Arthasakshar What is EMI moratoriumin Marathi
Reading Time: 3 minutes

ईएमआय भरण्यास मुदतवाढ : तुम्ही काय कराल ? 

EMI Moratorium 

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २२ मे २०२० रोजी कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोना महामारीमुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. आपण घेतलेल्या कर्ज रकमांची परतफेड उत्पन्नाअभावी कशी करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आ वासून उभा आहे. 

आरबीआयने पूर्वी जाहीर केलेल्या कर्ज परतफेडीच्या म्हणजेच ईएमआय मोराटोरीयम मध्ये अजून ३ महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  

RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा……

आरबीआयने जाहीर केलेला “मोराटोरीयम” म्हणजे काय ? (Moratorium)

  • Moratorium = A stopping of an activity for an agreed amount of time
  • “मोराटोरीयम”चा म्हणजे मान्य केलेल्या वेळेसाठी एखादी क्रीया, व्यवहार तात्पुरता स्थगित करणे.  

आतापर्यंत २ वेळा आरबीआयने कर्ज मुद्दल व व्याज हप्ता परतफेड सवलतीबाबत घोषणा केल्या आहेत. 

आरबीआय सवलत क्र. १ आरबीआय सवलत क्र. २
घोषणा  दि. २७ मार्च २०२० दि. २२ मे २०२०
मोराटोरीयम महिने मार्च , एप्रिल, मे   जून, जुलै, ऑगस्ट

कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे?

  • कर्जदारांना कर्जाचा मासिक हफ्ता / कर्जावरील व्याज फेडीसाठी मार्च ते ऑगस्ट असे एकूण ६ महिने अतिरिक्त कालावधी देण्याचे आवाहन ‘RBI‘ ने बँकांना केले आहे. 
  • कर्ज प्रकारात मध्ये “क्रेडीट कार्ड”च्या बाकी रकमांचाही समावेश होईल.  
  • यासाठी कर्जदारांचे ६ महिन्यांचे हप्ते, त्यांचा परतफेडीचा नवा कालावधी तसेच त्यांची मुदत याची फेररचना बँकांना करावी लागेल, असे ‘आरबीआय’ने स्पष्ट केले आहे. 
  • या ६ महिन्यांच्या स्थगन कालावधीत बँकांनी कर्जदारांच्या खात्यातून परस्पर कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कापू नये, असेही रिझर्व्ह बँकेने सूचित केले आहे. 
  • पूर्वीप्रमाणेच ही योजना ऐच्छिक असून ही फक्त सवलत असून व्याजात सूट नाही.  
  • अशा प्रकारे सवलत दिल्याने सदर व्यक्तीच्या एकूण कर्ज हप्त्यात वाढ होईल.  खऱ्याखुऱ्या गरजू लोकांना त्याचा लाभ घेता येईल.

कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !………

यासाठीचा कालावधी कोणता आहे? 

१ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२०

कर्जमाफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? 

  • अतिरिक्त कालावधी म्हणजे जरी तुम्ही कर्जाचा मासिक हफ्ता / कर्जावरील व्याज बँकेला दिले नाही तरी या  मोराटोरीयम कालावधीत बँक कुठलीही दंड रक्कम आकारणार नाही, वसुलीसाठी मागे लागणार नाही आणि तुम्हाला “डीफॉल्टर” सुद्धा ठरवणार नाही. 
  • तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही. 
  • कर्जावर व्याज मात्र आकारले जाणार आहे. 
  • व्याजाला किंवा मुद्दल रकमेच्या परतफेडीला कुठलीही माफी दिलेली नाही.  
  • मुदत कर्जाचा एकूण कालावधी ६ महिन्यांनी वाढवला जाऊ शकतो. उदा : तुमचे कर्ज १५ वर्ष म्हणजे १८० महिन्यांत मुदतीचे असेल तर आता परतफेडीचा कालावधी १८६ महिने होईल.

मी नक्की काय करायला हवे? 

ईएमआय भरण्यासाठी तुमच्यापुढे पुढील पर्याय आहेत :

  • ६ महिने ईएमआय न भरणे
  • शक्य असल्यास काही महिन्यांचा ईएमआय भरणे 
  • संपूर्ण ६ महिने ईएमआय भरणे 

वरीलपैकी एखादा पर्याय निवडण्यासाठी तुमची आर्थिक व मानसिक परिस्थिती सध्या कशी आहे हे फार महत्वाचे आहे. कुठलाही पर्याय निवडतांना वास्तव स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. 

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती……

पर्याय क्र. १ : ६ महिने ईएमआय न भरणे

  • तुमचा व्यापार, उद्योग किंवा व्यवसाय अडचणीत आहे. पुरेसी आवक होत नसेल आणि लॉकडाउन नंतर सुद्धा व्यवसाय पूर्वीप्रमाणे जोमाने चालेल याची शाश्वती नसेल, तर पर्याय क्र. १ तुम्ही नक्की स्वीकारायला हवा. 
  • नोकरी करत असाल आणि पगार कपातीमुळे हातात येणारी रक्कम रोजच्या गरजा भागवण्याइतकीच असेल किंवा नोकरी कायम असायची शाश्वती नसेल तर पर्याय क्र.१ तुम्ही स्वीकारायला हवा. 
  • लक्षात ठेवा : 
    1. कोरोना महामारीमुळे आलेली सद्यस्थिती कायम असणार नाही. चांगले दिवस पुढे नक्की येणार आहेत.
    2. तुमच्या दीर्घकालीन करिअरच्या दृष्टीने हा ६ महिने किंवा वर्षाचा कालावधी फार छोटा आहे. 
    3. तुमच्याकडील गंगाजळी किंवा इमर्जन्सी फंड व्याज वाचवण्यासाठी तुम्ही ईएमआय भरण्यात खर्च केला आणि नंतर पैशाची आवकच झाली नाही, तर परिस्थिती अधिक बिकट होईल. 
    4. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यावर पुरेसी अतिरिक्त रक्कम हातात आली असता तुम्ही कर्जात मुदतीपूर्वीसुद्धा भरणा करू शकता.
    5. अनावश्यक खर्च टाळून आपला व्यवसाय धंदा किंवा नोकरी बाबत काय सुधारणा करू शकतो याचा अभ्यास करून प्रत्यक्ष कार्यवाही करावी. 

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग १…

पर्याय क्र. २ : शक्य असल्यास काही महिन्यांचा ईएमआय भरणे 

  • दैनंदिन खर्च आणि अचानक येणाऱ्या खर्चांसाठी इमर्जन्सी फंडाव्यतिरिक्त तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम असेल आणि ६ महिन्यांपैकी काही महिने तुम्ही ईएमआय भरू शकत असाल, तर पर्याय क्र. २ तुम्ही स्विकारायला हवा. 

पर्याय क्र. ३ : संपूर्ण ६ महिने ईएमआय भरणे 

  • नोकरी किंवा व्यवसाय धंदा सुरळीत सुरु असेल आणि सर्वप्रकारच्या गरजा भागवून, इमर्जन्सी फंड सुस्थितीत ठेऊन तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम असेल तर पर्याय क्र. ३ तुम्ही स्विकारायला हवा. 
  • विनाकारण व्याज भरून आपले नुकसान टाळायचे असेल, तर एकही ईएमआय पुढे ढकलता कामा नये. 

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग २…

समारोप : 

सध्याच्या काळाशी सुसंगत एक प्रसिद्ध संस्कृत सुभाषित आहे. 

को देशः कानि मित्राणि-कःकालःकौ व्ययागमौ ।
कश्चाहं का च मे शक्ति-रितिचिन्त्यं मुहुर्मुहु ॥

(माझा) देश कोणता आहे, 

(माझे) मित्र कोण आहेत, 

आजचा काळ कसा आहे, 

उत्पन्न आणि खर्च किती आहे, 

मी कोण आहे, 

माझे सामर्थ्य काय आहे  

याबाबत बुद्धिमान मनुष्य अनेकदा सतत विचार करत असतो. 

तेव्हा कुठलीही गोष्ट किंवा स्थिती कायम नसते. सदैव सकारात्मक रहाणे महत्वाचे आहे कारण हे ही दिवस निघून जातील. 

कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३…

– सी.ए. अभिजीत कोळपकर 

[email protected]

web search: mi Karjacha hapta bhru ka?, EMI Moratorium mhanje kay in marathi, what is EMI Moratorium ? in Marathi, Moratorium in Marathi, krajala mudatvadh in marathi, Corona karja savalat in Marathi

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…