Arthasakshar What is cv-resume-biodata in Marathi
https://bit.ly/2CNueU7
Reading Time: 2 minutes

बायोडाटा, रिज्युमे आणि सी.व्ही. यामधला फरक 

आपण जर नुकतेच आपले शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक जगामध्ये पाऊल ठेवतानाअथवा नोकरीसाठी अर्ज करताना बायोडाटा (Bio-data), रिज्युमे (Resume) की CV अर्थात Curriculum Vitae यामध्ये नक्की काय फरक आहे, असा आपल्याला प्रश्न पडत असणार. काहीजणांना असेही वाटते की एकच तर आहे सगळे. परंतु काही वेळा यामुळे आपल्या हातातली चांगली संधी देखील जाऊ शकते. तेव्हा या तिघांमधला नेमका फरक आणि साम्य काय आहे ते जाणून घेऊ.

जर्मन भाषा – का, कशी आणि कुठे?…

बायोडाटा (Bio- data)

  • बायोडाटा म्हणजेच बायोग्राफिकल डाटा. 
  • बायोडाटा हा एक ते तीन पानांपर्यंत असतो. 
  • बायोडाटा (Bio- data)  हा शब्द Resume किंवा Curriculum Vitae ला पर्यायी जुना शब्द आहे. 
  • यामध्ये शिक्षण आणि कामाच्या अनुभवासोबतच आपली वैयक्तिक माहिती जसे की जन्म तारीख, लिंग, धर्म, जात, घरचा पत्ता, राष्ट्रीयत्व इ. असते. 
  • बायोडाटा मध्ये Resume पेक्षा बरीच अधिक माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे उमेदवाराची वैयक्तिक पार्श्वभूमी देखील समजू शकते. 
  • आपल्याकडे भारतात शासकीय नोकरीच्या अर्जाच्या वेळेस बायोडाटा दिला जातो. 
  • तसेच विशेषतः लग्न जमवण्यासाठी बनवल्या जाणार्‍या टिपणाला देखील बायोडाटा म्हणतात.
  • आपल्याकडे बायोडाटा हा शब्द लग्न जुळवण्यासाठीच जास्त प्रचलित आहे.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक…

मात्र जर एखाद्या मुलाखती साठी आपल्याला बायोडाटा मागवलाच तर आपल्याला त्यात काय काय नमूद करायचे हे आपण पाहूया-

  • सुरुवात अर्थातच आपण आपल्या करियर मधील ध्येय मांडू शकतो. 
  • त्याशिवाय आपण अर्ज करत असलेली जागा आपल्यासाठी कशी योग्य आहे हे देखील मांडता येते.
  • हा बायोडाटा असल्याने आपण यात आपली वैयक्तिक माहिती नमूद करूच शकतो किंबहुना ती अपेक्षितच असते. 
  • यानंतर कामाचा अनुभव, आतापर्यंत घेतलेल्या प्रत्येक कामाच्या अनुभवाबद्दल मग तो अनुभव संबधित नसला तरीदेखील तुम्ही इथे नमूद करणे अपेक्षित असते. 
  • यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणच्या दररोजच्या जबाबदार्‍या देखील इथे नमूद करायच्या.
  • याशिवाय कामाच्या अनुभवाशिवाय असलेली कौशल्ये जसे की एखादे सॉफ्टवेअर हाताळणे, एखादी भाषा इ. नमूद करायचे. सर्वात शेवटी आपली शैक्षणिक माहिती नमूद करायची.   

कोरोनाव्हायरस आणि करिअर…

Resume  (रिज्युमे) –

  • Resume (रिज्युमे) मध्ये आपले शिक्षण, कौशल्ये आणि अनुभव हे सर्व सारांश रूपात मांडलेले असते. 
  • बहुतांश Resume हा एक ते दोन पानांचा असतो. 
  • यामध्ये अगदी प्रत्येक अनुभव अथवा माहिती नमूद करण्यापेक्षा ज्या नोकरीसाठी आपण अर्ज करत आहोत फक्त त्या संबंधित असलेला आपला अनुभव, कौशल्य थोडक्यात लिहिले गेले पाहिजे. 
  • आपला Curriculum Vitae हा मुलाखत घेताना समोरच्याला आपल्याकडून समजतोच तेव्हा रेज्युम जेव्हा मागवला जातो तेव्हा अगदी संक्षिप्त माहिती अपेक्षित असते.
  • अनुभवासाठी सामान्यतः ध्येय, शैक्षणिक अर्हता, पूर्ण केलेले प्रोजेक्ट, कौशल्ये, आवड असलेले क्षेत्र अशा क्रमाने ही माहिती नमूद करावी. 
  • मुलाखत घेणार्‍याला Resume निवडण्यासाठी फार वेळ घालवायचा नसतो. त्यामुळेच आपली कौशल्ये अगदी मोजक्या शब्दात तसेच वाचण्यास सोपी अशी एका खाली एक अथवा क्रमांक टाकून जर नमूद केली, तर ती मुखात घेणार्‍याच्या लवकर नजरेत येतील आणि आपला Resume निवडला जाण्याची शक्यता वाढेल.

या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे…

 सी.व्ही. (Curriculum Vitae) –

  • Curriculum Vitae म्हणजेच CV या नावातच आपल्याला समजते की यामध्ये विस्तृत माहिती द्यावयाची आहे. CV ला पानांची तशी काही मर्यादा नसते. तो दोन ते तीन पानांचा अथवा त्यापेक्षाही मोठा असू शकतो.
  • सामान्यतः शैक्षणिक संस्था, रिसर्च संस्था इ. ठिकाणी सी.व्ही. मागवतात.  
  • अर्थातच CV  मध्ये शैक्षणिक माहिती, अगदी आपण केलेले प्रोजेक्ट, रिपोर्ट, रिसर्च सर्व काही नमूद करता येते. 

आपण घेतलेला अनुभव देखील इथे विस्तृत पणे मांडला जातो. जेणे करून आपला सी.व्ही. वाचून मुलाखत घेणार्‍याला आपल्या कौशल्याबद्दल अचूक, तंतोतंत समजते जे अशा ठिकाणच्या नोकरीसाठी गरजेचे असते.  

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…