या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

Reading Time: 2 minutes

यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

यशाच्या मार्गात अडथळे नेहमीच येत असतात आणि यासाठी सर्वात जास्त कारणीभूत असता तुम्ही स्वतः! यश मिळविण्याची गुरुकिल्ली शोधताना, यश व अपयश दोन्ही पचविण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर यशाच्या मार्गात येणाऱ्या आपल्या काही सवयी बदलणं पण अत्यंत आवश्यक आहे. या सवयी असणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.

यश ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच हवी असते. परंतु त्यासाठी करावी लागणारी मेहनत, तडजोड यासाठी मात्र फार कमी लोकांची तयारी असते. यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली शोधून सापडत नाही, तर ती तुमची तुम्हालाच तयार करावी लागते. 

व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल? 

यशाच्या मार्गात अडथळे: ५ वाईट सवयी- 

१. असमाधानी / सततची तक्रार:-  

 • अनेक व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत कसली ना कसली तक्रार असते. पगार, नोकरी यासोबतच ऑफिसकडून मिळणाऱ्या सुविधा, सहकारी, नवीन नियम, इत्यादी अनेक गोष्टींच्या बाबतीत या व्यक्ती सतत तक्रार करत असतात. 
 • ऑफिसमध्येच नव्हे, तर अन्य कोणतेही बदल अशा व्यक्ती चटकन स्वीकारत नाहीत. त्यामुळे यांचा अर्धा वेळ चिडचिड करण्यातच संपतो.
 • प्रगतीच्या वाटेवर अनेक अडथळे येत असतात, ते स्वीकारून पुढे जाणं आवश्यक असतं. जे आहे ते स्वीकारून, परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याऐवजी त्याबद्दल तक्रार करत बसल्यास प्रगतीचा विचार करणार तरी कधी? 

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

२. भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव:-

 • भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, सर्व भावनांचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करून नकारात्मकतेल दूर ठेवणे. 
 • आजच्या काळात कौशल्ये आणि भावनिक बुद्धिमत्ता यांना अधिक महत्व देण्यात येते.  सर्व प्रकारच्या भावनांना आवर घालून कामाचे उत्तम नियोजन व व्यवस्थापन करणारी आपल्या करिअरमध्ये  अगदी सहज यशस्वी होते.  
 • भावनिक बुद्धिमत्ता ही तुमच्या बौद्धिक क्षमतेवर नेहमीच प्रभाव टाकत असते. तुम्ही कितीही हुशार किंवा बुद्धिमान असलात तरी, जर तुम्ही भावनांच्या आहारी जात असाल, भावनांचा आवेग तुमच्या निर्णयांवर किंवा कामावर परिणाम करत असेल, तर यशाचा मार्ग तुम्हाला कधीच दिसणार नाही.
 • राग, दुःख, तिरस्कार, हेवेदावे या सगळ्या भावनांमुळे निव्वळ तुमच्या कामावर नव्हे, तर तुमच्या सहकाऱ्यांच्या व हाताखालच्या लोकांच्या कामावरही नकारात्मक परिणाम होत असतो. नकारात्मक ऊर्जा निर्माण व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत.त्यामुळे अशा व्यक्तींना सहकार्य करायला कोणीच तयार नसतं. 

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

३. गॉसिप:-

 • स्त्रियांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या विषयात पुरुषही काही मागे नसतात. किंबहुना यामध्ये स्त्रियांपेक्षा जरा जास्तच आघाडीवर असतात.
 • कार्यालय असो वा अजून काही “गॉसिप” करणाऱ्या व्यक्तींना ऑफिसमधल्या राजकारणापासून ते एखाद्या सहकाऱ्याच्या  वैयक्तिक आयुष्यापर्यंत कोणताही विषय चालतो. गॉसिप करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ अशा व्यक्तींसाठी वाया घालवत असतात, जी त्यांना आवडत नाही किंवा त्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही.
 • यामुळे सहाजिकच कामाच्या दर्जावर परिणाम होतो व तुमच्याही नकळत यशाचा मार्ग तुमच्यापासून दूर होत जातो.

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

४. ग्रूपिझम:-

 • शाळा कॉलेजपासून थेट कॉर्पोरेट जगात येऊन पोचलेली एक अत्यंत वाईट सवय म्हणजे ‘ग्रूपिझम’. 
 • कंपनीमध्ये नवीन आलेल्या किंवा प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करून मुद्दाम त्याला एकटं पाडणे, त्याला त्रास देणे किंवा त्याला धाक दाखवून आपली कामे त्या व्यक्तीकडून करून घेणे, असले प्रकार कॉर्पोरेट विश्वात सर्रासपणे चालतात. 
 • अनेकदा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात येते. मुद्दाम त्रास देण्यासाठी कामाच्या बाबतीत असहकार पुकारून त्याला एकटं पाडलं जातं.
 • ग्रूपिझमची सवय लागलेली व्यक्ती सहसा आपला ग्रूप सोडून इतर ठिकाणी काम करू शकत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या संधिकडेही नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं. अशा व्यक्ती प्रगतीची दारे स्वतःहून बंद करून घेतात

 ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

५. दोषारोप करणे:-

 • अनेक व्यक्ती चुका स्वीकारण्यापेक्षा त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात किंवा त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवण्यातच धन्यता मानतात.
 • अशा व्यक्ती प्रत्येक चुकीचं खापर कधी परिस्थिती, कधी व्यक्ती तर कधी अगदी पशू पक्षांवरही फोडत असतात. 
 • चुका स्वीकारणं ही चुका सुधारण्याची पहिली पायरी असते. परंतु जर चुका स्वीकारल्याच नाहीत, तर चुका सुधारणार कशा? आणि चुका सुधारल्याच नाहीत, तर प्रगती होणार तशी कशी?

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *