Credit Score क्रेडिट स्कोअर
Reading Time: 3 minutes

क्रेडिट स्कोअर (Credit Score)

आपल्या आर्थिक आयुष्यामध्ये आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) हा अत्यंत महत्वाचा स्कोअर आहे. जसे आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपली व्यक्तिगत माहिती विचारतात आपण देखील ते डॉक्टर कसे आहेत, त्यांना किती अनुभव आहे याची पूर्वकल्पना घेत असतो. त्याचप्रमाणे कर्ज घेताना प्रत्येक बँक आपली आर्थिक पार्श्वभूमी पाहते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्डद्वारे किती व कसा व्यवहार केला आहे हे पाहिले जाते. आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तपासून पाहिला जातो. आपण कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घेत असतो. हे कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. 

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? 

  • क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, ज्यावरून एखाद्याची आर्थिक पत ठरवली जाते.
  • हा स्कोअर क्रेडिट ब्युरोकडून ठरवण्यात येतो. 
  • कर्ज देणा-या संस्थांकडून प्रत्येक महिन्यात या क्रेडिट स्कोअरविषयी माहिती देण्यात येते. यासाठी क्रेडिट रिपोर्ट मिळवणे आवश्यक असते. 
  • क्रेडिट रिपोर्ट देण्यासाठी “सिबिल” ही संस्था कार्य करत असते. जितका अधिक क्रेडिट स्कोअर तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. 
  • ७०० हा पुरेसा, ७५० पेक्षा जास्त हा अधिक चांगला व ८०० हा उत्तम क्रेडिट स्कोअर मानला जातो

कमी क्रेडिट स्कोअरची कारणे 

  • क्रेडिट स्कोअर कमी असण्याची अनेक कारणे आहेत. कर्ज घेणा-या व्यक्तींच्या काही चुकांमुळे आणि बँकांच्या त्रुटींमुळे क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. 
  • बँकेकडून एखादी चुकीची माहिती टाकण्यात आली तरी क्रेडिट स्कोअर कमी होतो. 

Credit Score: क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे घटक

१. कर्जदाराने केलेले आर्थिक व्यवहार: कर्जदाराने ज्याप्रकारे वित्त व्यवहार केले आहेत, त्यानुसार क्रेडिट स्कोअर वाढतो किंवा कमी होऊ शकतो. 

२. क्रेडिट कार्डवरील थकीत शिल्लक: काही क्रेडिट कार्ड धारक त्यांची महिन्याची बिले वेळेवर भरत नाहीत, ज्यामुळे थकबाकी साठते व याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. 

३. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स:कर्जदाराने एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल, तर प्रत्येक वेळी बँक त्याचा क्रेडिट रिपोर्ट तयार करते. त्यावेळी क्रेडिट स्कोअर तपासून बघते व यासंदर्भात चौकशीही होऊ शकते. 

४. क्रेडिट कार्डचा जास्त वापर: जर कर्जदाराने क्रेडिट मर्यादेपेक्षा ३०℅ जास्त प्रमाणात क्रेडिट कार्ड वापरले तर त्याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. 

५. बिले भरण्यास उशीर करणे: जर क्रेडिट कार्डधारकाने क्रेडिट कार्डच मासिक बिल भरण्यासाठी उशीर केला तर त्याची नोंद क्रेडिट कार्ड रिपोर्टमध्ये करण्यात येते व याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट कार्डच्या सिबिल स्कोअरवर होतो. 

विशेष लेख: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

Credit Score: क्रेडिट स्कोअर कसा सुधारेल?

क्रेडिट कार्ड रिपोर्टचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे : 

  • काही वेळा तुमचे सगळे व्यवहार व्यवस्थित असुनही क्रेडिट कार्ड स्कोअर कमी होऊ शकतो याचं कारण म्हणजे तुमच्या बँकांनी तुमच्याबद्दलची दिलेली चुकीची माहिती. बँकांच्या रिपोर्टमध्ये काही विसंगती असल्यास क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो म्हणून तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहणे आवश्यक असते. 
  • तुम्ही उशीरा भरलेल्या बिलांची माहिती अहवालात नमूद करताना काही चुका होऊ शकतात, त्यामुळे क्रेडिट कार्डचा स्कोअर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्ड रिपोर्ट तपासून पाहणे गरजेचे आहे. 

क्रेडिट कार्डची सर्व बिले मुदतीत भरा : 

  • क्रेडिट कार्डचे बिल असो किंवा एखाद्या कर्जाचा हप्ता वेळेत भरणे चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी पोषक ठरते. 
  • एखादं बिल किंवा हप्ता वेळेत भरला गेला नसेल तर त्याची नोंद सिबिल रिपोर्टमध्ये केली जाते, म्हणून क्रेडिट कार्डचा स्कोअर सुधारण्यासाठी बिले मुदतीत भरणे आवश्यक आहे. 

क्रेडिट कार्डची मर्यादा ओळखून खर्च करा : 

  • आपल्या क्रेडिट कार्डच्या उपयोगावरील प्रमाणाचा प्रभाव क्रेडिट स्कोअरवर पडत असतो. खर्चाला प्रतिबंध करण्यासाठी आपली क्रेडिट कार्डची मर्यादा ठरवून घेणे चांगले. 
  • क्रेडिट कार्डची मर्यादा ओलांडली गेली तर याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. 

महत्वाचा लेख: डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

कर्जाचे व्यवस्थापन : 

  • कर्जाबद्दलची ज्यावेळी माहिती येते, तेव्हा कर्ज दोन प्रकारची असतात. तारणी कर्ज व बिनातारणी कर्ज. तुम्ही बरीच कर्ज कुठलेही तारण न ठेवता घेतली असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी व्हायला सुरुवात होते. 
  • वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज मानले जाते तर गृह कर्ज किंवा कार लोन हे सुरक्षित कर्ज मानतात. क्रेडिट कार्ड स्कोअर ठरविताना बँक सर्व घेतलेल्या कर्जाचे व्यवहार तपासून पाहते. 
  • थोडक्यात सांगायचं तर पूर्णपणे आवश्यक नाही तोपर्यंत कर्ज घेण्याचा विचार करू नका. 

क्रेडिट स्कोअरविषयी सतत चौकशी करू नका : 

  • सतत क्रेडिट कार्डचा स्कोअर जाणून घेण्यासाठी विनंती केल्यास क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. 
  • महिन्यातून तीन किंवा अधिक वेळा क्रेडिट स्कोअरसाठी चौकशी केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. 

क्रेडिट स्कोअर चांगला असण्याचे भरपूर फायदे आहेत. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज मिळणे सहज शक्य होते व व्याजदरातही सूट मिळवता येते. वरील काही गोष्टी लक्षात घेऊन आपला क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी प्रयत्न करा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.