शेअर बाजारातील भावनिक चढ-उतारांचे व्यवस्थापन 
https://bit.ly/2I6ZPCD
Reading Time: 3 minutes

शेअर बाजारातील भावनिक चढ-उतारांचे व्यवस्थापन 

नवशिक्या लोकांना शेअर बाजार ही सहजपणे पैसे कमावण्याची जागा आहे, असे वाटते. पण हे क्वचितच खरे ठरू शकते. शेअर बाजार जटिल घटकांद्वारे नियंत्रित केला जातो. बाजारातील मूलतत्त्वे समजून घेण्यास बराच काळ लागतो. शेअर बाजारातील भावनिक चढ-उतारांचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. एक गुंतवणूकदार म्हणून बाजार कसे काम करतो, हे तुम्ही योग्य रितीने समजून घेतले पाहिजे. त्यानंतर तुमच्या गुंतवणुकीच्या स्थितीचे मूल्यांकन करावे, मग ती अल्पकालीन असो वा दीर्घकालीन. यासोबतच तुम्ही तुमची वैयक्तिक जोखिमीची तयारी समजून घेतली पाहिजे.

शेअर बाजारातील भावनिक चढ-उतारांचे व्यवस्थापन –

हे नक्की वाचा: शेअर बाजार – काही मूलभूत चुका  

नुकसान अपरिहार्य आहे, हे समूजन घ्या: 

  • तुमचा गुंतवणुकीचा प्रवास सुरु करण्यापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये नुकसान अटळ आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. 
  • अगदी अनुभवी आणि प्रसिद्ध गुंतवणूकदारांनीही त्यांच्या आयुष्यात कधी तरी मोठे नुकसान झेलले आहे. 
  • असे धक्के बसल्यानंतरही त्यांनी संयम सोडला नाही आणि पळ काढला नाही आणि अखेरीस ते पूर्वीच्याच विश्वासाने  परत आले. 
  • एक गुंतवणूकदार म्हणून, आणखी एक घटक समजून घेतला पाहिजे तो म्हणजे, नुकसान अटळ असले तरी विचारपूर्वक गुंतवणुकीचे निर्णय घेऊन आपल्याला जोखीम कमी करता येते. 
  • याचाच अर्थ असा की, तुमच्या कष्टाची कमाई कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणे.
  • वाढीची शक्यता वर्तवणाऱ्या कंपन्यांबाबत आपण नेहमी शून्य भावना ठेवली पाहिजे. 
  • वैविध्यपू्र्ण स्टॉक पोर्टफोलिओद्वारे तुम्ही प्राधान्य दिलेल्या स्टॉक्सनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली की नाही हे समजते. 
  • तुमच्या स्टॉक्सनी चांगली कामगिरी केली नसली तरी आपल्याकडे तोटा भरून काढण्यासाठी उर्वरीत भाग असेल. 
  • थोडक्यात सांगायचे तर, आपलला गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना, आपण नेहमीच ‘रिस्क टू रिवार्ड’ गुणोत्तर साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचबरोबर योग्य भांडवल व्यवस्थापनाचे धोरण देखील आवश्यक आहे. 
  • दीर्घकाळ भांडवलाचे संरक्षण केल्याने नुकसान कमी करण्यात मदत होईल. एकूणच, नफा आणि तोटा हा या खेळाचा भाग असला तरी आपण संतुलन साधत जोखीम करू शकतो.

इतर लेख: शेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी? 

स्टॉक मार्केटच्या बुडबुड्यात अडकू नका: 

  • शेअर बाजारातील भावनिक उलथापालथींचे व्यवस्थापन करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे शेअर बाजाराच्या “हवेच्या  बुडबुड्यात” न अडकणे. 
  • ज्या शेअरची कामगिरी चांगली दिसते, त्यावरच लोक विश्वास ठेवण्यास सुरुवात करतात, असे चित्र यामध्ये नेहमी दिसते
  • स्टॉक मार्केटच्या या बुडबुड्याचे एक चक्र असते. त्याचा वेगाने विस्तार होत असतो आणि नंतर आकुंचन पावतो आणि त्याचा शेवट होतो. 
  • या बुडबुड्याच्या स्थितीत गुंतवणूकदारांकडून प्रचंड खरेदी केली जाते. मोठ्या प्रमाणावर त्वरीत नफा मिळवण्याचा एकमेव हेतू उराशी बाळगून बहुतांश गुंतवणूकदार स्टॉक खरेदी करतात ,
  • त्यामुळे या स्टॉक्सची टंचाई निर्माण होते. अशा स्थितीत स्टॉकच्या किंमती उच्चांक गाठतात. 
  • लक्षात ठेवा, स्टॉकच्या किंमतीत वेगाने होणारी वाढ ही कंपनीच्या मूलभूत मूल्यवाढीविना होणारी वाढ आहे. काही काळानंततर, गुंतवणूकदारांना कळते की, त्या स्टॉकमधील वाढ ही व्यवहारिक कारणांशिवाय होती, त्यामुळे ते स्टॉक विक्री सुरु करतात. 
  • शेअर बाजारातील बुडबुड्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समूहाची मानसिकता पुन्हा एकदा दिसून येते. गुंतवणूकदार तत्काळ त्यांचे स्टॉक्स विकायला सुरुवात करतात. पण या वेळी मात्र बाजार घसरायलला सुरुवात होतो आणि अनेक गुंतवणुकदारांना मोठे नुकसान झेलावे लागते. 
  • बाजार पुन्हा सुधारायला सुरुवात होते तेव्हा बुडबुड्यातील हवा जाऊ लागते किंवा तो फुटतो.
  • शेअर बाजाराचा बुडबुडा फुटल्याने बाजाराचे अवमूल्यन किंवा प्रचंड घसरण दिसून येते.
  • गुंतवणुकदारांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत असताना बाजारातील सुधारणेचा दर प्रचंड कमी असतो. 
  • अशा प्रकारे, एक गुंतवणूकदार म्हणून, या बुडबुड्यापासून आपले संरक्षण करणे आ‌वश्यक आहे. तसेच तर्कसंगत संयम कायम राखला पाहिजे. 

हे नक्की वाचा: परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल? 

मूलतत्वांवरील व्यापार: 

  • स्टॉक्सच्या किंमती एका रात्रीत बदलू शकतात, परंतु कंपनीच्या मूलभूत गोष्टी काही तासात बदलू शकत नाहीत. 
  • मूलभूतरित्या मजबूत कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आपल्याला या भावनिक खेळात अडकण्याची भीती नसते. 
  • एखाद्या कंपनीच्या सामर्थ्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आपण बाजारात स्वसमावेशक संशोधन केले पाहिजे. 
  • कोणत्याही कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही मुख्य मापदंड लक्षात घेतली पाहिजेत. 
  • यामध्ये भांडवलीकरण, उत्पन्न वृद्धी, निव्वळ नफा, कर्ज ते इक्विटी गुणोत्तर, किंमत ते उत्पन्न गुणोत्तर, लाभांश देणे, स्टटॉक स्प्लिट्स, विलीनीकरण आणि अधिग्रहण इत्यादींचा समावेश होतो.
  • एक लक्षात घ्या की, कंपनीच्या स्टॉकची किंमत ही कंपनीच्या अंतर्गत मूल्यांद्वारेच ठरत असते. मजबूत मूलतत्त्वे असलेल्या कंपनीवरही शेअर बाजारातील उलथापालथीचा परिणाम होऊ शकतो, परंतु अखेरीस ती तिची शक्ती आणि स्थान पुन्हा मिळवते.

श्री प्रभाकर तिवारी

सीएमओ 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…