Reading Time: 2 minutes

इंटरनेटवरून व्यवहार करताना अनेकदा अवचित धक्के बसतात. नको असलेले पर्याय पदरात पडतात. जास्तीचे बिल लागते. भलतीच विंडो समोर उघडली जाते आणि आपण तिथून व्यवहार करू लागतो. असे अनुभव आलेत तुम्हाला ?

 

इंटरनेटचा वापर आता सर्रास सर्वजण करतात. जे जे जो प्लॅटफॉर्म वापरतात, त्याविषयी त्यांना पूर्ण माहिती सहज समजेल, असे त्यातून अपेक्षित आहे. झटपट मिळणारी माहिती आणि ग्राहकाभिमुख रचना असे प्रत्येक प्लॅटफॉर्मचे वैशिष्ठ असते. मात्र आता हा वापर तितकासा सोपा राहिलेला नाही. गुगल, मेटा, अॅमेझॉन, लिंकडीन यासारख्या अनेक फर्म त्याच्या वापरकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध युक्त्या योजत आहेत. लोकांनी कंपनीस अपेक्षित लिंकवर क्लिक करावं, त्यांना अपेक्षित असाच मजकूर पहावा यासाठी इंटरनेट तज्ञांनी वापरकर्त्यांना दिसणारे दृश्य आणि त्यानुसार त्यांचा संभाव्य प्रतिसाद यांचे विविध पॅटर्न शोधले आहेत. त्याद्वारे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी संबंधित संकेतस्थळाची रचना जरा किचकट केली जाते. यालाच ‘डार्क पॅटर्न’ म्हणतात. ग्राहकांच्या निवडीवर ऑनलाइन प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिझाइन तंत्रासाठी हा शब्द वापरला जात आहे. त्यामुळे आपली दिशाभूल होऊ शकते.

 

उदाहरणार्थ-

★अकाऊंट सेटअप करताना तुमचे कॉन्टॅक्ट मिळवले जातात, परवानगी घेतली जाते. हे सर्व अगदी बेमालूमपणे. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे परिचित यांना विविध ठिकाणाहून मेल येण्यास सुरुवात होते. ते थांबवता न आल्याने महत्त्वाचे ईमेल मागे पडून अनावश्यक मेलने मेलबॉक्स भरून जातो.

★तुम्हाला आकर्षक ऑफरसह क्रेडीट कार्ड दिलं जातं, नंतर त्याची फी परस्पर बँकेतून कापली जाते, जी तुमच्या बरेच दिवसांनी लक्षात येते.

★तुम्ही सर्फिंग करत असताना वेगळीच पॉप अप विंडो ओपन होते. साइन इन करण्यास सांगणारी विंडो बंद करता येत नाही.

★अकाऊंट सेटअप करताना तुमचे कॉन्टॅक्ट मिळवले जातात, परवानगी घेतली जाते. हे सर्व अगदी बेमालूमपणे. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे परिचित यांना विविध ठिकाणाहून मेल येण्यास सुरुवात होते. ते थांबवता न आल्याने महत्त्वाचे ईमेल मागे पडून अनावश्यक मेलने मेलबॉक्स भरून जातो.

★तुम्हाला आकर्षक ऑफरसह क्रेडीट कार्ड दिलं जातं, नंतर त्याची फी परस्पर बँकेतून कापली जाते, जी तुमच्या बरेच दिवसांनी लक्षात येते.

★तुम्ही सर्फिंग करत असताना वेगळीच पॉप अप विंडो ओपन होते. साइन इन करण्यास सांगणारी विंडो बंद करता येत नाही.

★अनेक वस्तूंची एकत्रित खरेदी करताना त्यात न मागवलेली कमी किमतीची वस्तू ऍड होते. ती परत करून पैसे मिळवण्याच्या भानगडीत ग्राहक पडत नाहीत.

★वस्तूची किंमत कमी दाखवून त्यात कर, हाताळणी खर्च असे काही खर्च मिळवून बिल अधिक रकमेचे केले जाते. दोन-तीन वेगवेगळ्या वस्तू एकत्रित घेण्यास भाग पडेल अशी किंमत ठेवली जाते.

★चुकीचे मार्गदर्शन करणारे संदेश पाठवले जातात. सातत्याने नोटिफिकेशन पाठवत राहतात.

★अनावश्यक जाहिराती सातत्याने दिसतात.

★तुम्ही प्रवासासाठी तिकीट खरेदी करत असताना त्याबरोबर इन्शुरन्स दिला जातो. हो हवा म्हणून टिकमार्क डिफॉल्टमध्ये केलेले असते. नको असल्यास तो मार्क काढून टाकावा लागतो. अनेकदा घाईघाईने बुकिंग करताना या टिकमार्क बारकाईने पाहिल्या जात नाहीत.

 

अशा अनैतिक पद्धतीने ग्राहकांणा बेसावध ठेवून फसवणूक करून व्यवसाय वाढवला जातो. डिजिटल माध्यमातून होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी जाहिरातदारांची स्वयंनियंत्रण संस्था ‘आस्की’ यांनी एक पाऊल पुढे टाकून अलीकडेच या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. सर्व जाहिरातदारांनी एक सप्टेंबर २०२३ पासून त्याचे पालन करण्याचे आवाहन ‘आस्की’ ने केले आहे. यात ‘डार्क पॅटर्न’ म्हणजे काय हे विशद करण्यात आले आहे. असे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रणकक्ष निर्माण करण्यात येणार आहे, त्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाची मदत घेण्यात येणार आहे.

 

आपण ग्राहकांनीही सजग राहून व्यवहार केले पाहिजेत, जेणेकरून ‘डार्क पॅटर्न’च्या काळ्या जाळ्यात आपण अडकणार नाही!

©️उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी असून लेखातील मत्ते वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.