ITR 5 : जाणून घ्या आयटीआर फॉर्म-५ बद्दल सविस्तर माहिती

Reading Time: 2 minutes

दरवर्षी करदात्याला आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरावे लागते. परंतु, ‘मला नक्की कोणता फॉर्म लागू होतो’ यामध्ये अनेकजणांचे जमलिंग होते, ज्याने अनेकदा करदात्यांकडून चुकीचा फॉर्म भरला जातो. याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. 

 

करदात्याला योग्य आयकर विवरणपत्राविषयी सर्व अचूक माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून या लेखामध्ये आपण ‘आयटीआर फॉर्म-५’  (ITR-5) या फॉर्मविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

तुम्ही जर आयटीआर फॉर्म-५ दाखल करत असाल तर तुम्हाला हा लेख नक्कीच उपयोगी पडेल. 

 

हे ही वाचा – ITR : करदाते ITR-1 फॉर्म केव्हा वापरू शकत नाहीत याची १० कारणे

 

आयटीआर फॉर्म-५ मध्ये कोणती माहिती देणे अपेक्षित आहे ? (ITR-5 Filing)

 

 • करदात्याच्या सामान्य माहिती, ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षाचा ताळेबंद (Balancesheet)  , नफातोटा पत्रक (Profit & Loss Account)इ. सविस्तर माहिती फॉर्म मध्ये भरणे आवश्यक आहे. 
 • तसेच स्थावर मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे तपशील, व्यापार किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्न किंवा नुकसानीची माहिती, भांडवली नफा, इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न याची माहिती द्यावी. 
 • कलम १०एए अंतर्गत कपात किंवा ८०जी अंतर्गत वजावटींसाठी मिळणाऱ्या देणग्यांचे तपशील इ. देणे आवश्यक आहे. 
 • नव्या वार्षिक माहिती पत्रकामुळे (AIS) सरकारकडे भरपूर माहिती आहे त्यामुळे सावधपूर्वक व्यवस्थित संपूर्ण माहिती आयटीआरमध्ये देणे आवश्यक आहे.  

 

आयटीआर फॉर्म-५  कोणी भरावा  – (Eligibility criteria for ITR-5)

खाली नमूद केलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था आयटीआर फॉर्म-५ भरण्यासाठी पात्र आहेत.

 • मर्यादित दायित्व भागीदारी असलेली कंपनी, 
 • असोसिएशन ऑफ पर्सन (AOP), 
 • बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स (BOI), 
 • आर्टीफिशिअल ज्युडिशिअल पर्सन (AJP), 
 • मर्यादित दायित्व भागीदारी व्यक्तींची संघटना
 • सोसायटी नोंदणी कायदा, १८६० अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्था
 • मृत व्यक्तीची इस्टेट
 • कलम १३९ (4E) मध्ये संदर्भित व्यवसाय ट्रस्ट
 • कलम १३९ (4F) मध्ये संदर्भित गुंतवणूक निधी
 • बिझनेस ट्रस्ट, 
 • स्थानिक प्राधिकरण 
 • सहकारी संस्था  

 

हे ही वाचा – ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा

 

आयटीआर फॉर्म-५ ऑनलाईन कसा भरावा  – (ITR-5 Online form filing)

 • आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फायलिंग वेबसाइटला भेट देऊन आयटीआर फॉर्म-५ ऑनलाइन दाखल करा. 
 • तुमच्या विवरणपत्रामध्ये रिटर्न फॉर्ममधील सर्व डेटा हस्तांतरित करणे गरजेचे आहे. 
 • जर फॉर्मचे व्हेरिफिकेशन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सबमिट करायचे असेल तर कागदपत्रावर डिजिटल पद्धतीने स्वाक्षरी करावी. 
 • इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल केलेल्या आयटीआर-५ फॉर्मच्या व्हेरिफिकेशनसाठी, कागदपत्रावर डिजिटल स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे.
 • हा फॉर्म फाईल करताना त्यासोबत कोणत्याही कागदपत्रांची जोडणी आवश्यक नाही. 
 • आयटीआर फॉर्म-५ फाईल करताना तुमचे उत्पन्न फॉर्म २६एएस सोबत तपासून व जुळवणी करून मगच फाईल करा. 

 

२०२१-२२ या असेसमेंट वर्षामध्ये आयटीआर फॉर्म-५ मध्ये झालेले महत्त्वाचे बदल

 • टॅक्स लेखीपरीक्षण मर्यादा (Tax Audit Limits) रु. ५ कोटींवरून आता रु. १० कोटी पर्यंत. (जिथे रोख व्यवहार एकूण व्यवहारांच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.)
 • प्राप्तकर्त्याला मिळणारा लाभांश (Dividend) हा करपात्र असणार आहे. 
 • कलम १९४N अंतर्गत रोख पैसे  काढण्यासाठी लागू झालेले टीडीएस कपात पुढील वर्षापर्यंत नेता येणार नाही.
 • विवरणपत्रामधील अहवालाची आवश्यकता फक्त भारतातील रहिवासी करदात्यांसाठी अनिवार्य.
 • मूल्यमापनकर्त्यांना परकीय मालमत्तेचा तपशील आर्थिक वर्षाच्या आधारावर मार्चऐवजी डिसेंबर पर्यंत आहे. 

 

आयटीआर फॉर्म-५ भरण्याची अंतिम तारीख – (Due date for filing ITR-5)

 

नॉन-ऑडिट केससाठी ऑडिट केससाठी
आर्थिक वर्ष २०२२-२३

(AY 2022-23)

३१ जुलै २०२२ ३१ ऑक्टोबर २०२२ 
आर्थिक वर्ष २०२१-२२ 

(AY 2021-22)

३१ डिसेंबर २०२१ १५ मार्च २०२२

Leave a Reply

Your email address will not be published.