विद्यार्थी दशेतील आर्थिक नियोजन
https://bit.ly/2HZ5U4g
Reading Time: 4 minutes

विद्यार्थी दशेतील आर्थिक नियोजन

विद्यार्थी दशेतील आयुष्य म्हणजे फक्त अभ्यास,मित्र -मैत्रिणी आणि सुट्ट्या याभोवतीच निगडित असते. आर्थिक नियोजन, गुंतवणूक असे शब्द या वयात ठाऊकही नसतात. परंतु, या वयातच काटकसर आणि आर्थिक शिस्त लावून घेतल्यास आर्थिक भवितव्य उज्वल होईल. 

शालू मावशी आज मस्त मूड मध्ये होती. समीक्षाच्या सगळ्या मैत्रिणी शालू मावशी भोवती बसल्या होत्या. समीक्षाची ही आवडती मावशी त्यांना तिच्या कॉलेजच्या गमती जमती सांगत होती. शालू मावशी म्हणजे कमी वयात छान करियर गाठलेली आणि उत्तम आर्थिक स्थिति असलेली सुखवस्तू व्यावसायिक महिला होती. तरुण पिढी सोबत खास जमायचे तिचे. काही मज्जा आठवणी सांगितल्यावर मावशीने प्रश्न केला, कोण कोण आता पासूनच आर्थिक नियोजन करते? सगळ्या एकमेकींकडे पाहायला लागल्या तशी केतकी म्हणाली, मावशी आम्हाला कुठे ग सॅलरी येते नियोजन वैगेरे करायला.

सगळ्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाजा घेऊन मावशी म्हणाली, जरी पगार नसला तरी आर्थिक नियोजनामधल्या काही गोष्टी नक्कीच करू शकता.  विद्यार्थी दशेतील आर्थिक नियोजन करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक चुका टाळणे. यामधल्या प्रमुख चुका म्हणजे –

हे नक्की वाचा: शैक्षणिक कर्ज घेताय? या गोष्टींचाही विचार करा

१. अनियंत्रित खर्च –

  • आवश्यकता नसताना खर्च करणे हे विद्यार्थ्यांकडून बरेचदा घडते. 
  • कधी मित्र-मैत्रिणीने घेतले म्हणून, तर कधी ब्रॅंडेड, प्रीमियमच्या नावाखाली महागड्या वस्तू घेण्याआधी तशाच मात्र कमी किमतीच्या वस्तू  देखील उत्तम असू शकतात हे लक्षात घ्यावे. शिवाय विद्यार्थी दशेत कमी किमतीतल्या वस्तू वापरण्यास नक्कीच हरकत नाही.
  • तसेच, अगदी महागड्या कॅफे मध्ये, मोठ्या हॉटेल्स मध्ये जाण्यापेक्षा तुमचा लोकल कट्टा स्वस्तात ताजे पदार्थ देईल.

२. रिकाम्या वेळेत पैसे न कमावणे –

  • आजकाल ट्युशन्स आणि कॉलेज मधून फारसा वेळ मिळत नसला तरी एखादा तास तर मिळूच शकतो आणि तोही मिळत नसेल, तर व्हॅकेशन मध्ये तुम्ही हे नक्कीच करू शकता. 
  • यात नुसते पैसेच मिळतील असे नाही, तर अनुभव देखील मिळेल ज्याचा तूम्हाला पुढे फायदा होईल.
  • आपल्याला आवडेल असे काम अथवा आपल्या आसपास गरजेची असलेली एखादी सुविधा द्या. 
  • उदा. संगणक साक्षर नसलेल्यांची बिले ऑनलाइन भरून देणे, भाज्या घरपोच पुरवणे, शिकवणी घेणे, लहान मुलांना संगणकाचे ज्ञान देणे, त्यांना आऊट डोअर खेळ शिकवणे, उत्तम फोटो काढून देणे, इत्यादि. 
  • यातून आपल्याला उत्तम मिळकत तर मिळेलच शिवाय अनुभव, वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जुळवून घेता येणे, त्यांच्या स्वभावाचे अवलोकन, वेळेचे नियोजन या सॉफ्ट स्किल मधल्या गोष्टी आतापासूनच शिकता येतील.  

३. कमी बचत करणे अथवा बचत न करणे –

  • या वयात कमवत नसल्यामुळे बचत, आर्थिक नियोजन याकडे फार कमी विद्यार्थी लक्ष देतात. 
  • तेव्हा आपल्याला मिळणार्‍या पैशांमधील थोडी रक्कम नेहमी वाचवून ठेवावी. जेणेकरून जर अचानक मित्रांची पार्टी असेल अथवा कॉलेजची पिकनिक जाणार असेल, कधी मित्र-मैत्रिणींना भेट द्यायची असेल, तर आपल्याला ही रक्कम वापरता येते.

इतर लेख: जर्मन भाषा – का, कशी आणि कुठे? 

४. महिन्याचे बजेट न आखणे –

  • बरेच विद्यार्थी तसेच अगदी तरुण नोकरीधारक वर्ग देखील हे करत नाही. पण यामुळे जास्त खर्च होणे, महिन्याच्या शेवटी खर्चाला रक्कम न शिल्लक राहणे असे नेहमी घडते.
  • महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट आखून घ्यावे आणि त्याचे पालन करावे. शिवाय प्रत्येक वापराचा हिशोब लिखित अथवा मोबाइल मध्ये ठेवावा. यामुळे अतिरिक्त खर्चावर आपोआप प्रतिबंध होतो.
  • जर क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याचा वापर सावधगिरीने करावा. तसेच याचा पण ट्रॅक ठेवावा जेणेकरून झालेल्या खर्चाकडे पाहून आपण अतिरिक्त खर्च करणार नाहीत.

५. शैक्षणिक कर्जाचा चुकीचा वापर –

  • शैक्षणीक कर्ज हे शैक्षणिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असते. मात्र कर्जाची रक्कम हातात आल्यावर अयोग्य कारणासाठी वापरणे नुकसानकारक ठरू शकते. 
  • असे केल्याने आपल्या शिक्षणावर तर परिणाम होईलच मात्र अगदी विद्यार्थी दशेपासूनच आपण कर्जबाजारी व्हाल. तेव्हा कर्जाचा उपयोग ज्यासाठी घेतले त्यासाठीच करणे योग्य ठरते.

६. आर्थिक साक्षरतेकडे दुर्लक्ष करणे –

  • आपल्याला वाटू शकते की विद्यार्थी दशेमध्ये आर्थिक साक्षरतेकडे फारशी लक्ष देण्याची गरज नाही, तर असे मुळीच नाही. 
  • खरे पाहता हेच वय आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि साक्षर बनण्याचे आहे. बँकेमधील व्यवहारांचे ज्ञान असणे, ते मिळवणे, कोणत्याही कागदावर सही करण्याआधी त्यावरील नियम व अटींबद्दल माहिती असणे ती वाचने गरजेचे आहे.       

७. गरजांपेक्षा आवडींवर जास्त खर्च करणे –

  • बहुतेक तरुणांना आपल्याला काय हवे आहे आणि कशाची गरज आहे, यातील फरकच समजत नाही. 
  • नेमके ते आपल्याला हव्या असणार्‍या गोष्टींवर खर्च करतात आणि मग ज्यांची गरज आहे अशा गोष्टी उदा. पुस्तके, फी, येण्या-जाण्याचा खर्च यासाठी त्यांच्या कडे रक्कम राहत नाही. 
  • त्यामुळे यातील फरक समजून घेणे आणि खर्चाचे उत्तम नियोजन करण्याची सवय विकसित करणे गरजेचे आहे.

८. मित्रांचे अंधांनुकर करणे –

  • तिने घेतले ना तर मी पण घेणार, त्याच्या सारखेच घड्याळ हवे होते बघ मला, तू घेतलेला गॉगल आऊट डेटेड आहे हा कर तू ऑर्डर, असे संवाद जिथे घडतात तिथे नक्कीच सोबतच्या मित्र-मैत्रीणिंचे ऐकून/पाहून अनावश्यक खर्च केला जातो. 
  • असे बर्‍याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. कोणासोबत बरोबरी करणे, स्पर्धा करणे टाळायला हवे. पैशाच्या व्यवस्थापनात आर्थिक विवेकीपणा महत्त्वपूर्ण आहे.

संबंधित लेख: भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय 

९. शिष्यवृत्तीची निवड न करणे –

  • आपण जर शिष्यवृत्तीस पात्र असाल तर नक्कीच त्यासाठी अर्ज करावा जेणेकरून तुमच्या शिक्षणाचा पालकांवरील भार कमी होऊन ती रक्कम इतर गरजांसाठी वापरता येईल.

१०. फ्री अथवा कमी पैशात मिळणार्‍या सुविधा/संधीचा उपयोग न करणे –

  • विद्यार्थ्यांसाठी बर्‍याच संधी, सुविधा असतात महाविद्यालयीन परिसरात इंटरनेट सुविधा, अभ्यासासाठी कम्प्युटर लॅब, जिमचे सदस्यत्व, लायब्ररी मधून मिळणारी पुस्तके इ. त्याचा नक्की लाभ घ्या. त्यातून वाचणारी रक्कम इतर गरजांच्या पूर्ततेसाठी वापरा.

११. मूलभूत गोष्टींवर बचत न करणे –

  • काही विद्यार्थी मूलभूत गोष्टींवर अवास्तव खर्च करतात तो जिथे टाळता येईल तिथे टाळायला पाहिजे. स्वतंत्र रूम करून न राहता कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये अथवा सहपाठ्यांसोबत रूम शेअर करणे. संदर्भ पुस्तके मित्रांसोबत विभागून खरेदी करणे. मेसची सुविधा असेल तर तिचा वापर करणे. अशा छोट्या छोट्या बदलांमुळे फार मोठी रक्कम वाचवता येते.

१२. आपल्याला शक्य नसतानाही मित्रांना पैसे देणे –

  • खुपदा आपल्याकडे जेमतेम रक्कम असते मात्र मित्राने मागितल्यावर आपण त्याला देतो. मात्र ती परत मागणे देखील अवघड जाते. शिवाय क्षुल्लक रक्कम असेल तर ती परत दिली देखील जात नाही. मात्र यामुळे तुमचा खर्चाचा अंदाज चुकतो.
  • कधी अनावश्यक गोष्टींसाठी जर आपले मित्र आपल्याकडून पैसे घेत असतील तर ते तात्काळ थांबवा.
  • आपल्या आर्थिक नियोजनामध्ये यामुळे बाधा येत असेल तर अनावश्यक आर्थिक मदत करणे टाळा.

१३. वापरत नसलेले मंथली सबस्क्रिप्शन्स रद्द करणे –

  • खुपदा असे होते की आपण सुरू केलेल्या ऑनलाइन सेवा वापरत नसतात मात्र बँक खात्यासोबत लिंक असल्यामुळे महिन्याला त्या पुन्हा सुरू होतात.
  • तसेच काही सेवा या वेगवेगळ्या कंपण्यांकडून देण्यात येतात. तेव्हा कोणतीही एक निवडली तरी चालते जसे की प्रीमियम मूव्ही साठी आपण अमॅझोन, झी फाईव इ. पैकी एक वापरू शकता. शिवाय बरेचदा फ्री मधल्या सेवांचा देखील लाभ घेता येतो.

१४. उत्तम इंटरनेट / फोन ऑफर न घेणे –

  • आपल्याकडे असलेल्या सीम मध्ये उत्तम ऑफर आहे की नाही हे तपासा आणि आपण जास्त किंमत मोजतो असे वाटत असल्यास ग्राहक सेवा सहाय्यकाला संपर्क साधून उत्तम प्लॅनची माहिती घ्या.  
  • आपल्या गरजेप्रमाणे इंटरनेट आणि कॉलिंग साठी प्लॅन निवडून तो तात्काळ सुरू करुन घ्या.

मावशीने बोलणे थांबवले तशी समीक्षा म्हणाली, मावशी काय भारी माहिती दिलीयेस.

याच्या बदल्यात एक स्ट्रॉंग कॉफी हवीये मला असे मावशी म्हणाली तसे समीक्षा कॉफी आणायला पळाली.

तर मित्रांनो कॉलेज वयात आर्थिक चुका प्रत्येकाकडूनच घडतात. या माहिती मुले त्या काही प्रमाणात कमी होतील अशी अशा आहे. धन्यवाद! 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.