सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले असून भारतातही याचे अनेक रुग्ण दिसून येत आहे. जगभरात पसरलेल्या या व्हायरसबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे. काहींनी याबाबत वेगवेगळे गैरसमजही करून घेतले आहेत. कुणी म्हणतं आयुर्वेदिक उपचाराने व्हायरस नष्ट होतो ,कोण सांगतं होमिओपॅथीचे औषध घ्या. पण लक्षात घ्या कुठल्याही गैरसमजुतींच्या आहारी जाऊन चुकीचे पाऊल उचलू नका. कोरोना हे जागतिक संकट आहे. भारताबरोबर इतरही देश याच्याशी लढत आहेत . स्वतःची योग्य काळजी घेऊन हा व्हायरस आपण दूर ठेऊ शकतो.
कोरोनाविषयी महत्वाचे :
- हा एक अत्यंत संक्रमक विषाणू आहे, जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पसरू शकतो. याची लक्षणे कोव्हीड-१९ या विषाणूसारखी आहेत. उच्च ताप, खोकला, थकवा येणे ही काही प्रमुख लक्षणे आहेत.
- ज्या लोकांना संसर्ग होतो ते १० ते १५ दिवसांपर्यंत लक्षणे दिसत नाहीत, परंतु आपण या कोरोना बाधित असलेल्या व्यक्तीपासून १० ते १५ दिवस दूर राहिल्यास आणि शिंक किंवा खोकला असलेल्या व्यक्तीपासून किमान ६ फूट एवढं अंतर ठेवल्यास या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवता येतो.
- कोरोना बाधित व्यक्तीशी आपला संपर्क आल्यास व आपल्या हाताचा स्पर्श आपल्या कान, नाक, डोळे यांना झाल्यास कोरोनाचे संक्रमण लवकर होते.
- कोरोनाचा विषाणू काही पृष्ठभागांवर काही तासांसाठी जिवंत राहू शकतो. तांब्याच्या पृष्ठभागावर हा विषाणू २ तास, तर पुठ्ठ्यावर २४ तास आणि प्लॅस्टिक व स्टेनलेस स्टीलवर दोन ते तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
सोशल मिडियावरून या विषयीच्या बऱ्याच बातम्या किंवा माहिती मिळत असते. पण यामध्ये बरेच गैरसमज देखील पसरवले जात आहेत. याचा चुकीचा प्रसार होऊ नये यासाठी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
१. कोरोना फक्त वयस्कर किंवा लहान मुलांनाच होतो, तरूण लोकांना होत नाही.
- हा एक गैरसमज आहे की कोरोना तरुणांना होत नाही, दुर्दैवाने कुठल्याही वयातील लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकतात.
- उच्च ताप ,कोरडेपणा वाटणे ,थकवा येणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
२. डासांमुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होतो.
- डास चावणे चांगले नसतेच. पण डासांमुळे कोरोना पसरत नाही आणि याबाबत कुठलाही पुरावा नाही. कोव्हिड-१९ हा जीवघेणा विषाणू संपर्कातूनच पसरतो. आणि हा पूर्णपणे संसर्गजन्य रोग आहे.
कोरोना आणि कायदा
३. कोव्हिड-१९ चा विषाणू फक्त उबदार हवामानात टिकतो.
- लोकांनी हा गैरसमज करून घेतला आहे की हा विषाणू फक्त थंड किंवा उबदार हवामानातच टिकतो, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार हा विषाणू कोणत्याही वातावरणात पसरतो.
४. लसूण भरपूर प्रमाणात खाल्ल्याने कोरोनाचा विषाणू नष्ट होतो.
- सोशल मिडीयाद्वारे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हा सल्ला कोरोना व्हायरससाठी योग्य नाही.
- लसूण हे आरोग्यासाठी निश्चित फायदेशीर आहे पण कोरोना रोखण्यासाठी लसूण खावा याबाबत कुठलाही पुरावा मिळालेला नाही.
मन तळ्यात मळ्यात “निर्देशांकांच्या” सापळ्यात….
५. न्यूमोनियाच्या लसीने कोरोना व्हायरसपासून बचावास मदत होते.
- कोव्हिड-१९ हा विषाणूवर कोणतीही प्रभावी लस अद्यापपर्यंत तरी उपलब्ध झालेली नाही. या संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी न्युमोनियाची लस प्रभावी ठरणार नाही.
- न्युमोनियाची लस घेतल्याने कोरोना व्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध होणार नाही.
६. अँटी-बायोटिक्स किंवा पेनकिलर्स घेतल्याने कोरोना बरा होतो.
- आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आयबुप्रोफेन किंवा कुठल्याही अँटी-बायोटिक्समुळे कोरोना व्हायरस बरा होत नाही. असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
- कोव्हिड-१९ ची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.
७. जंतुनाशक फवारणी केल्यास किंवा दारू प्यायल्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होतो.
- दारू प्यायल्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होतो हा सुद्धा मोठा गैरसमज आहे. दारू या व्हायरसला नष्ट करते याबाबत कुठलाही पुरावा नाही.
- बरेच लोक शरीरावर अल्कोहोल किंवा जंतुनाशक फवारत आहेत. याचा कोरोना रोखण्यासाठी काही उपयोग होत नाही कारण कोरोनाचा प्रसार नाकाद्वारे संपूर्ण शरीरांतर्गत होतो, बाहेरून फवारणी करून उपयोग नाही.
कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !
८. मला कोरोनाची तीव्र लक्षणे दिसत नाहीत, म्हणून मला कोरोना झाला नाही.
- सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या मते, संसर्ग झालेल्या एखाद्याच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला कोरोनाव्हायरसची लक्षणे २ ते १४ दिवसांपर्यंत दिसून येत नाहीत. म्हणजे कधीकधी लक्षणे दिसत नसली, तरीही आपणास संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगाचा त्रास होऊ शकतो.
- जर आपल्यास ताप सामान्यपेक्षा जास्त चालत असेल तर कोरडे खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर कृपया आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधायला सांगा आणि कोविड -१ चाचणी करण्याबाबत सल्ला घ्या.
अशा काही गैरसमजांमुळे घाबरून न जाता या काळात शांत राहणे महत्वाचे आहे.योग्य ती काळजी घेऊन कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रतिबंध करायला हवा. आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या .
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/