अर्थसाक्षर इक्विटी की सोने
https://bit.ly/2OF2TGd
Reading Time: 3 minutes

इक्विटी की सोने

सध्या कोरोना महामारीमुळे बाजारातील अस्थिरतेच्या काळात “इक्विटी की सोने” हा अनेक गुंतवणूकदारांसमोरचा मोठा प्रश्न आहे. गुंतवणुकीचे पर्याय कमी होत असल्याने गुंतवणुकदार चिंतेत आहेत. भारतात मालमत्ता म्हणून सोन्याला एक वेगळीच मान्यता आहे. मात्र आधुनिक काळातील बाजारातील गतिशीलतेमुळे हे समीकरण गुंतागुंतीचे झाले. कारण यात अनेक घटकांचा समावेश होतो.

सुरक्षित पर्यायांबाबतचा हा बारमाही प्रश्न म्हणजे  इक्विटी मार्केट आणि सोन्यामधील तुलना. दोन्ही बाजारांचे १० वर्षाहून अधिक काळ निरीक्षण केल्यास आपल्याला सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात चांगला पर्याय निवडण्यासाठी वैचारिक दिशा मिळू शकते.

भारतातील मान्यताप्राप्त शेअर बाजार आणि वस्तुबाजार

गुंतवणूक: इक्विटी की सोने?

मागील दशक: इक्विटी मार्केटमधील ट्रेंड –

  • मागील १० वर्षांमध्ये सेन्सेक्सने (बीएसई३०) आणि बीएसई ५०० ने यासारख्या भारतीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ९.०५% आणि ८.५% सीएजीआर नोंदवला गेला. 
  • तथापि, २०१२ मधील अर्थिक मंदीमुळे २०१० ते २०१५ या कालावधीत हळू हळू वाढ झाली. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ ते जानेवारी २०१६ पर्यंत ही वाढ होतच होती. 
  • सेन्सेक्सेची वृद्धी डिसेंबर २०१७ मध्ये जवळपास १७,५०० अंकांवरून ४०,००० अंकांवर पोहोचली.
  • डिसेंबर १९ पासून जागतिक ट्रेंडमध्ये काही काळ विश्रांती असूनही हा काळ विविध क्षेत्रांमधून इक्विटीद्वारे संपत्ती निर्माण करण्याचा काळ ठरला.
  • कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे सर्व आर्थिक कामकाज ठप्प झाले आणि संपत्ती निर्मितीची शक्यताही कमी झाली. त्यामुळे जागतिक बाजारपेठ कोसळली. 
  • परिणामी एप्रिल २०२० च्या सुरुवातीस भारतीय बाजारपेठेत २३ टक्के म्हणजेच २७,४०० अंकांची घसरण झाली. 
  • जास्तीत जास्त घसरण सुमारे ४० टक्के होती. एप्रिलपासून झालेली सुधारणा महत्त्वाची असली तरी बाजारपेठेत वाढती अनिश्चितता आणि नव्या ट्रेंड्समुळे गुंतवणुकदारांचे रिझर्वेशन ही वैशिष्ट्ये दिसून आली.

शेअर ट्रेडिंग व्यवहार विरुद्ध गुंतवणूक

मागील दशक: गोल्ड मार्केटमधील ट्रेंड :

  • सोन्याच्या बाजारातही हंगामी वाढ दिसून आली. 
  • लोक, विशेष संकटांची चाहूल लागते तेव्हा पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याकरिता सोन्याचा वापर करतात. 
  • २००८ मध्ये सोन्यात ८,००० ते २५,००० पर्यंत वाढ झाली, तर २०१६ नंतर सोन्याच्या दरांनी प्रति १० ग्रॅममागे ३१,००० रुपयांची पातळी पार केली. 
  • भारतातील आर्थिक मंदीमुळे मागील एकाच वर्षात हे दर वाढले. सोन्याच्या दरांनी ३५,००० वरून आज ५०,९०० रुपयांवर वाढ घेतली. 
  • एप्रिल महिन्यात सोन्यातील गुंतवणुकीकून ११ टक्के परतावा मिळाला. त्यानंतरच्या महिन्यांमध्ये बहुपटीने परतावा वाढला. 
  • गोंधळाच्या स्थितीत सोने आणि संबंधित मालमत्तेचे पर्याय बऱ्याच काळापासून सुरक्षित पर्याय मानले गेले आहेत. सध्याचे संकटही याच प्रकारातले आहे. 
  • कोव्हिड-१९ च्या वाढत्या रुग्णांमुळे जागतिक वाढीतही अडथळे निर्माण झाले. कित्येक जागतिक वित्तीय संस्था आणि सल्लागार कंपन्या इक्विटी मार्केटच्या घसरणीचा अंदाज व्यक्त करत आहेत.

Stock Market : शेअर बाजारातील वादळी काळात टिकण्यासाठी ५ गोल्डन टिप्स

प्रभावी घटक आणि गुंतवणुकीचे पर्याय –

  • सन २००८ मध्ये प्रमुख बँक आणि जागतिक बाजारपेठा कोसळत असताना अमेरिकी फेड आणि इतर केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रोत्साहन पॅकेजद्वारे जागतिक वित्तीय प्रणालीत सुधारणेचा प्रयत्न केला.
  • त्यानंतरच्या काही वर्षांत अनेक बाजारपेठांवर परिणाम होतच राहिला. यामुळे ग्रीससारखे लहान युरोपियन देश कर्जबाजारी झाले आणि युरोपियन मध्यवर्ती बँकेला युरोपिय युनियनच्या सिंगल मार्केटमध्ये ऊर्जा भरावी लागली. 
  • साथीनंतरच्या उपायांमध्ये, जागतिक बँका आणि भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्यास उत्सुक आहेत.
  • व्याजदर आणि सोन्याच्या किंमतीचा नकारात्मक परस्परसंबंध असल्याने वर उल्लेख केलेल्या आर्थिक घसरणीमुळे इक्विटी बाजारावर तीव्र परिणाम होण्याची शक्यता आहे. 
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने जून २०२० मधील वृद्धी अंदाजात म्हटले की, जागतिक विकास एप्रिलमधील अंदाजापेक्षा १.९ टक्के कमी म्हणजेच ४.९ टक्क्यांच्या जवळपास राहील. तसेच एप्रिल २०२० मधील वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुक रिपोर्टने ३ टक्के घटीचा अंदाज वर्तवला. 
  • याच धर्तीवर सल्लागार फर्म डेलॉइटने प्रमुख तांत्रिक अडथळे दर्शवले. कामाचे स्वरुप बदलल्याने बाजारपेठ आणि बँकेवर गंभीर परिणाम झाला. 
  • या अहवालात बाँड उत्पादनातील घसरण, क्रूड किंमती आणि व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यताही नमूद केली आहे. 
  • हे घटक तरलतेच्या शीर्षावर असल्याने बाजारपेठेला नुकसानकारक ठरतात. 
  • यात आणखी भर पडल्यास, कोव्हिड-१९ मुळे बँकिंग संस्था आणि शॉर्ट टर्म वित्तीय जोखीम तसेच रेग्युलेटरी कम्प्लायन्स प्रकरणी बाजाराला इशाराही देण्यात आला आहे. 
  • कोव्हिड-१९ च्या दीर्घकालीन जोखीमचे अनपेक्षितरित्या आकलन होऊ शकत नाही. या संकटाचा निष्कर्ष अजूनही दृष्टीपथात नाही.

योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?

प्रोत्साहन पॅकेजची घोषणा

  • भारत सरकारने नुकतीच अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे वित्तीय बाजार आणि बाँड असेट वर्गाला नुकसान होईल.
  • अधिक लिक्विडीटी आणि मर्यादित कामकाज अशा अनिश्चित भवितव्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीचा ट्रेंड सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. 
  • दरम्यान, सोन्यातील अनेक गुंतवणुकीच्या शक्यतांवर लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून महागाईच्या ट्रेंडचा प्रतिकार होऊ शकेल.
  • कोव्हिडच्या काळात सोन्याची भौतिक मालमत्ता जमा करणे कठीण होत आहे. त्यामुळे सोने समर्थित पर्याय उदा. गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) हा एक आशादायी पर्याय आहे.
  • भारतात सोन्याच्या सकारात्मक प्रवाहामुळे मागील वर्षी दर महिन्याला ३५ टनांची सरासरी मागे सारली आहे. यावर्षी मार्च २०२० पासून हा दर ३३९.९ टन एवढा झाला आहे.

जागतिक स्तरावर, केंद्रीय बँकांनी विलंबाने सोन्याची विक्रमी पातळी खरेदी केली आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या विकासासाठी ही डोकेदुखी ठरू शकते. याचा इक्विटीवर परिणाम होईल आणि बाजारातील अस्थिरता वाढेल. त्यामुळे सध्या तरी सोने आणि सोने आधारीत साधने हाच उत्कृष्ट पर्याय आहे.

–  अनुज गुप्ता

सहायक उपाध्यक्ष, वस्तू आणि चलन संशोधन,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Best Investment option in Market Marathi Mahiti, Equity or Gold Marathi Mahiti, Investment Guide for Equity vs Gold in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…