Reading Time: 3 minutes

Loves me … Loves me not…. च्या चक्रातून संत व्हॅलेंटाईनच्या आशीर्वादाने बाहेर पडलेले आणि आपलं ‘रिलेशनशिप स्टेटस’ बदलायच्या विचारात असणारे तरुण तरुणी सध्या स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतील. त्यांचे दिवस रात्र सारंच गुलाबी झालं असेल. पण हे गुलाबी आयुष्य असंच टिकवायचं असेल तर ‘गुलाबी नोटांचा’ विचार करणंही क्रमप्राप्त आहे.

प्रेमात पडल्यावर सारं जग गुलाबी सुंदर वाटू लागतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ‘कमिटमेंट’ची किंवा लग्नाची वेळ येते, तेव्हा मात्र वास्तवाचा लालभडक रंग समोर येतो. जबाबदारी हा शब्दच आजच्या तरुण पिढीला अवघड आणि अवजड वाटतो. पण विवाहपूर्व आर्थिक नियोजन केल्यास जबाबदारी हा शब्दही गोड वाटू लागेल.

विवाहपूर्व आर्थिक नियोजन कसं कराल?

“घर दोघांचं असतं. दोघांनी सावरायचं”, या विचाराप्रमाणे परस्पर सामंजस्याने केलेलं विवाहपूर्व आर्थिक नियोजन तुमच्या गुलाबी प्रेमाचं स्वप्न अजून सुंदर करण्यास मदत करेल. 

विवाहपूर्व आर्थिक नियोजन करताना लक्षात घ्यायच्या महत्वाच्या गोष्टी:

१. गृह खरेदी:

“घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून”, असं म्हटलं जातं ते काही अगदीच खोटं नाही. दोन्ही गोष्टींसाठी नियोजनाची खास करून आर्थिक नियोजनाची नितांत आवश्यकता असते. आजकाल तर घराची खरेदी हा ‘परफेक्ट मॅरेज मटेरियल’ बनण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. घर हा प्रत्येक भारतीय माणसाचा ‘विक पॉईंट’ आहे.  स्वतःच घर ही गोष्ट आर्थिक पेक्षा भावनिक दृष्टिकोनातून बघितली जाते. त्यामुळे मार्केट ‘डाऊन’ वगैरे गोष्टी गुंतवणूकदारांसाठी असतात. सामान्य माणूस नेहमीच राहण्याचा दृष्टिकोनातून घर खरेदी करतो. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘रिअल मार्केट’ कितीही डाऊन असलं तरीही घर खरेदी करणं प्रत्येकालाच शक्य होईलच असं नाही. त्यामुळे दोघांनीही सध्याचा पगार, भविष्यात मिळणाऱ्या करिअर संधी, नोकरीतील बदल याचा विचार करून गृहखरेदीचं नियोजन करणं आवश्यक आहे. जर दोघेही कमावते असाल तर दोघांनी मिळून हे नियोजन केल्यास गृह खरेदी खूप सोपी जाईल.

. सुवर्ण गुंतवणूक:

आजही आपल्या समाजात विवाहाच्या वेळी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी सोनं हा विवाहाच्या वेळचा आवश्यक आणि खर्चिक घटक आहे. सुवर्ण खरेदी तशी जोखमीची असते परंतु सोने खरेदीचे डिजिटल पर्यायही सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये सोन्याची ‘फिजिकल कस्टडी’ सांभाळण्याची जबाबदारी नसल्यामुळे हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. अर्थात सुवर्ण खरेदी किती करायची? याबाबतचा निर्णय परस्पर विचारांनी घेतल्यास सुवरणखरेदीचा सुवर्णमध्य साधणं सोपं जाईल.

. हनिमून:

विवाह म्हटलं की त्यांनंतर हनिमून हा एक गोड खर्च असतो. त्यामुळे त्याचे नियोजन करताना विविध ‘ट्रॅव्हल डिल्स’ ‘ऑफर करणारी कार्ड किंवा मेम्बरशीप घेतल्यास प्रवासाचं नियोजन करणं सोपं जाईल. तसंच तुमची ट्रिप प्लन करून देणाऱ्या अनेक चांगल्या वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यांचीही मदत घेता येईल. योग्य नियोजनामुळे कमी खर्चात खूप चांगली ट्रिप प्लॅन होऊ शकते.

४. इतर खर्च व गुंतवणूक:

विवाह म्हणजे दोन वेगवेगळ्या विचारांच्या, व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींचं एकत्र येणं. प्रत्येक वेळी दोघांचे विचार जुळतीलच असं नाही. परंतु तरीही आर्थिक नियोजन करताना एकमेकांच्या विचारांने व मदतीने केल्यास नक्कीच यशस्वी होईल.  

  • यासाठी दोघांनीही रोजचा जमा खर्च लिहायची सवय स्वतःला लावून घ्यावी यामुळे अनावश्यक खर्चाला आपोआपच आळा बसेल. यासाठी खर्च कमी करून गुंतवणुकीचे साधे सोपे पर्याय विचारात घेतल्यास पुढे जाऊन त्याचे खूप चांगले रिटर्न्स मिळतील.
  • दर महिन्याला पगारातील ठराविक रक्कम बँकेत जमा करावी. शक्य असल्यास एखादे जॉईंट अकाउंट ओपन करावे व दोघांनीही एक निश्चित रक्कम त्या खात्यावर जमा करावी.
  • दोघांनीही आपलं वैयक्तिक आरडी खाते उघडावे. वर वर पाहता गुंतवणुकीचा हा अगदी साधा पर्याय वाटत असला तरी महिन्याकाठी बाजूला केलेली छोटी रक्कम ठराविक कालावधीनंतर जेव्हा एकत्रितपणे हातात मिळते तेव्हा ती जमा रक्कम एखादया गॅजेट किंवा अप्लायन्स खरेदी, घराचं इंटेरिअर, व्हेकेशन ट्रिप, पॉलिसीचे हप्ते, इत्यादिसाठी उपयोगी पडते.
  • दरवर्षी एक निश्चित रक्कम ‘एफडी’साठी बाजूला ठेवावी. गृह अथवा कार खरेदीसाठीचे डाऊन पेमेंट, गृहकर्जाचे प्रिपेमेंट किंवा परतफेड, हनिमून टूर, घराचे नूतनीकरण, इत्यादीसाठी तसंच आपत्तीकालीन परिस्थितीत हमखास उपयोगी पडणारी गुंतवणूक म्हणजे एफडी. विवाहपूर्व नियोजन करताना एफडी गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे होणारा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे प्रतिवर्षी ठराविक गुंतवणूक करण्याची सवय लागते.  
  • सुयोग्य गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्टॉक, शेअर्स, म्युच्युअल फंड अशा ठिकाणी केलेली गुंतवणूक जास्त फायदा मिळवून देते. त्यामुळे आपल्या भावी जोडीदाराशी सल्ला मसलत करून आपलं बजेट निश्चित करावं व  तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच यामध्ये गुंतवणूक करावी.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2GnZDwU )

“व्हॅलेंटाईन विक”मागचं खरं अर्थकारण , विवाहानंतरचे आर्थिक नियोजन ,

२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…आर्थिक नियोजनातून श्रीमंती

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.