Diderot Effect: तुम्ही “डिडरोट इफेक्ट” बाधित तर नाही ना?

Reading Time: 3 minutes

Diderot Effect

डिडरोट इफेक्ट (Diderot Effect) ही संकल्पना वस्तूंच्या खरेदीशी निगडित आहे. ही संकल्पना तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा अनुभवली असेल. परंतु, याच्या दुरोगामी परिणामांबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. ही थिअरी तुमच्या आर्थिक परिस्थितीत कमालीचा बदल घडवू शकते. 

डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)

 • ऑनलाईन खरेदी करताना तुम्हाला अनेकदा तुम्ही बघत असलेल्या वस्तूच्या संबंधित वस्तू सतत डिस्पले होत राहतात किंवा त्या वस्तू एकत्र घेतल्यास काही डिस्काउंट दिले जाते. उदा. जर तुम्ही मोबाईल खरेदी करत असाल, तर त्यासोबत मोबाईल कव्हर, स्क्रिनकार्ड, हेडफोन अशा वस्तूंची एकत्रित खरेदी सुचविली जाते किंवा त्यावर डिस्काउंट नावाचे अमिश दखवले जाते. 
 • या इतर वस्तूंची आवश्यकता प्रत्येकवेळी असतेच असं नाही. याचबरोबर अगदी ऑफलाईन खरेदी करतानाही दुकानदार हीच क्लुप्ती वापरतात. 
 • समजा तुम्ही एखादा ड्रेस खरेदी केला, तर त्यावर मॅचिंग कानातले, गळ्यातले, ब्रेसलेट, इ. वस्तू  गोड बोलून तुमच्या गळ्यात मारले जाते. हा अनुभव जवळपास सर्वानीच घेतला असेल. 
 • ही केवळ एक व्यापारी प्रथा नाही तर ही माणसाच्या मानसिकतेशी निगडित एक थिअरी आहे यालाच “डिडरोट इफेक्ट” असं म्हणतात. 

डिडरोट इफेक्ट आणि आर्थिक परिस्थितीमध्ये होणारी प्रचंड उलथापाथ

 • रशियामध्ये डेनिस डिडरोट नावाची एक गरीब व्यक्ती राहत होती. डेनिस यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी भरपूर पुस्तकं खरेदी केली होती. आयुष्यभर त्यांनी इतकी पुस्तकं वाचली की या पुस्तकांचे त्यांचे स्वतःचे असे एक ग्रंथालय बनवले होते. 
 • डेनिस यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीतच गेले. परंतु, 1765 हे साल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. 
 • 52 वर्षांचे डेनिस आपल्या आयुष्यभराच्या गरिबीला कंटाळले तर होतेच परंतु, मुलीच्या लग्नासाठीही पैसे नसल्यामुळे हताशही झाले होते. परंतु, एक दिवस त्यांचे नशीब पालटले आणि  त्यावेळची रशियाची राणी कँथरीन यांना डेनिस यांच्या परिस्थितीबद्दल समजले. 
 • कॅथरीन यांना डेनिस डिडरोट यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. त्यांनी डेनिस यांचं ग्रंथालय 50 हजार डॉलर्सला विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव डिडरोट यांनी आनंदानं स्वीकारला व आपले ग्रंथालय राणीकडे सुपूर्त केले. 

हे नक्की वाचा: Introvert / Extrovert: तुम्ही इन्ट्रोव्हर्ट आहात की एक्स्ट्रॉव्हर्ट?

एका रात्रीत श्रीमंती 

 • एका रात्रीत श्रीमंत होणं म्हणजे काय याचा अनुभव याची देही याची डोळा डिडरोट यांनी घेतला. आयुष्य गरिबीत गेलेल्या डेनिस यांची स्वप्नेही फार मोठी नव्हती. 
 • मिळालेल्या पैशांमधून सर्वप्रथम त्यांनी ‘स्कार्लेट रॉब’ म्हणजेच महागडा सदरा खरेदी केला. सदरा परिधान केल्यावर त्यांना आपण फारच बडी आसामी आहोत असे वाटू लागले आणि डेनिस मोहाच्या जाळ्यात अडकले. 
 • आपल्याकडे उंची कपडे आहेत आणि घरातल्या इतर वस्तू मात्र जुनाट आहेत हा विचार त्यांच्या मनात आला आणि डेनिस यांनी आपल्या घराचा चेहरामोहरा बदलायचं ठरवलं. 
 • डेनिस यांनी एकापेक्षा एक उंची वस्तू आणि फर्निचर खरेदी केलं. घराचं बदललेलं रंगरूप बघून डेनिस सुखावले. 
 • आता त्यांचं घर, पोशाख आणि एकंदरीतच राहणीमान सर्वच उच्चभ्रू वाटत होते. परंतु, या सगळ्यामध्ये डेनिस यांच्याजवळचा सर्व पैसा संपला आणि ते कर्जबाजारी झाले. हळूहळू कर्ज वाढत गेले. डेनिस डिडरोट पुन्हा परिस्थितीपुढे हतबल झाले. आपला हा स्वानुभव डेनिस यांनी लिहून ठेवला. यालाच ‘डिडरोट इफेक्ट’ असं म्हणतात. 
 • डेनिस डिडरोट यांनी आपल्याला आलेला हा अनुभव लिहून ठेवला. यालाच असे ‘डिडरोट इफेक्ट’ (Diderot Effect) म्हणतात. 

आवर्त वापर (spiraling consumption)

 • डेनिस डिडरोट यांची कहाणी वाचल्यावर तुम्हाला आपल्या असेच काही अनाठायी केलेल्या खरेदीचे प्रसंग आठवले असतील. 
 • आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा आपण एका खरेदी केलेल्या गोष्टीसाठी दुसरी, दुसरीसाठी तिसरी, तिसरीसाठी चौथी … अशा वस्तू खरेदी करत जातो. यामध्ये अनेकदा पहिल्या वस्तूची खरेदी हीच अनाठायी असते. 
 • उदा. एक महागडी जीन्स खरेदी केली तर त्यावर साजेसा महागडा टी शर्ट मग त्याला शोभणारं ब्रँडेड जॅकेट, महागडा बेल्ट हे सगळं ओघाने आलं. 
 • इथे मुळातच महागडी जीन्स ही गोष्ट आवश्यक आहे का, हा मोठा प्रश्न आहे. अनेकदा महागडा फोन घेतल्यावर, स्क्रीन कव्हर, मोबाईल कव्हर, ब्रँडेड हेडफोन यासोबत त्याला शोभणारे महागडे कपडेही खरेदी केले जातात. यालाच आवर्त वापर (spiraling consumption) म्हणतात.
 • समजा तुम्ही 70000 रुपयांचा टीव्ही खरेदी केलात तर त्यासाठी साजेसं टीव्ही युनिटही खरेदी करणार. मग सोबत होमथिएटर, टीव्ही युनिटला साजेसे शो पीस असा खर्च वाढतच जातो. 
 • एक नवीन खरेदी केलेली वस्तू आपल्याकडील जुन्या वस्तूंचा दर्जा कमी करण्यास कारणीभूत ठरते आणि हा दर्जा वाढविण्यासाठीच आपण जास्त खर्च करतो. 
 • हे सारं आपण कशासाठी करत असतो? तर बहुतेक वेळा याचं उत्तर एकच असतं दिखाऊपणा आणि हाच आहे  ‘डिडरोट इफेक्ट’. 

विशेष लेख: इच्छा आणि गरज यामधला फरक – गोष्ट एका लॅपटॉपची!

डिडरोट इफेक्ट आणि आर्थिक परिस्थितीमध्ये होणारी प्रचंड उलथापाथ

 • डिडरोट इफेक्ट ही संकल्पना आपल्या मानसिकतेशी त्यातूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. या प्रवृत्तीमुळे माणूस रावाचा रंक होऊ शकतो.
 • मोहाच्या जाळ्यात अडकून माणूस कळत-नकळत इतका खरेदीच्या आहारी जातो की खर्च करण्याचीही भीती वाटणं बंद होतं आणि त्याचं व्यसन जडतं. अनेकदा ही गोष्ट लक्षात येत नाही किंवा आली तरी खूप उशीर झालेला असतो. 

खरेदी करताना नेहमी स्वतःला प्रश्न विचारा 

 1. ही वस्तू मी कशासाठी खरेदी करतोय?
 2. या वस्तूची मला खरंच गरज आहे का? 
 3. या वस्तूच्या खरेदीसाठी मी बजेट निश्चित केलं आहे का? 

जर या तिन्ही प्रश्नांची सकारात्मक उत्तरे जर तुमच्याकडे असतील तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्या. क्षणिक मोहापायी खर्चाचा आकडा वाढवत जाऊ नका. त्यामध्ये तुमचंच नुकसान होईल. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

web search: Diderot Effect in Marathi, Diderot Effect Marathi Mahiti, Diderot Effect mhanje kay?, Diderot Effect

Leave a Reply

Your email address will not be published.