Reading Time: 3 minutes

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व देशांच्या शेअर बाजाराची अवस्था बिकट झाली आहे. गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. बाजाराची पडझड सातत्याने चालू आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अगोदरपासूनच नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या आपल्या समाजात याबद्दल गैरसमज वाढत चालले आहेत. पण परिस्थिती समजून घेऊन, पूर्वग्रहदूषित विचारांना बाजूला सारून, शांत राहून बाजार वर येण्याची वाट बघत राहणे एवढेच गुंतवणूकरांच्या हातात आहे /असते. लक्षात ठेवा परिस्थिती सतत बदलत राहते. उंच शिखरावर गेल्यावर खाली येण्याशिवाय पर्याय नसतो. बाजाराचेही तसेच असते. त्यामुळे घाबरून न जाता बाजार वर येण्याची वाट बघा.  

शेअर बाजाराबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. यातील अनेकांना शेअर बाजार म्हणजे  काय? हेच माहिती नसत. या लेखात शेअर बाजाराचा संपूर्ण इतिहासापासून ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची, याबाबतची इतंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

शेअर बाजार  म्हणजे काय ?

 • अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर,कुठलीही कंपनी किंवा व्यवसाय चालू करायचा असेल, तर सर्वात आवश्यक असतो तो पैसा किंवा भांडवल. मग हे भांडवल मिळवण्यासाठी व्यवसाय मालकाकडून त्या कंपनीचे सामान भाग केले जातात आणि हे भाग बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतात याच समभागाला ‘शेअर’ असं म्हणतात.
 • शेअर बाजार ही एखाद्या संस्थेप्रमाणे काम करते ज्यामध्ये समभागांची विक्री किंवा खरेदीचे व्यवहार होतात,या व्यवहारांनाच “ट्रेडिंग” असंही म्हणतात. 

योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?

शेअर बाजारांचा वैश्विक इतिहास

 • १२ व्या शतकाच्या कालखंडात फ्रान्समध्ये शेतकरी समुदायाला कर्ज देण्याचे नियोजन फ्रेंच बँका करीत असत.
 • हे काम फ्रेंच बँकांच्या वतीने एका पुरुष गटाने केले आणि त्यांना ‘प्रथम दलाल’ म्हणून संबोधण्यात आले. 
 • १३ व्या शतकाच्या मध्यकाळात व्हेनिस शहरातील व्हॅटिकन बँक अधिकारी सरकारी सेक्युरिटीमध्ये शेअर्सचे व्यवहार करत असत. यामागे काही अफवा पसरवून व्हेनेशिअन सरकारी निधीची किंमत कमी कारण्याचा त्यांचा हेतू होता. हे लक्षात घेऊन व्हेनेशिअन सरकारने या व्यवहारांवर बंदी आणली. 
 • ही कल्पना इतर लगतच्या देशात पसरली व १६व्या शतकाच्या आसपास पिसा, जेनोवा, फ्लोरेन्स आणि व्हेरोनासह इटलीच्या मोठ्या शहरांमध्ये शेअर्सच्या म्हणजे समभागांच्या खरेदी व विक्रीचे व्यवहार केले गेले. 
 • स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स उतरवणारी पहिली कंपनी इटलीची होती. ही कल्पना ,१६व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये पोचली. आज स्टॉक मार्केटची संकल्पना जगभरात सर्वत्र पसरली आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तसेच युनायटेड किंगडम, चीन, कॅनडा, भारत, जपान, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स आणि दक्षिण कोरिया हे सर्व देश शेअर बाजारामध्ये उतरले आहेत. 

भारतीय शेअर बाजारचा इतिहास 

 • भारतात पहिला शेअर बाजार १८७५ साली मुंबईत स्थापन झाला.  हा आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. 
 • पुढे कापड मिलच्या ट्रेडिंगसाठी १८९४मध्ये अहमदाबाद शेअर एक्सचेंजची सुरुवात करण्यात आली. 
 • १९०८मध्ये कलकत्ता स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली, तर १९२० साली मद्रास स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यात आला. 
 • पुढे सुधारणा प्रणालीमधून २४ वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज एकत्रितपणे १९९३ साली स्थापन झालेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE ) द्वारे स्वयंचलित व्यापार प्रणालीनुसार कार्यान्वित झाले. 

शेअर्स खरेदीचं सूत्र

शेअर बाजाराची कार्यपद्धती : 

 • शेअर बाजारात सहभागी असणाऱ्या कंपन्या, व्यवहार करणारे दलाल, व्यापारी व इतर गुंतवणूकदार हे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून शेअर्स किंवा समभागांची विक्री किंवा खरेदी करतात. 
 • प्राथमिक बाजारात (Primary Market) येणारी कंपनी स्वत:चा आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफरिंगद्वारे कंपनाीचे शेअर्स किंवा समभाग गुंतवणूकदारांसाठी खरेदीसाठी खुले करते. 
 • या कंपन्या आपले शेअर्स किंवा समभाग आयपीओद्वारे विकून भांडवल तयार करतात आणि  या भांडवलाचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी करतात. 
 • बहुतेक कंपन्या नवीन कर्ज घेण्यापेक्षा कंपनीचे शेअर्स विकूनच भांडवल उभे करतात. हे शेअर्स दुय्यम बाजारात (Secondary Market) विक्रीसाठी उपलब्ध असतात. 
 • ज्या व्यक्ती अशा कंपन्याचे शेअर्स खरेदी करतात, ते त्या कंपन्यांचे भागीदार बनतात. जर कंपनीला नफा झाला तर तो नफा शेअर्स धारकांना लाभांश स्वरूपात वाटला जातो. 
 • कंपनीचा नफा व व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढत राहिला, तर लोकांनी खरेदी केलेल्या शेअर्सची बाजार किंमत वाढते व शेअर्सची मागणी आणखी वाढते. 
 • कंपनीचा आयपीओ उपलब्ध आहे तोपर्यंत एखादी व्यक्ती कितीही वेळा शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकते. शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारास ‘ट्रेडिंग’ असं म्हटलं जातं.
 • जेव्हा हे खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार केले जातात तेव्हा इतर वस्तूप्रमाणे शेअरची किंमत देखील बदलते. शेअरची किंमत ही शेअरच्या मागणीतील वाढ किंवा घसरण यानुसार ठरते. समभागांची मागणी जशी वाढते तश्या खरेदीच्या ऑर्डर्स सुद्धा जास्त येतात म्हणून स्टॉकच्या किमतीत वाढ होते.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…