Reading Time: 3 minutes

नुकताच आपला विश्वचषक होऊन गेला आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक घरात, नाक्यावर, टपरीवर आणि सोशल मीडियावर सगळीकडे हे कोण कस खेळलं, कोणी.काय करायला हव होत यांच्या रंगीत चर्चा झाल्या. अशात त्या सगळ्या गोष्टीत आणखी एक गोष्ट सामील झाली, ती म्हणजे वेग वेगळ्या ॲप वरती टीम बनवणे, हवे ते प्लेअर घेऊन त्यांचा परफॉर्मन्स खऱ्याl सोबत तुलना करून पाहणे. त्यावरून एक गोष्ट आठवली, मागे कोणत्यातरी नवख्या उभरत्या फायनान्स इन्फ्ल्यूएंसरने 2-3 ट्विट केलेले. 

ते शब्दशः आठवत नसले तरी त्याचा अर्थ असा काहीसा होता की लोक जितकी मेहनत आणि डोकं क्रिकेट टीम बनवण्यात लावतात (ज्यावर आपल काही नियंत्रण आणि ज्याचा फायदा नाही ) त्याच्या अर्धी जरी मेहनत पोर्टफोलिओ आणि मालमत्ता व्यवस्थापन करताना आपल्या सारखा आर्थिक हुशार देश नाही वगैरे आणि तशाच इतर काही तत्सम ट्विटर अकाऊंट वरती ड्रीम 11 मध्ये अस म्हणून त्यांनी प्लेअर च नाव आणि तसे गुणधर्म असणारा स्टॉक / शेअर मेंशन  केलेला होता. उदाहरणार्थ विराट कोहली = एशियन पेंट्स किंवा K L Rahul किंवा द्रविड म्हणजे ITC इत्यादी.

 

 

नक्की वाचा : डिव्हिडंड मिळणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

 

त्या एका छोट्याश्या ट्विट ने माझ्या डोक्यात इतकं पक्क घर केलं. मालमत्तेचे व्यवस्थापन  किंवा मालमत्ता व्यवस्थापन हा फायनान्स मधली म्हणली तर खूप सोपी आणि म्हणली तर फार जटिल अशी गोष्ट मला फार छान सोपी करून समजून घ्यायला आयपीएल किंवा क्रिकेट टीम फार उपयोगी पडली आणि त्याहून जेव्हा केव्हा कोणाशी ही बोलताना किती पैसे कुठे गुंतवावे हा विषय निघाला की हे उदाहरण घेऊन मी त्यांना ही सांगायचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे ही भाषा खूप लवकर कळते. म्हणजे माझा स्वतः चा अनुभव आहे की एखाद्याला हे समजावून सांगणं की बाबा सगळे पैसे फक्त शेअर्स किंवा फक्त FD किंवा LIC Policies मधे नको टाकू सगळ्यामध्ये थोडे थोडे टाक अस सांगण्यापेक्षा बाबा रे सगळे पैसे चांगले batsman खरेदी करण्यात उडवू नकोस काही पैसे चांगले बॉलर खरेदी करायला पण ठेव आपली इच्छा असो नसो टीम चांगली पाहिजे तर काही फलंदाज काही गोलंदाज आणि एखाद दोन अष्टपैलू हवेत अस सांगणं जास्त सोपं आहे.

 

 

नक्की वाचा : Success Story of ITC-‘आयटीसी’ची यशोगाथा

ITC किंवा तत्सम एखादी उत्तम कंपनी पण मार्केट सोबत फार हिंदोळे न खाणारी कंपनी आपल्याकडे का असावी हे पटवून देण्यापेक्षा लोकांना आपल्या टीम मधे एखादा राहुल द्रविड किंवा K L का असावा असा प्रश्न विचारून पाहा ते स्वतःच उत्तर देतील की सगळे चालताना हे चालतील की नाही खात्री नाही पण सगळे गडगडले तरी हे गडगडायची शक्यता फार कमी, अगदी भिंती सारखे वाचवतील. आता त्यांना ITC बद्दल बोलून पाहा चौकार षटकार न घेणारे पण लाभांश सारखे सिंगल घेत राहून स्कोअरबोर्ड हलता ठेवणे किती महत्वाचं आहे ते. सचिन तेंडुलकर किंवा आता विराट कोहली हे सलग 2-4 मॅच जरी खराब खेळले तरी त्यांना टीम मधून काढून टाकू असा विचार कोणाच्या मनात येईल का? आपण काय म्हणू अरे सध्या त्याला जरा चिंतेने त्रासलय किंवा त्याचे दिवस नाहीयेत सध्या.कारण आपल्याला विश्वास असतो की काही आठवडे जातील पण हे खेळतील हे त्यांनी वर्षा नु वर्ष सिद्ध केलंय. हा युक्तीवाद करून तुम्ही एशियन पेंट्स किंवा TCS किंवा reliance यांचं आपल्या पोर्टफोलिओ मधे काय महत्व आहे हे पटवून देऊ शकता.

 

नक्की वाचा : TCS: गुंतवणूकदारांना १७ वर्षांत ३०००% परतावा

 

 

Health Insurance घेणे हे कित्येक लोकांना वायफळ खर्च किंवा काय गरज आहे अस वाटत. लगेच कुठे मला काय होणारे वैगेरे. पण काय होत एखाद वेळी शोएब अख्तर किंवा मलिंगा ला हेल्मेट शिंवाय खेळल तर अस म्हणल तर लोक मुर्खात काढतील, त्यांचा एक बॉल चुकून बसला अंगावर तर गेलोच की. तसच चुकून तुम्हाला काही झालं तर गेलोच की. धोकादायक असले तरी काही ठिकाणी स्मॉल किंवा मिड कॅप म्हणजे लहान किंवा मध्यम कंपनी चे शेअर्स ला पैसे का गुंतवावे तर मुंबई इंडियन्स ही अंबानी ची टीम त्याच्या कडे चिक्कार पैसा आहे म्हणून तो फक्त महाग खेळाडू घेतो अस आहे का? तर नाही नवीन छोट्या खेळाडू वर पण तो पैसे लावतोच. कारण जे आधीच मोठे आहेत त्यांना पाचपट पैसे दिले म्हणजे ते जादू करून मॅच आणतील अस नाही ते पण चुकू शकतात. पण हे छोटे खेळाडू जे स्वस्त मिळतात आणि आपल्या जीवाची बाजी लावून स्पर्धेत उतरतात ते जास्त गतीने वाढतात. त्यांची वाढ ही बाजारात कमी वाटत असली तरी आपण मोजलेल्या किमतीच्या मानाने बरीच फायदा देते. जसं की मोठा बॉलर 5 कोटिना घेतला आणि एक नवखा 50 लाखात, 5 कोटी वाल्याने स्पर्धेत 25 विकेट घेतल्या आणि नवख्याने 10 च घेतल्या. तरी प्रत्येक विकेट ची किंमत ही 5 कोटी साठी महाग च पडली. हे गणित लवकर कळण्यासारखं आहे.

 

नक्की वाचा : Health Insurance Premium – तुमचा आरोग्य विमा प्रीमियम कमी कसा कराल ?

 

पण इतकं डोकं लावायला कोणी तयार नाही आणि तयार असेल तरी तितकी हिम्मत नाही का? तर तिथे खिशातला पैसा आणि तो जाईल ही भीती आहे. मग त्याला कारण काय द्यायचं तर ते कळत नाही, ते चुकीचे आहे किंवा ते सामान्य माणसाचं काम नाही वैगरे. पण माझ्या अल्पमतीला एक कळत की एखाद बॅटिंग पिच असत किंवा बॉलिंग असत. त्यानुसार आपण कस मैदानात उतरायचं हे आपण ठरवू शकतो पण एखाद पीच कोणासाठी च नाही अस नाही होऊ शकत. त्यामुळे इकॉनॉमी म्हणजे पीच कस आहे, महागाई दर म्हणजे किती रन रेट हवा, क्रीज मधे म्हणजे नियमात राहूनच बॉलिंग किवा बॅटिंग करायची नाहीतर रन आऊट किंवा वाईड पक्क आहे. पंच म्हणजे सेबी किंवा तक्रार निवारण केंद्र आहेत जे कोणावर शक्यतो अन्याय होऊ देत नाहीत. क्रिकेट असो किंवा आर्थिक आयुष्य महत्वाचं काय आहे तर स्कोअरबोर्ड हलता ठेवण आणि विकेट बचावून ठेवण.

©प्रसन्न कुलकर्णी

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…