो. 

बनावट वाहनविमा योजनेपासून सावध रहा

Reading Time: 2 minutesबनावट विमा योजना विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार विमा उद्योगक्षेत्रात अनेक वर्षांपासून घडत आहेत. विमा व्यवहारातील व प्रक्रियेतील गुंतागुंत, बाह्य यंत्रणावर (थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स) असणारे मोठे अवलंबित्व यामुळे  विमा कंपन्यांना या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ग्राहकांमध्ये विमा योफसजनांबद्दल असलेले अज्ञान आणि विमा ही फायदा नसलेली गुंतवणूक (डेड इन्व्हेस्टमेंट) असल्याचा गैरसमज यामुळे अनेक ग्राहक बनावट योजनांच्या जाळ्यात सापडतात.

कल्कीची मोह‘माया’ – तुम्ही सुरक्षित आहात ना?

Reading Time: 3 minutes“अध्यात्म” म्हणजे नक्की काय? तुम्हाला अध्यात्माची आवड असेल, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या विश्वसनीय ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान मिळत असेल, तर ते जरूर घ्या. पण तुमची मेहनतीची कमाई अशा भोंदू बाबांवर उधळून टाकू नका. परमेश्वराला श्रद्धा महत्वाची आहे. पैसा नाही. तेव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियाला फसव्या मनोवृत्तीच्या मांणसांपासून वाचवा. अशी माणसे आढळल्यास तुमच्या निकटवर्तीयांना सावध करा. शक्य असल्यास पोलिसांची मदत घ्या. सावध रहा, सुरक्षित रहा.

शेअरबाजारः DHFL चे महाभारत

Reading Time: 4 minutesगेल्या आठवड्यात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकदारांना मोठाच धक्का बसला. आपल्या गुंतवणुकीचे मुल्य फक्त एका दिवसांत (०४ जुन २०१९) जेव्हा १०.. २०.. ३०%  आणि (काही दुर्दैवी लोकांनी) ५०% पेक्षा अधिक गमावल्याचे अनेकांना आढळले. आश्चर्याची बाब म्हणजे नुकसानीची ही त्सुनामी शेअर् बाजारांत थेट पैसे गुंतविणाऱ्या ‘ईक्विटी फंड्स’मध्ये नव्हती, तर एरवी सुरक्षित, बॅंकेच्या मुदतठेवी समकक्ष असल्याचे ‘भासवुन विकल्या गेलेल्या ‘गैर ईक्विटी’ योजनांमधे  होती. एका दिवसात झालेल्या नुकसानीची टक्केवारी दाखवणारी खालील आकडेवारी हे चित्र किती विदारक आहे हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

राष्ट्रीय शेअरबाजार: को लोकेशन घोटाळा

Reading Time: 4 minutesमोठा भ्रष्टाचार हा प्रामुख्याने वरिष्ठ पातळीवरून सुरू होतो आणि तळागाळात झिरपत जातो. या घोटाळ्यात राष्ट्रीय शेअरबाजारातील वरिष्ठ लोक, भांडवल बाजार नियंत्रण सेबीने आधी केलेले दुर्लक्ष, त्यामुळे चौकशीस झालेला उशीर, नंतर उचललेली पाऊले, त्यातही कदाचित दुर्लक्ष केलेल्या गोष्टी ज्यामुळे संबंधितांना सिक्युरिटी अपिलेट ट्रिब्युनलकडून लगेचच मिळणारा दिलासा, यामुळेच हा घोटाळा जितका दिसतोय त्यापेक्षा बराच मोठा असण्याची शक्यता जास्त आहे.

पॉन्झी स्कीमच्या सापळ्यात फसलेल्या शांताबाईंची व्यथा

Reading Time: 2 minutesआजची कथा आहे, शांताबाई या एका डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशींची… गेल्या २ वर्षांपासून त्या डॉ. दाते यांच्या दवाखान्यात काम करत आहेत. मनापासून काम करणे, वेळ पाळणे, पेशन्टला औषधे नीट सांगणे यामुळे दाते डॉक्टर अगदी निश्चिन्त असत. त्यांच्या नवऱ्याचं अकाली निधन आणि एक मुलगा आणि मुलीची असलेली जबाबदारी त्यांनी अगदी लीलया पेलली. डॉक्टरांकडचा पगार, नवऱ्याची मिळणारी काही पेन्शन यावर त्या हे सगळं चालवत होत्या. मात्र काही दिवसांपासून असलेला त्यांचा उदास चेहरा काही दातेंच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी शांताबाईंना त्याबाबत विचारलं. आधी फारसं काही न सांगणाऱ्या शांताबाईंचा धीर सुटला आणि त्यांची कहाणी ऐकून डॉ. दाते तर चक्रावूनच गेले