Derivatives on Financial Services Index
https://bit.ly/38mDvj8
Reading Time: 3 minutes

Derivatives on Financial Services Index 

Derivatives on Financial Services Index म्हणजेच व्युत्पन्न करार हे वेगळ्या प्रकारचे भविष्यवेधी करार असून त्याच्या वापर आर्थिक साधनात केला जातो. समभाग, कर्जरोखे, निर्देशांक, विविध वस्तू, चलन, व्याजदर यातील बाजारभावात भविष्यात पडणाऱ्या फरकामुळे आपले किमान नुकसान व्हावे या हेतूने त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामधील भावात सातत्याने चढ उतार होत असल्याने यात गुंतवणुकीच्या अनेक संधी निर्माण झाल्या त्यामुळेच आज बाजारात सर्वाधिक उलाढाल ही अशा करारात केली जाते. 

विशेष लेख: शेअर ट्रेडिंग: मार्जिन प्लेज व अनप्लेज – नवीन नियम

Derivatives on Financial Services Index 

  • भविष्यवेधी करार नियंत्रित बाजार अस्तीत्वात नसलेल्या काळापूर्वी विश्वासाने होत असत. आजही खाजगीरीतीने असे करार होत असतात. हे करार जगभरात 4 पद्धतीने केले जातात. फॉरवर्ड, फ्युचर, ऑप्शन, स्वॅप. 
  • यातील फॉरवर्ड आणि फ्युचर हे करार जवळपास सारखेच आहेत. फ्युचरचे करार एकसमान नियंत्रित पद्धतीने भांडवल बाजार, वस्तू अथवा चलन बाजारात केले जात असल्याने ते निश्चित पूर्ण होतील याची खात्री असते. 
  • यातील स्वॅप या प्रकारचे करार भारतीय बाजारात  होत नाहीत. 
  • जे फॉरवर्ड करार बाजाराच्या माध्यमातून केले जातात त्यांना आपण फ्युचर असेच म्हणतो.
  • भारतात अस्तित्वात असलेल्या 2 आंतरराष्ट्रीय आणि अन्य 9 मान्यताप्राप्त शेअरबाजार व वास्तुबाजारापैकी 8 बाजारात त्याचे व्यवहार होत असतात. 
  • राष्ट्रीय शेअरबाजारात एकूण 2 लाख कोटी रुपयांच्या आसपास रोज व्यवहार होतात. यातील सर्वाधिक उलाढाल व्युत्पन्न व्यवहारात होत असून एकूण व्यवहाराच्या 67% हून अधिक वाटा अशा व्यवहारांचा आहे. त्यामुळेच बाजार नियामक समिती यात अधिकाधिक व्यवहार कसे होतील यादृष्टीने प्रयत्न करीत असते. 
  • सध्या 140 समभाग, निफ्टी व बँकनिफ्टी या दोन निर्देशांकात व्यवहार करता येतात. 
  • एकूण व्यवहारातील 33% हून अधिक व्यवहार हे इंडेक्स फ्युचर आणि ऑप्शन यामध्ये होतात.
  • येत्या सोमवारपासून म्हणजे 11 जानेवारी 2021 पासून फायनान्सशियल सर्व्हिसेस या निर्देशांकावर आधारित डेरिव्हेटिवचे फ्युचर व ऑप्शन यामधील साप्ताहिक व मासिक व्यवहार सुरु होतील. 

विशेष लेख: काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

Derivatives on Financial Services Index: राष्ट्रीय शेअर बाजार

  • आपल्याला हे माहिती आहेच की बाजार व्यवहार संख्या आणि उलाढाल याबाबत राष्ट्रीय शेअर बाजार अव्वल क्रमांकावर आहे. 
  • व्युत्पन्न व्यवहार संख्येबाबत प्रथम तर रोखीच्या व्यवहारात राष्ट्रीय शेअरबाजार तिसऱ्या स्थानावर असल्याचे वर्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंज यांनी अलीकडे म्हटले आहे. 
  • व्यवहार संख्या वाढली असली तरी उलाढालीबाबत आपण खूपच मागे आहोत परंतू हळूहळू आपले स्थान उंचावत आहोत.
  • निफ्टी 500 या निर्देशांकात 33.5% वाटा हा आर्थिक सेवा क्षेत्राचा आहे. 
  • आर्थिक सेवा क्षेत्राचे प्रतिबिंब प्रवर्तित करणाऱ्या महत्वाच्या 20 कंपन्यांचा आर्थिक सेवा क्षेत्र  निर्देशांकात समावेश आहे. 
  • यात बँका, वित्तसंस्था, गृहकर्ज कंपन्या, विमा कंपन्या व अन्य आर्थिक सेवा कंपन्यांचा समावेश आहे. उतरत्या प्रभावानुसार निर्देशांकात समाविष्ट कंपन्या खालीलप्रमाणे-
    • HDFC Bank 
    • HDFC 
    • Kotak Mahindra Bank
    • ICICI Bank
    • Bajaj Finance
    • SBI
    • Axis Bank
    • Bajaj Finserv
    • HDFC Life Insurance
    • SBI Life Insurance
    • ICICI Prudential life Insurance
    • ICICI Lombard General Insurance
    • HDFC AMC
    • Bajaj Holdings
    • Piramal Enterprises
    • Power Finance
    • Cholamangalam
    • REC
    • Shriram Transport
    • M&M Financial Services
  • या निर्देशांकाने गेल्या 5 वर्षात 15% अधिक परतावा गेल्या गुंतवणूकदाराना दिला आहे. आर्थिक सेवा क्षेत्राचे योग्य प्रतिनिधित्व यातून होते.
  • यातील ऑप्शन व फ्युचर्स दोन्ही प्रकारातील 4 साप्ताहिक करार 3 मासिक करार गुंतवणूकदारांना उपलब्ध होऊन 40 च्या पटीत फायनान्सशियल सर्व्हिसेस निर्देशांकांचा 1 गुंतवणूक संच (lot) असेल. 
  • साप्ताहिक करार त्या आठवड्यातील गुरुवारी तर मासिक करार महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पैशांची अंतिम देवाण घेवाण करून समाप्त केला जाईल. 
  • या दिवशी नियमित सुटी आल्यास केवळ सदर करार कामकाजाच्या आधीच्या दिवशी समाप्त होईल. 
  • प्रथमच निर्देशांकावर आधारित फ्युचर्स या प्रकारातील साप्ताहिक स्वरूपाचे करार यानिमित्ताने आपल्याकडे सुरू होत आहेत. 
  • अलीकडेच उपलब्ध झालेल्या आकडेवारी नुसार विदेशी गुंतवणूकसंच (FPI) गुंतवणूकदारांनी 48% हून अधिक गुंतवणूक आर्थिक सेवा क्षेत्रात केली असून रोजच्या एकूण उलढालीच्या 35% गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूकदारांची आहे. 

अनेक मालमत्ता नियोजन कंपन्यांकडे (AMC) आर्थिक सेवा क्षेत्रास महत्व देणाऱ्या योजना असून या कंपन्यांचे भाव तुलनात्मक दृष्टीने सातत्याने वर खाली होत असल्याने भावातील फरकाने नफा मिळवण्याच्या दृष्टीने, हेंजिग करण्याच्या हेतूने, याकडे  अधिक लक्ष दिले जाईल त्यामुळेच सर्वच प्रकारच्या गुंतवणूकदारांचा यास चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Derivatives on Financial Services Index Marathi Mahiti, Derivatives on Financial Services Index in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…