Reading Time: 2 minutes

शेअरबाजारात नोंदण्यात आलेल्या कंपन्यांच्या बाबतीत आपण एकत्रीकरण आणि विभाजन (Merger and Demerger) हे शब्दप्रयोग नेहमी ऐकतो एचडीएफसी लिमिटेड ही कंपनी एचडीएफसी बँकमध्ये लवकरच विलीन होणार आहे एचडीएफसीच्या शेअरधारकांचे शेअर रद्द होऊन त्यांच्याकडे असलेल्या 25 शेअर्सच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स मिळतील. यासाठी आवश्यक कारवाई जून 2023 अखेर पूर्ण होईल. अलीकडेच बिईएमएल ह्या कंपनीकडे असलेली बंगलोर आणि मैसूर येथे असलेली स्थावर मालमत्ता वेगळ्या कंपनीकडे हस्तांतरीत झाली. शेअरहोल्डरना त्याच्या बिईएमएल कंपनीच्या संख्येएवढेच नवीन कंपनीचे शेअर्स मिळून त्याचे शेअरबाजारात खरेदी विक्री व्यवहर चालू झाले आहेत. या दोन्ही तशा सर्वसाधारण  घटना असून यापूर्वी आणि नंतरही अशा घटना घडतील. याविषयी थोडी अधिक माहिती जाणून घेऊयात.

          कंपनी कायद्यात विलीनीकरण अथवा विभाजन  याचा स्पष्ट उल्लेख नाही. तर त्यातील खंड पाच विभाग सहामध्ये 390 ते 396 ए मध्ये

तडजोड, व्यवस्था आणि पुनर्बांधणी यासंबंधी तरतुदी आहेत. त्यामुळे सोप्या भाषेत एकत्रीकरण अथवा विलीनीकरण ही एक कायदेशीर तडजोड असून त्याद्वारे दोन किंवा अधिक कंपन्या एकत्रित येऊन वेगळी कंपनी स्थापन होईल किंवा एक किंवा अधिक कंपन्या अन्य कंपनीचा एखादा विभाग आपल्यात सामावून घेतील. विलीन झालेल्या कंपनी अथवा विभागाचे अस्तीत्व राहणार नाही तर ते नवीन कंपनीचे भागधारक बनतील तर विभाजन झाल्यास दोन वा अधिक कंपन्यांचे प्रमाणशीर भागधारक बनतील. एकत्रीकरण आणि विभाजन या परस्परविरोधी क्रिया आहेत. यातील विभाजन होण्याचे मुख्य कारण कंपनीची पुनर्बांधणी किंवा कौटुंबिक व्यवसायाची वारसात विभागणी करण्याची गरज ही कारणे असू शकतात.

हेही वाचा – Financial Planning : तुमच्या पगाराचे आर्थिक व्यवस्थापन कसे कराल ?

            व्यवसायाचा जमाखर्च आणि आर्थिक अहवाल तयार करण्याच्या मान्य पद्धतीनुसार मालमत्ता आणि देणी, प्राप्ती आणि खर्च, रोखता प्रवाह म्हणजेच पैशांची आवकजावक, गुंतवणूक यांची मोजणी एका विशिष्ठ पद्धतीनेच करावी लागते कंपनी कायदा 2013 च्या कलम 133 मध्ये यासंबंधी विविध तरतुदी आहेत ते पाळावे लागतात.

यातील 14 व्या तरतुदीनुसार एकत्रीकरण 2 प्रकारचे आहे

          यातील पहिल्या प्रकारात एक कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन होते तर दुसऱ्या प्रकारात एका कंपनीची अथवा विभागाची खरेदी (अधिग्रहण) दुसरी कंपनी करते.

जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन होईल तेव्हा खालील गोष्टींची पूर्तता करावी लागते-

*एक कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन झाली तर तर तिची मालमत्ता आणि देणी ही विलीन झालेल्या कंपनीत मिळवली जातील.

*विलीन झालेल्या कंपनीचे भागधारक हे विलीनीकरण झालेल्या कंपनीचे विशिष्ट मान्य पद्धतीने आपोआपच भागधारक होतील.

*विलीनीकरण प्रक्रियेत एक शेअरपेक्षा कमी शेअर द्यावा लागत असल्यास त्याची भरपाई पैशात केली जाईल.

*विलीन झालेल्या कंपनीचा व्यवसाय हा विलीनीकरण झालेल्या कंपनीचा व्यवसाय असेल.

*कंपनीचे मूल्यांकन करताना मालमत्ता आणि देणी यांत कोणताही फेरफार केला जाणार नाही. एकाच पद्धतीने दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेची मोजणी करण्यात येईल.

        जेव्हा विलीनीकरण अधिग्रहण करण्यामुळे होईल तेव्हाही मूल्यांकन वरील पद्धतीनेच होईल. फक्त यातील एक दोन गोष्टी कदाचित वगळाव्या लागतील.

आयकर कायद्यानुसार विलीनीकरण हे एक अथवा अधिक कंपन्या विलीन होऊन एक किंवा अधिक नवीन कंपन्या निर्माण होऊन होते त्यामुळे-

*विलीन झालेल्या कंपनीची मालमत्ता ही विलीनीकरण झालेल्या कंपनीची मालमत्ता होईल.

*विलीन झालेल्या कंपनीची देणी ही विलीनीकरण झालेल्या कंपनीची देणी होतील.

*विलीन झालेल्या कंपनीचे भागधारक हे विलीनीकरण झालेल्या कंपनीचे मान्य पद्धतीने आपोआपच भागधारक होतील.

हेही वाचा – Mutual fund asset management  : म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापनासंदर्भात घ्या महत्वाचे निर्णय

  आयकर कायद्यानुसार कंपनी विभाजन ही कंपनी कायद्यातील पुनर्रचना योजना असून विभाजित झालेल्या एक वा अधिक कंपनीत विभाजित होईल त्याप्रमाणे-

*विभाजित कंपनीकडे विभाजन होण्यापूर्वी असलेली सर्व मालमत्ता हस्तांतरीत होईल.

*विभाजित कंपनीकडे  विभाजन होण्यापूर्वीची सर्व देणी हस्तांतरित होतील.

*मालमत्ता आणि देणी याचे मूल्यांकन विभाजित होण्यापूर्वी हिशोबात जे धरले तेच धरण्यात येईल.

*विभाजित झालेल्या कंपनीचे समभाग पूर्वीच्या भागधारकांना प्रमाणशीर पद्धतीने मिळतील.

*विभाजित एक अथवा अनेक कंपन्या निर्माण होऊन जर मूळ कंपनी तशीच राहणार असेल तर त्यास व्यावसायिक विभागणी पुनर्रचना समजली जाईल तर मूळ कंपनी अस्तित्वात राहणार नसल्यास कंपनी बंद न करता झालेली विभागणी समजण्यात येईल.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक ‘मुंबई ग्राहक पंचायत’ या आशियातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य असून लेखातील मते वैयक्तीक समजावीत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…

नववर्षाचा संकल्प हवा पण विकल्पासह…!!

Reading Time: 3 minutes साधारण प्रत्येकाने कधी ना कधी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. कोणी ३१…