Arthasakshar Importance of Filing ITR on time in marathi
https://bit.ly/3fQwQyC
Reading Time: 3 minutes

आयटीआर व देयकर लवकरात लवकर भरणे अधिक फायद्याचे !

कोविड-१९ या संकटामुळे अपेक्षेप्रमाणे सर्वच करदात्यांना आयटीआर (ITR) किंवा आयकर विवरणपत्र भरण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याचा अर्थ असा घेतला जातो की अजून बराच वेळ आहे. तेव्हा आता आटीआर सावकाश भरले तरी चालेल असा याचा अर्थ घेतला जातो तो चुकीचा आहे. आपण आटीआर उशिरा भरल्यामुळे आपल्याकडून जो दंड घेण्यात येतो तो या वाढीव तारखेपर्यंत घेतला जाणार नाही.

वेतनमोजणी – कोणता करपर्याय स्वीकारू? …

  • आयटीआर वेळेवर भरण्यात सर्वात मोठी अडचण आपल्या मालकाकडून फॉर्म १६ अजून मिळालेला नसणे आणि आपला कापलेला कर फॉर्म २६/ए एस मध्ये न दिसणे. जेव्हा या गोष्टी उपलब्ध होतील तेव्हा लगेचच आपले विवरणपत्र भरावे. 
  • आपले अंदाजे सर्व मार्गानी होणारे उत्पन्न किती त्यातून नियमानुसार वजावटी घेतल्याने निव्वळ करपात्र उत्पन्न किती होते याचा अंदाज काढून ठेवा.
  • आपणास जेवढा कर द्यावा लागतो तेवढाच पोहोच झालेला असण्याची शक्यता जवळपास नसल्याने  यात फक्त दोनच शक्यता संभवतात.
    1. कर कमी भरलेला असणे, यामुळे आपल्याला देय कर द्यावा लागेल.
    2. कर अधिक भरलेला असणे, यामुळे आपल्याला कराचा परतावा मिळेल. 

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?…

कमी कर भरलेला असणे: 

  • अशा परिस्थितीत आयटीआर उशिरा भरून आपण कमी भरलेला कर भरण्यास लांबवले तरी त्यावर ९% दराने व्याज द्यावे लागते.
  • तेव्हा शक्य असल्यास आयटीआर लगेच भरा नाहीतर देय कराचा अंदाज बांधून तो वेळेवर भरल्यास अधिक व्याज द्यावे लागणार नाही.

अधिक कर भरलेला असणे: 

  • अशा परिस्थितीत आयटीआर भरण्यास जेवढा उशीर होईल तेवढा अधिक कालावधी त्यावर प्रक्रिया होण्यास लागणार त्यामुळे कापलेला कर परत मिळण्यास उशीर होईल. 
  • आयकर खात्याकडून प्रक्रिया होण्यास जास्त कालावधी लागल्यास त्या कालावधीचे १२% प्रमाणे व्याज मिळते. 

आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस …

काही महत्वाच्या गोष्टी –

  • आयटीआर भरताना योग्य फॉर्मचा वापर करणे आवश्यक आहे. 
  • दरवर्षी या फॉर्ममध्ये थोडा बदल केला जातो. तो सोपा बनवला आहे असे सांगण्यात येऊन त्यात अनेक प्रकारची माहिती मागवली जाते. 
  • सुलभ, सुगम, सहज अशा सर्वसाधारण समान अर्थाची नावे त्यास दिली जातात.
  • गेल्यावर्षी सुलभ हे नाव ज्यास दिले त्याचे यावर्षी सुगम असे नाव असू शकते तेव्हा कोणता फॉर्म आपल्याला उपयोगी आहे ते पाहून घ्यावे. 
  • ज्याप्रमाणे आपला देयकर आणि आपण भरलेला कर कधीच तंतोतंत नसतो. त्याच प्रमाणे ITR 1 ज्याचे यावर्षीचे नाव सहज आहे तो उपयोगी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या अतिशय मर्यादित आहे. 
  • बहुतेक सर्व व्यक्तीस काहीतरी लाभांश मिळालेला असतो त्याने म्युच्युअल फंड युनिट विकलेले असू शकतात त्यामुळे त्यांना फक्त  पगारदार असतील व्यक्तींना ITR 2 किंवा ITR 4 (सुगम) हा फॉर्म तर व्यावसायिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ITR 3 भरावा लागेल. 
  • ITR 5, 6, 7 यांचा संबंध पगारदार व्यक्तींशी येत नाही.

आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

  • पूर्ण वर्षात आपल्याकडे ज्या ज्या मार्गाने पैसे आले ते करपात्र असोत अथवा नसोत त्याची यादी,  त्याप्रमाणे विविध सवलती घेण्यासाठी जी बचत अथवा गुंतवणूक केली त्याच्या पावत्या, त्याचप्रमाणे घरबांधणी कर्जावरील व्याज यांचे प्रमाणपत्र घ्यावे, यात अनेक गोष्टी येऊ शकतील. 
    • सर्व प्रकरच्या ठेवी, कर्जरोख्यांवरील व्याज, 
    • मागील वर्षीच्या आयकर परताव्यावरील व्याज, 
    • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज, 
    • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF),  
    • करमुक्त रोख्यावरील व्याज, 
    • अज्ञान पाल्याचे उत्पन्न, 
    • डिव्हिडंड, अल्पकालीन व दीर्घकालीन भांडवली नफा, 
    • आपल्या उत्पन्नातून कुटूंबातील अन्य सदस्यांच्या नावे केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न, 
    • घर किंवा दुकान यापासून मिळणारे भाडे, 
    • अन्य काही व्यवसाय असल्यास त्यापासून मिळणारे उत्पन्न, भागीदारी असल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न,
    • लॉटरी, बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम, 
    • अन्य कोणत्याही मार्गाने मिळालेली रक्कम या सर्वातील लागू असतील अशा गोष्टींचा यात विचार होईल. 
    • याशिवाय फॉर्म १६ यातील ८०/सी गुंतवणूक तपशील, यात नसलेल्या परंतू स्वतंत्ररित्या केलेल्या गुंतवणूकीचा तपशील, आपल्यासाठी अथवा आपल्या पालकांसाठी दिलेला आरोग्यविमा हप्ता, देणगी म्हणून दिलेली रक्कम, फॉर्म २६/ ए एस, अग्रीम कराच्या पावत्या यातील लागू असलेल्या गोष्टी एकत्र ठेवाव्यात म्हणजे एकूण उत्पन्न व करमोजणी करणे सोपे होईल. 

आयकर रिटर्न भरण्यासाठीची महत्त्वाची १० कागदपत्रे…

  • देयकर मोजून बाकी असेल तर ताबडतोब भरावा त्यावेळी अथवा शक्य तितक्या लवकर आपला आयटीआर भरून अगदी आयत्या वेळी होणारी धावपळ टाळण्यातच त्यांचे हित आहे.

उदय पिंगळे

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutes पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.