Reading Time: 3 minutes

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. “आर्थिक नियोजन कसं करायचं? यासंदर्भातील लेखाच्या या शेवटच्या भागात उर्वरित महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया.
मागील भागातून पुढे चालू…

कर्जे / क्रेडिट कार्ड :

६७. आपली कर्जे लवकरात लवकर फेडण्यासाठी नियोजन करा आणि व्याजाच्या रूपाने जाणारा पैसा वाचवा .

६८. कर्जाचं टाईमटेबल तयार करा जेणेकरून सर्व हप्ते वेळच्यावेळी भरले जातील व ज्या कर्जासाठी जास्त व्याज भरावं लागतं ती कर्जे आधी फेडता येतील.

६९. जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यासाठीचा व्याजदर तपासून घ्या. प्रत्येक क्रेडिट कार्डचा व्याजदर वेगवेगळा साधारणतः १०% ते २२% इतका असतो.

६७. नवीन घर घ्यायचं असल्यास डाऊन पेमेन्टसाठी पैशांचं नियोजन सुरु करा तयारी करा.

६८. गृहकर्ज घेताना प्रत्येक बँकेचे व्याजदर तपासा.

६९.  गृहकर्ज अगोदरपासूनच घेतले असल्यास त्याच्या प्रीपेन्टची तयारी सुरु करा.

७०. . कोणत्याही अनावश्यक अथवा फसव्या ऑफर्सना बळी पडून आपलं आर्थिक नुकसान करू नका. यामध्ये बहुतांश वेळेस मल्टि लेव्हल मार्केटिंग, क्रेडिट कार्ड ऑफर्स इत्यादींचा समावेश होतो.  

७१. कर्ज, विमा इत्यादी घेताना योग्य मार्गदर्शन व तुलना करणाऱ्या वेबसाईट्स वापर करा तसेच संबंधित ब्लॉग वाचा. यामुळे योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.

७२. क्रेडिट कार्डचा वापर शक्यतो टाळा. तुमच्या एकूण खर्चापैकी कमीत कमी रक्कमच क्रेडिट कार्डने खर्च करा.

७३. कॅश डाएट’ सुरु करा. क्रेडिट कार्डचा वापर थांबवा.

७४. योग्य व्यक्ती, जवळच्या व्यक्ती, मित्रमैत्रिणी यांनाच सर्वांगीण विचार करून कर्जासाठी जामीन रहा. भिडस्त पणा टाळा. नाही म्हणायला शिका.

विमा (Insurance):

७५. विमा खरेदी म्हणजे गुंतवणुकीबरोबरच आर्थिक संकटाची तरतूद आहे. खरतर ‘विमा’ या पर्यायाकडे पूर्वी फक्त आर्थिक संकटाची तरतूद म्हणून पहिले जायचे. परंतु आधुनिक काळात विम्याच्या बदललेल्या स्वरूपाने त्याला गुंतवणुकीचा दर्जाही मिळाला आहे.

७६. वेगवेगळ्या प्रकारचे विमा सध्या बँका व विमा कंपन्यांकडून विकले जातात. जीवन विमा, वाहन विमा, अपघात विमा याबरोबरच सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘आरोग्य विमा. आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे अनेकदा आपलं आर्थिक नियोजन बिघडत जातं.

७७. सन २०११ मध्ये लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च (Medical  Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.यावरून आरोग्य विम्याची असणारी गरज आपल्या सहज लक्षात येईल.  

७८. टर्म इन्शुरन्स खरेदी करा. ही सर्वात स्वस्त आणि सोपी आहे.

७९. इन्शुरन्स म्हणजे गुंतवणूक नसून ती भविष्याची तरतूद आहे.

पर्यायी उत्पन्न:

८०. वाढत्या गरजा, महागाई, आर्थिक संकट, यासारख्या अनेक गोष्टींचा सामना करण्यासाठी ‘साइड इन्कम’ किंवा पर्यायी उत्पन्नाच्या पर्यायाचा  नेहमी विचार करावा.

८१. पर्यायी उत्पन्न शक्यतो वेगळ्या बँक खात्यातच जमा करावे. यामुळे तुमचे उत्पन्न व पर्यायाने गुंतवणूकही वाढेल.

मुलांसाठी आर्थिक तरतूद व अर्थसाक्षरता:

८२. आर्थिक नियोजन करताना मुलांसाठी शक्यतो वेगळे बचत खाते उघडा.

८३. मुलांचा वाढता शैक्षणिक खर्चाचे नियोजन त्यांच्या लहानपणापासूनच केल्यास नंतर आर्थिक टेन्शन येणार नाही.

८४. मुलांना लहान वयातच बचतीचं महत्व कळेल व बचत करण्याची शिस्त लागेल यासाठी डोळस प्रयत्न करा.

८५. अनेक बँकांमध्ये मुलांसाठी ‘झिरो बॅलन्स अकाउंट’ अथवा जास्त व्याजदर देणाऱ्या अकाऊंटची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्या.

शैक्षणिक खर्च (Educational Expenses)

८६. आपण मुलांच्या शिक्षणाचं आत्तापासूनच योग्य नियोजन केल्यास पुढे त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येणार नाही किंवा शैक्षणिक कर्ज घ्यायची वेळ येणार नाही.

८७. शक्य असल्यास मुलांसाठी वेगळे बँक खाते उघडा. तुम्हाला मुलगी असल्यास तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्येही गुंतवणूक करू शकता.

निवृत्तीचं नियोजन (Retirement Plan):

८८. तुमच्या निवृत्तीचा काळ जवळ आलेला असो किंवा दूर असो निवृत्ती पश्चात आयुष्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.  

८९. निवृत्तीचं नियोजन करताना भविष्यातील आर्थिक गरज लक्षात घेऊन करा

९०. शक्य असेल तेव्हा जास्तीचा मिळालेल्या पैशाचा काही भाग भविष्याची तरतूद म्हणून बाजूला ठेवा.

९१. सन २००४ पूर्वी नोकरीस लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. परंतु बाकीच्याचे काय? त्यांनी त्यांच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठीचे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.

९२. जर निवृत्तीपश्चात आयुष्याचे नियोजन आत्तापर्यंत केलेलं नसेल तर नववर्षाच्या मुहूर्तावर सर्वप्रथम या नियोजनाचा विचार करा.

९३. एनपीएस (NPS), बँक अथवा विमा कंपन्यांच्या विविध रिटायर्डमेंट योजना, पीपीएफ यासारख्या अनेक प्रकारच्या गुंतवणूक तुमच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी तुम्ही करू शकता.

सारांश  (Conclusion):

९४. वाचनाची सवय लावून घ्या. लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल. आर्थिक बाबींची माहिती देणाऱ्या अनेक वेबसाईट असतात त्यावरील लेख वाचून आपले आर्थिक ज्ञान वाढवा.

९५. आर्थिक नियोजनाची डायरी सतत तुमच्याजवळ ठेवा. 

९६. खर्च व बचतीची यादी वरचेवर चेक करा. यामुळे खर्चावर तुमचं नियंत्रण राहील.

९७. चुका स्वीकारायची सवय लावा. लक्षात ठेवा चुका स्वीकारणं ही चुका सुधारण्याची पहिली पायरी आहे.

९८. प्रयत्न करणं सोडू नका. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. प्रयत्न करणाऱ्याला एक दिवस यश नक्कीच मिळते.

९९. वेळ हा मूल्यवान आहे त्यामुळे जगातल्या सर्वात मूल्यवान गोष्टीचं नियोजन केल्यास इतर सर्व नियोजनेही यशस्वी होतील.

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2R79Nrz )

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प – भाग १,    २०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग २,

२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…,    नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग,

जीवनविमा योजनेचे विविध प्रकारपर्सनल लोन विषयी सर्व काही भाग २,

मासिक बजेट कसे तयार करावे यासाठी ११ पावले,  बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग,

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.