Arthasakshar Financial planning For Family
Reading Time: 3 minutes

संकटकाळातील आर्थिक नियोजन

गेले काही दिवस आपण सर्वच जण आणि त्याबरोबर जगातील सर्व लोक मोठ्या संकटाशी सामना करीत आहोत. वर्षांची सुरुवातच, बहुतेक सर्वच क्षेत्रात कमी झालेल्या मागणीने झाली. यानंतर जे आरोग्य संकट आले त्याचे रूपांतर आर्थिक संकटात कधी झाले ते समजलेच नाही. 

आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !

  • अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागत असून कमी पगारात नोकरी करण्यास सांगितले जात आहे. 

  • सरकारी कर्मचाऱ्यांची महागाईभत्यातील वाढ रोखून धरण्यात आली आहे. 

  • सर्वाना वेतन देण्याचा सरकारी आदेश असूनही, खाजगी कंपनीतील अनेक कायम कर्मचारी मार्च एप्रिल मधील कुलुपबंदीतील काळातील वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

  • यात सर्वाधिक हाल ज्यांचे पोट हातावर आहे त्यांचे होत आहेत आणि गरिबी तिचे मूळ आहे. 

  • अनेक कुटूंबे केवळ सरकारी आणि स्वयंसेवी मदतीवर अवलंबून असून त्यातील कित्येकजण ८००/१००० कि मी पायपीट करून आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. 

  • जिथे पुरेसे उत्पन्नच नाही तेथे बचतीची शक्यता कमी किंवा अपुरीच असणार. त्यामानाने आपण सुस्थितीत आहोत आपण अनपेक्षित संकटासाठी म्हणून केलेले नियोजन फसले आहे.  

  • आपले फसलेले आर्थिक नियोजन एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच, याचे कारण असे काही संकट होऊ शकते याचा अनुभव नसल्याने आपण तयारीच केली नव्हती. 

कोरोनाव्हायरस आणि करिअर

या संकटकाळातील आर्थिक नियोजन करताना अनेक गोष्टींचा पुनर्विचार आवश्यक आहे. यापुढे नव्याने आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करायला हवे, त्याची पूर्वतयारी लगेचच करायला हवी. यात काही चुकी झाल्यास त्याचा आणखी मोठा फटका आपल्याला बसू शकतो. यासाठी थोडीशी तडजोड आणि समतोल साधणे आवश्यक आहे. तेव्हा या बिकट काळात कदाचित होऊ शकणाऱ्या, झालेल्या चुकांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.

स्वतःला ओळखा, सतर्कता बाळगा: 

  • योग्य नियोजन करूनही आपल्याकडून अनावधानाने काही गोष्टी करायच्या राहिल्या का? 

  • आपण या काळात खर्च किती आणि कसा केला पाहिजे यावर बारकाईने लक्ष ठेवले होते का? संकटकाळात जरी आपल्याकडे पर्यायी योजना असेल तर ती आपण योग्य रितीने वापरली का? 

  • यातील कोणत्या अनावश्यक गोष्टी टाळता आल्या असत्या? 

  • नोकरी करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ज्यांचा स्वतःचा उद्योग आहे त्यांनी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

  • आपण जो खर्च टाळूच शकत नाही तेवढा आणि मोजकाच करावा. असे करत असताना त्यात काही त्रुटी राहिल्या तर त्यात सुधारणा कराव्यात. 

  • चूक लक्षातच न घेण्याची चूक करू नये. 

  • कमीवापर, पुनर्वापर, पुनर्रचक्रीकरण या त्रिसूत्री पुन्हा अमलात आणाव्यात का? याचा विचार करावा.

आली सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याची वेळ !

विशेष खर्चावर आळा घाला: 

  • नियमित खर्च कमी करण्याबरोबरच नवीन मोठी गुंतवणूक / खर्च शक्यतो टाळा. 

  • शाश्वत जीवनशैलीचा आपण पुरस्कार करणार का? 

  • आपल्या खऱ्या गरजा खूप कमी आहेत हे आपल्याला समजलंय का? 

  • प्राप्त परिस्थितीत आपल्याकडील प्रत्येक रुपया जाणीवपूर्वक वापरणे अत्यंत गरजेचे आणि कौशल्याचे आहे. त्याचबरोबर नवीन संधींचा शोध चालू ठेवा.

आर्थिक संकटांचा पुनर्विचार

कर्ज हप्ते लांबवू नका: 

  • कर्ज हप्ते लांबवणे म्हणजे आपली भविष्यातील देयता अधिक वाढवणे, ही सवलत असून सूट नाही. 

  • क्रेडिट कार्ड वरील पैसे भरण्याचे थांबवू नये यावर सर्वोच्चदराने व्याज आकारणी होते. 

  • जर शक्य असेल, तर हे हप्ते टाळू नका यासाठी मित्र, नातेवाईक, हितचिंतक यांची मदत घेण्यास कमीपणा वाटून घेऊ नका. 

  • यानिमित्ताने नात्यांची नव्याने ओळख होईल, काहींशी नवे ऋणानुबंध जुळतील.

दिवस असे की कोणी माझा नाही….

मुदत विमा व आरोग्यविमा यांचे हप्ते चुकवू नका: 

  • प्रत्येक कुटुंबाची ही अगदी प्राथमिक गरज असून हे हप्ते त्यास दिलेल्या मुदतवाढीसह लक्षात ठेवून वेळच्या वेळी भरत रहा. 

  • या कालावधीत मुदत संपणाऱ्या पॉलिसीजना अनेक कंपन्यानी ३० जून पर्यंत स्वतःहून मुदतवाढ दिली आहे.

  • वाढीव काळात उपचार घेण्याची वेळ आल्यास त्यापूर्वी पॉलिसी नूतनीकरण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. 

  • इन्शुरन्स नियामक IRDA यांनी सर्वच कंपन्यांना कुलुपबंदीतील (Lockdown) काळामध्ये देय प्रीमियम भरण्यासाठी  नियमित वाढीबरोबरच ३० दिवसाची अधिक मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत.

  • त्याचप्रमाणे या काळात बंद होणाऱ्या युलीप योजनाबाबत गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये अशाप्रकारे दरवर्षी टप्याटप्याने गुंतवणूक काढून घेणे किंवा एकरकमी गुंतवणूक काढून घेण्याची तडजोड योजना सुचवून असे करार करण्याचे आदेश दिले आहेत.

वित्तीय आणीबाणी म्हणजे काय? 

भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढणे:

  • हा निधी खरंतर आपल्या निवृत्तीनंतरचे नियोजन करण्यासाठी वापरायचा असतो. सध्या यातून आर्थिक गरज भागवण्यासाठी काही रक्कम काढून घेण्याची परवानगी आहे. 

  • असे केल्याने या रकमेवर मिळू शकणारे चक्रवाढव्याज आपल्याला मिळणार नाही त्यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकते. 

  • यावर मिळणारा करमुक्त परतावा सर्वोच्च आहे, तेव्हा होता होईतो यातील रक्कम काढू नये.

 कोरोना -अभूतपूर्व, अमुलाग्र धोरणात्मक बदलांची अपरिहार्यता आणि संधीही !

घाईघाईने निर्णय घेणे : 

  • शेअरबाजार कोसळून त्यात तीव्र चढ उतार दिसत असल्याने आपल्याकडे असलेल्या शेअर्सचे भाव खाली येऊन मोठया प्रमाणात खालीवर होत आहेत. 

  • त्याप्रमाणे म्युच्युअल फंड योजनाच्या युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य खूपच कमी झाले आहे.

  •  याची टोकाची प्रतिक्रिया म्हणून घाबरून जाऊन विक्री करणे, नियमित गुंतवणूक थांबवणे योग्य नाही.

  • त्याचप्रमाणे आपल्याकडे पैसे आहेत म्हणून संधी असली, तरी एकरकमी मोठी गुंतवणूक टाळावी. 

  • बाजार अजून खाली जाईल की नाही हे कोणीच सांगू शकत नाही.

कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

आपण खरोखरच आर्थिक अडचणीत आहोत का? याचा नीट विचार करावा. 

अडीअडचणीच्या प्रसंगी उपयोगी पडेल या हेतूने ठेवलेले परंतू अनेक अडचणींच्या प्रसंगी अजिबात न वापरलेले सोने किंवा अन्य कोणता पर्याय जसे पीपीएफ मधील रक्कम अंशतः काढून घेणे आपल्याला शक्य आहे का? असल्यास त्याचा सुयोग्य वापर करून आपला कमीतकमी तोटा होऊन आर्थिक संकटावर मात करता येईल का? यासारख्या पर्यायाची तपासणी करावी. 

आरोग्य, समाधान, दृष्टिकोन, विचार या गोष्टी विकत मिळत नाहीत त्या आपल्याला कमवाव्या लागतात एवढी जाणीव झाली तरी पुरेसे आहे.

– उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.