Reading Time: 3 minutes

कोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरला. हवाई मार्गाने येऊन याने भारतातही पाय पसरले. संपूर्ण पृथ्वीवर या रोगाने थैमान मांडले आहे. याला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक त्यांचे प्रयत्न करत आहेतच, पण अद्याप यावर योग्य इलाज मिळाला नाही. कोरोनाचे गंभीर परिणाम पृथ्वीवर प्रत्येक सजीव जातीवर दिसून येत आहे. या महामारीचा पृथ्वीवर व सजीवांवर काय परिणाम होत आहे, ते आपण जाणून घेऊ. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

कोरोनाचे मानवी आयुष्यावरील परिणाम 

 • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. याचा परिणाम मानवी आयुष्यावर झाला आहे. 
 • आज बरेच कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक घरी बसूनच काम पहात आहेत, म्हणजे वर्क फ्रॉम होम करत आहेत. 
 • दुसऱ्या बाजूला अनेक लोक या कोरोना व्हायरसच्या संसर्गात आले आहेत, हजारो लोकांचे बळी गेले. कोरोना या महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
 • कोरोनामुळे जगभरातील व्यापार, आयात-निर्यात, नवीन उत्पादन सगळंच ठप्प झालं आहे यामुळे अर्थव्यवस्थेत अराजकता पसरली आहे. 

कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज

कोरोनाचे निसर्ग आणि पृथ्वीवर होणारे परिणाम

 • रोजची वाहनांची गर्दी, वर्दळ, वाहनांचे आवाज, कारखान्याचे आवाज प्रदूषण यासारख्या गोष्टी थोड्याशा काळासाठी तरी नाहीशा झाल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच हा शुकशुकाट जाणवत आहे. 
 • या महामारी विषयीच्या सततच्या बातम्यांमध्ये एक सकारात्मक बातमी म्हणजे आज कित्येक वर्षांनंतर पृथ्वीवरील प्रदूषण कमी झाल्याचे आढळले. हवेत ही स्वच्छता जाणवत आहे. 
 • ब्रिटिश भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणानुसार सुद्धा लॉकडाऊन काळातील आवाजाच्या पातळीमध्ये घसरण  दिसून आली आहे.तसेच फ्रान्स आणि न्यूझीलंडमधील स्थानकांच्याही हे निदर्शनास आले आहे . 

कोरोना आणि कायदा

हालचाली कमी झाल्यामुळे पृथ्वीवरील ध्वनीची पातळी खूप कमी झाली असं आढळून आले. या छायाचित्रात गॅट्विक विमानतळाशेजारील जीएटी-२ हे स्टेशन दिसत आहे. पुढील छायाचित्रात आपण पाहू शकता लॉकडाऊन पूर्वीची म्हणजेच २४ फेब्रुवारीची स्थिती आणि खालच्या छायाचित्रात पाहू शकता, ३० मार्च (सोमवार) पर्यंत काय बदल झाला आहे .  

जाणून घ्या वैज्ञानिक काय सांगताहेत? 

 • लॉकडाऊन, पृथ्वीवरील हालचाली आणि भुकंप यांचा परस्परांशी संबंध आहे असं वैज्ञानिकांच्या निरीक्षणातून समोर आले आहे. 
 • बेल्जियम मधील रॉयल वेधशाळेचे पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष आहे, येथील संशोधक भूगर्भातील ज्वालामुखीय क्रिया, संभाव्य भूकंपाचे धोके, भौगोलिक बदल याबाबत संशोधन करीत आहेत. 
 • त्यांच्या मते, पृथ्वीवरील मनुष्यांच्या हालचाली, रहदारीचे आवाज, कारखाने व इतर व्यावसायिक यंत्रणा यांमुळे कित्येकदा पृथ्वीवर होणाऱ्या संभाव्य भूकंपाचे मोजमाप करण्यात अडथळे येतात.
 • ज्याप्रमाणे भूकंपासारख्या नैसर्गिक घटनांमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो त्याचप्रमाणे वाहने किंवा औद्योगिक यंत्रणांच्या एकत्रित होणाऱ्या आवाजांमुळे पृथ्वीवर कंपने तयार होतात. त्यामुळे भुकंपशास्त्रज्ञांना समान वारंवारता असणा-या भूकंपाच्या लहरींचा अभ्यास करणे कठीण होते. 

लॉकडाऊनचा भूकंपशास्त्रज्ञांना काय फायदा झाला?

 • लॉकडाऊन १७ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत पाळण्यात आले त्यामुळे आवाजाची पातळी ३३ टक्क्यांनी कमी झाली .मनुष्याच्या हालचालींमुळे १ ते २० हर्ट्झ वारंवार असणारी कंपने आता बरीच कमी झाली आहेत.
 • भुकंपसंशोधन वेधशाळेतील निरीक्षणानुसार भूकंपाची आकडेवारी समोर आली आहे, यानुसार ब्रुसेल्समधील कोव्हिड-१९ च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांमुळे मानव-प्रेरित भूकंपाची संख्या एक तृतीयांशने कमी झाली आहे.
 •  याचा सकारात्मक परिणाम म्हणजे भुकंप शास्त्रज्ञांना भूकंपविरोधी यंत्रणा तयार करण्यात यश येत आहे. यामुळे संभाव्य भूकंपाचा व ज्वालामुखीय क्रियांचा चांगल्याप्रकारे अंदाज लावता येऊ शकतो. 
 • इतकंच नाही, तर भुकंपशास्त्रज्ञांना भूकंपाचे संभाव्य धोके असणारी शहरे देखील शोधण्यास मदत होऊ शकते. 
 • वॉशिंग्टन डी. सी. मधील भुकंपशास्त्रामध्ये संशोधन करणारे भुकंपसंशोधक, अँडी फ्रासेटो यांच्या मते, पृथ्वीवर असणारा मानवनिर्मित गोंगाट संपूर्णपणे थांबला तर याबाबतची माहिती अधिक चांगल्याप्रकारे मिळू शकते. 
 • पृथ्वीवरील ध्वनीची पातळी अजुनच कमी झाल्यामुळे भुकंपशास्त्रज्ञांना आणखी फायदा होऊ शकतो तो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी नैसर्गिकरित्या उद्भवणा-या कंपनांचा वापर करू शकतात. 
 • समुद्राच्या लाटा पृथ्वीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या किती वेगाने आदळू शकतील, याचा ज्वालामुखीच्या क्रियांवर काय परिणाम होईल या गोष्टींचा अभ्यास करणे आता शक्य आहे. संवेदनशील परिस्थिती किंवा भविष्यात येणारा काही नैसर्गिक आपत्ती याचाही तर्क लावणे शास्त्रज्ञांना शक्य होईल. 

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे, सक्तीने घरात बसावं लागणार म्हणून कंटाळू नका.वर दिल्याप्रमाणे लॉकडाऊनचे असेही काही सकारात्मक फायदे होऊ शकतात. या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सरकारला पाठिंबा द्यावा व स्वतःची काळजी घ्या. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !