Reading Time: 2 minutes
क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांकाचे अंकगणित
आंतरराष्ट्रीय रोखे ओळख क्रमांक कसा ठरवतात याविषयी आपण मागील लेखात ओळख करून घेतली. याची माहिती मी मिळवीत असताना असं लक्षात आलं की, आपल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड क्रमांकाने आपली ओळख निश्चित करण्याची पध्दतही अशीच आहे. सर्वसाधारणपणे या कार्डावर 16 अंकी क्रमांक असतो ज्याद्वारे हे कार्ड धारण करणारी व्यक्ती तिचे खाते याची ओळख पटवण्यात येते. हा क्रमांक निश्चित करण्यामागे विशिष्ट असे अंकगणित आहे. त्यातून कार्ड देणारी संस्था (Operating Agency) आणि त्याची सहयोगी संस्था व त्याचा वापर करणारी व्यक्ती हे कोणताही क्रमांक अथवा अनुक्रमाने न देता तो विशिष्ट अशा पध्दतीने दिला जातो. ती पद्धत कशी असते ते समजून घेऊयात.
हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमध्ये काय फरक आहे ?
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड क्रमांक:
- हा एक 12 ते 19 पदांचा क्रमांक असून ही सर्व पदे अंकात असतात.
- उदा. अमेरिकेत एक्सप्रेस ने जारी केले कार्ड 15 अंकी तर विसा, मास्टरकार्ड, या सारख्या एजन्सीने जारी केलेली कार्ड 16 अंकी संख्येत आहेत.
- यातील आपल्या डावीकडील पहिला अंक हे कार्ड कोणत्या संस्था अथवा उद्योगाकडून दिले गेले ते सांगतो.
उद्योग / संस्था | क्रमांक |
विमानसेवा (Airlines) | 1 किंवा 2 |
प्रवास/ मनोरंजन (Travels/Entertainment) | 3 |
बँका /आर्थिक संस्था (Bank & Financial Services) | 4 किंवा 5 |
व्यापारी संस्था (Merchandising, banking) | 6 |
तेल रसायन उद्योग, बँकिंग (Petroleum) | 7 |
आरोग्य, संदेशवहन (Health, Telecommunication) | 8 |
राष्ट्रीय पातळीवरील विशेष संस्था (National Assignments) | 9 |
कार्ड जारी करणारी सहयोगी संस्था:
- यानंतरचे 5 अंक म्हणजेच आपल्या डावीकडील 6 अंक हे उद्योग आणि त्याच्या सहयोगी संस्था यांची ओळख करून देतात.
- समजा कार्डावर 16 क्रमांक असतील तर डावीकडील 6 अंक उद्योग व सहयोगी जारीकर्ता यापुढील 9 क्रमांक हा आपला जारीकर्त्याने ग्राहकाला दिलेला विशिष्ठ ओळख क्रमांक असतो.
- या 15 क्रमांकावर विशिष्ट प्रक्रिया करून 16 क्रमांक दिलेला असल्याने आणि तो आधीच्या 15 अंकांवर तो अवलंबून असल्याने त्यास पडताळणी क्रमांक असे म्हणतात.
हे नक्की वाचा: एटीएम कार्ड हरवले? त्वरित करा हे ६ उपाय
क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांकाचे अंकगणित:
- आपल्याला मिळालेले कोणतेही एटीएम कम डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पहा.
- त्यावर 16 अंक आहेत.
- यातील आपल्या डावीकडील 6 अंक कार्ड देणारी संस्था व तिची सहयोगी संस्था याची ओळख पटवून देतात.
- यापुढील 9 क्रमांक हे ज्याला कार्ड दिले आहे त्या ग्राहकाची ओळख पटवून देतात.
- शेवटचा अंक हा पडताळणी क्रमांक आहे.
- उजवीकडील हा क्रमांक वगळून येणाऱ्या संख्येतील एक आड एक संख्येचे 2 गट करा.
- यातील सम स्थानी असणाऱ्या संख्येस 2 ने गुणा. येणारे उत्तर दोन अंकी संख्या असल्यास त्यातील सम विषम स्थानाची बेरीज करून येणारा अंक विचारात घ्या.
- आता सर्व संख्यांची बेरीज करा या उत्तरात पडताळणी अंक मिळवल्यास येणाऱ्या संख्येस 10 ने निःशेष भाग जात असल्यास कार्ड क्रमांक अचूक आहे.
- आपल्या डेबिट/ क्रेडिट कार्डाचा नंबर अचूक असल्याची पडताळणी आपल्याला करता येईल. या कार्डावर असलेली चिप, चुंबकीय पट्टी किंवा अलीकडे वापरली जात असलेली
- ही पद्धत IBM या कंपनीतील हॅन्स पीटर ल्युहान या अभियंत्याने सन 1954 मध्ये शोधली त्याचे समीकरण बनवले आणि या शोधाचे पेटंट मिळवले.
जागतिक मानक संघटनेने त्यास मान्यता दिली असून यामागील सूत्र संकेतस्थळावर सार्वजनिक माहितीसाठी प्रकाशित केले आहे. ल्युहान अल्गोरिदम किंवा मोल्युलू 10 अल्गोरिदम या नावाने ते आता ओळखले जाते. (Worldwide Standard ISO/IEC 7812-1) याचाच वापर करून जगभरातील अनेक क्रमांकाची सत्यता पटवण्यात येते.
- चलभाषची (mobile)ओळख IMEI,
- अमेरिकेतील आरोग्यसेवा देणाऱ्या संस्था NPI,
- इस्रायल देशाचा नागरिकत्व क्रमांक Tehudat Zehut,
- कॅनडाच्या नोकरी करणारे सामाजिक सुरक्षितता योजनेचे लाभार्थी SIN,
- ग्रीकमधील सामाजिक सुरक्षितता योजनेचे लाभार्थी AMKA.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :