Interest On Credit Card : क्रेडिट कार्डवरील व्याज कसे कॅल्क्युलेट करायचे?

Reading Time: 3 minutes

क्रेडिट कार्डवरील व्याज कसे कॅल्क्युलेट करतात ?

क्रेडिट कार्डवरील व्याज (Interest on Credit Card) कसे कॅल्क्युलेट करतात? याबद्दल क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या बहुतांश जणांना माहिती नसेल. आजच्या लेखात आपण याबद्दल माहिती घेऊया. 

क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्याल?  

क्रेडिट कार्ड वापरण्याचे दोन महत्वाचे फायदे आहेत. 

१. पैशांशिवाय खरेदी: 

 • तुम्हाला एखादी वस्तू किंवा सेवा,सुविधा हवी असेल आणि तत्क्षणी तुमच्याकडे तेवढे पैसे उपलब्ध नसतील तरी क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही ती वस्तू अथवा सेवा/सुविधेचा लाभ घेऊ शकता. 

२. ‘क्रेडिट-फ्री पिरियड

 • तुम्ही क्रेडिट कार्डमधून घेतलेले पैसे काही कालावधीसाठी चक्क मोफत, काहीही व्याजाशिवाय वापरू शकता. सदर कालावधीला ‘क्रेडिट-फ्री पिरियड’ म्हणतात. 
 • ‘क्रेडिट-फ्री पिरियड साधारणतः क्रेडिट घेतल्यापासून २० ते ५० दिवस इतका असतो. 
 • प्रत्येक क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेनुसार ‘क्रेडिट-फ्री पिरियड’ वेगवेगळा असू शकतो. पण जर क्रेडिट-फ्री पिरियडच्या आत वापरलेली रक्कम भरता येऊ शकणार नसेल, तर बँकेकडून ठराविक कमीत कमी रक्कम भरण्याबद्दल सुचवले जाते.
 • सदर रकमेला “मिनिमम अमाऊंट ड्यू” असे म्हणतात. सदर रक्कम साधारणतः एकूण वापरलेल्या रकमेच्या ५ टक्के इतकी असते. 
 • या प्रकारे ‘क्रेडिट रिव्हॉल्व्हिंग फॅसिलिटी’ चा वापर करून तुम्ही कमीत कमी रक्कम दर महिन्याला भरू शकता. जोपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्डची पूर्ण रक्कम भरत नाही, तोपर्यंत या उरलेल्या रकमेवर तुम्हांला बँकेला ठराविक दराने व्याज द्यावे लागते.

क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता? 

क्रेडिट कार्डवरील व्याजाचे सूत्र (Interest On Credit Card – Formula)

क्रेडिट कार्डवरचे व्याज कॅल्क्युलेट करण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते : 

पैसे वापरल्यापासून एकूण दिवस X एकूण देय रक्कम X मासिक व्याजदर X १२ महिने) / ३६५

(Number of days are counted from the date of transaction made x Entire outstanding amount x Interest rate per month x 12 month)/365  

क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

क्रेडिट कार्डवर व्याज आकारण्याच्या पद्धती (Interest On Credit Card- Calculation & Method)

१. रक्कम वापरल्यापासून ठराविक दिवसांच्या आधी सर्व रक्कम भरल्यास:

क्रेडिट-फ्री पिरियडच्या आधी म्हणजे यावर वेळेआधी पूर्ण रक्कम भरल्यामुळे कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही त्यामुळे जितकी रक्कम वापरली आहे तितकीच भरावी लागेल.

२. क्रेडीट कार्डच्या निर्धारित वेळेच्या आधी “मिनिमम अमाऊंट ड्यू” भरल्यास (वापरलेल्या रकमेच्या ५%):

क्रेडिट-फ्री पिरियडमध्ये पूर्ण रक्कम न भरता फक्त ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’ रक्कम भरल्यास उरलेल्या रकमेवर व त्यानंतर जर अजून काही व्यवहार क्रेडिट कार्ड ने केले तर त्यावरही असे एकूण रकमेवर व्याज आकारले जाते. 

३. अपेक्षित वेळ उलटून गेल्यानंतर फक्त ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’ भरली असल्यास:

रक्कम भरण्याची शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर जर ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’ असणारी रक्कम भरली तर त्यावर व अजून नवीन काही व्यवहार केले असतील तर त्यावर असं एकूण व्याज आकारले जाईल.

क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

४. क्रेडिट कार्डवरील रक्कम वापरूनही कमीत कमी रक्कम भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत काहीही रक्कम न भरल्यास – 

मागील पूर्ण वापरलेल्या रकमेसोबतच त्यानंतर वापरलेल्या रकमेवर बँक व्याज आकारायला सुरुवात करते आणि जोपर्यंत तुम्ही पूर्ण पैसे भरत नाही तोपर्यंचे व्याज तुम्हांला चुकते करावे  लागते.

५. ‘कॅश ऍडव्हान्स’ म्हणजे क्रेडिट कार्डमधून पैसे काढले असल्यास –

 • क्रेडिट कार्डमधून थेट कॅश काढली असता याचा अर्थ असं होतो की तुम्ही ‘कॅश ऍडव्हान्स’ सुविधेचा वापर करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला ज्या दिवशी ही रक्कम काढली तेव्हापासून जोपर्यंत तुम्ही पूर्ण पैसे भरत नाही तोपर्यंतचे शुल्क लागू होईल.
 • हे शुल्क अकाऊंटमधून काढलेल्या रकमेच्या साधारण ३.५% असते आणि याला कोणताही बिनव्याजाचं कालावधी दिला जात नाही. त्यामुळे शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर करून कॅश काढणे टाळणेच फायद्याचे ठरते. 

६. ‘मिनिमम ड्यू’ पेक्षा कमी पैसे भरल्यास –

 • ‘मिनिमम ड्यू’ रकमेपेक्षाही कमी पैसे भरल्यास, जोपर्यंत मिनिमम ड्यू’  रक्कम भरली जात नाही तोपर्यंत पूर्ण रकमेवर वित्त शुल्क लागू केले जाईल.
 • सरकारी नियमानुसार वरील केसमध्ये तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वापरलेल्या रकमेवर प्रत्येक बँकेच्या नियमानुसार उरलेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. याशिवाय १८% GST देखील भरावा लागतो.   

क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर

क्रेडिट कार्ड बिल भरणे शक्य नसल्यास काय करावे?

 • क्रेडिट कार्डवरून वापरलेली रक्कम ठराविक वेळेच्या आत परत भरणे जमणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानंतर पुन्हा कोणत्याही कारणासाठी क्रेडिट कार्डचा वापर करणे टाळावे.
 • काही मोठा खर्च करायचा असल्यास त्यासाठी ईएमआय (EMI) सुविधा वापरावी. ज्यामुळे एकदम रक्कम वापरायची गरज पडणार नाही.
 • काही तज्ज्ञांच्या मते वैयक्तिक कर्ज घेऊन क्रेडिट कार्डवरील रक्कम एकदम भरणे फायद्याचे ठरू शकते कारण वयक्तिक कर्जावर द्यावे लागणारे व्याज हे क्रेडिट कार्डवरील व्याजापेक्षा तुलनेने कमी असते 

अशा प्रकारे आपण विविध परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्डवरील रकमेवर आकारलेले व्याज कसे कॅल्क्युलेट केले जाते. वरील काही गोष्टी विचारात घेऊन त्यानुसार तुम्हांला सोयीस्कर वाटेल तो निर्णय घेतल्यास होणारे नुकसान कमी करता येईल आणि खर्चाच्या नियोजनावर ताण येणार नाही.

For suggestions and queries – Contact us: info@arthasakshar.com 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!