Cyber Security
सध्याच्या काळात सायबर सुरक्षा (Cyber Security) हा शब्द इंटरनेटच्या जगात सर्वात महत्वाचा शब्द आहे. आपण रोज अनेक वेगवेगळ्या वेबसाईट बघत असतो, त्यांना भेट देतो. फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून आपण इतर अनेक वेबसाईट्स वर जातो, कधी तिथे डाउनलोड करतो, किंवा फक्त मजकूर वाचतो. हे सगळं करत असताना आपल्या कळत नकळत आपण अनेक ठिकाणी क्लीक करतो, “Download” असं मोठ्या हिरव्या अक्षरात लिहिलेल्या अनेक पाट्या वेबसाईटवर दिसू लागतात, त्यापैकी एकावर आपण क्लीक करतो आणि जाळ्यात अडकतो … तेही एका चुकीच्या क्लीकमुळे.
महत्वाचा लेख: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?
नक्की काय होतं? जाणून घेऊया.
- हा हल्ला करणाऱ्याकडून BeEF (बीफ) हे टूल वापरलं जातं.
- यामध्ये फक्त एका ओळीचा कोड असतो, त्या कोडच्या स्क्रिप्ट मुळे ते पूर्ण पान एक हुक बनते.
- जेव्हा आपण हे पान(वेबपेज) उघडतो, त्याच क्षणी आपले ब्राऊजर या हुक मध्ये अडकते.
- त्यानंतर आपल्या ब्राऊजरचा पूर्ण ताबा हल्लेखोराकडे जातो आणि हे आपल्या डोळ्यादेखत घडत असूनही ते आपल्याला समजूनही येत नाही.
- अशा पेजेसवर आपण जातो, तेव्हा समोर एकतर वेगळंच काहीतरी उघडलेले असते किंवा आपण एका वेबसाईटकडून दुसऱ्या वेबसाईटकडे वेगाने जवळजवळ फेकलेच जात असतो.
- काहीतरी विचित्र घडतंय असं वाटून आपण ते वेबपेज बंद करून टाकतो आणि दुसरं काहीतरी उघडतो. पण, आपले ब्राऊजर त्या ‘हुक’मध्ये आधीच अडकलेले असते.
- एकदा आपले ब्राऊजर हुक मध्ये अडकले की तिकडून लांब कुठेतरी बसलेला हल्लेखोर आपण काय करतोय ते बघू शकतो.
- आपण कोणते वेबपेज उघडले आहे, काय डाउनलोड करतो आहे इ. तसेच हल्लेखोर आपल्याला वेगवेगळे फसवे संदेशही देऊ शकतो, जसे – तुमचे फेसबुक अकाउंट लॉग आउट झाले आहे ते लॉगिन करा, अशी हुभेहुब फेसबुक सारखी दिसणारी पाटी येते, आणि त्यात लॉगिन केले तर तुमचा इमेल आणि पासवर्ड हल्लेखोरला अगदी सहज मिळतो.
- याशिवाय ब्राऊजर अपडेट करा किंवा तुम्ही भारीतला मोबाईल जिंकला आहे, अशा स्वरूपाच्या पाट्या देखील अचानक झळकू लागतात.
हे नक्की वाचा: सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स
Cyber Security: या हुक करणाऱ्या पेजची लिंक येते कुठून?
- हल्लेखोराकडून ही लिंक एकतर इमेलद्वारे किंवा अगदी व्हाट्सएपद्वारे पाठवली जाते.
- येथे क्लिक करा आणि आनंदाची बातमी मिळवा, किंवा लॉटरी जिंका किंवा यासारखी कुठली तरी आश्चर्यकारक हेडलाईन दिलेली असते आणि खाली लिंक असते किंवा ‘फ्लिपकार्ट, ऍमेझॉन वर रु. ४९९ ला ४० हजाराचा मोबाईल विकत घ्या या लिंक वर क्लिक करून’, कधी कधी ती लिंक शॉर्ट केलेली असते, जसे bit.ly किंवा goo.le इत्यादी.
- आपण सहज विश्वास ठेवून क्लीक करतो आणि नुसतं क्लीक केल्याने काय नुकसान होणार आहे, असा अनेकांचा विचार असतो. पण ही चूक खूप महागात पडू शकते.
- जर तुम्ही कधी अशा हुकच्या जाळ्यात अडकला तर सर्वात आधी आपण या जाळ्यात अडकलाय हे लक्षात यायला हवं, त्यानंतर तुमच्या ब्राऊजरचे हिस्टरी, कुकीस आणि Cache पुसून टाका – ब्राऊजरच्या सेटिंग्जमध्ये ती सोय दिलेली असते. जर नाही जमले तर ते ब्राऊजर अन इन्स्टॉल करा आणि नवीन टाका.
आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात असते.
ओंकार गंधे.
सायबर सुरक्षा विश्लेषक व डिजिटल मार्केटिंग सल्लागार
९४२२५८३७३९
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: BeEf mahnje kay? Marathi, sayber suraksha mhanje kay marathi, cyber crime marathi,
4 comments
आपले लेख हे सर्वसामान्य व्यक्तीला समजतील अश्या भाषेत त्याची मांडणी केलेली असते
मला आपले लेख खूप आवडले .
धन्यवाद ..
धन्यवाद
अरे बापरे … पण चांगली माहिती.
More effective if available in English.
आपले लेख मी आवर्जून वाचतो .खूपच माहितीपूर्ण लेख असतात आपले ..खरं तर लेखा मधून लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत मिळते खूप खूप धन्यवाद आणि अशीच माहिती देत रहा