Career Break
Reading Time: 3 minutes

Career Break

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण इतका वाढला आहे की त्यांना खरोखरच आपल्याला करिअर ब्रेक (Career Break) घ्यायची गरज आहे, असं जवळपास प्रत्येकालाच वाटत असेल. नोकरदार माणसाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरत असतं. परंतु, सध्या दैनंदिन आयुष्यातून काही वेळ काढून प्रत्येकाने छंद सुद्धा जोपासावेत, स्वतःसाठी सुद्धा जगावं हे विचार इतके प्रचलित झाले आहेत की, नोकरी करणे हे कित्येक जणांना कंटाळवाणं काम वाटत आहे. तरीही  ‘करिअर ब्रेक’ घेणं हे सामान्य माणूस कसं साध्य करू शकतो का, तर याचं उत्तर हो असंच आहे. आता हे कसं सध्या करायचं याबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.  

हे नक्की वाचा: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

Career Break: करिअरमध्ये ब्रेक घेताना –

१. कमी पैशात जगण्याची सवय लावणे: 

  • आपल्या गरजा, खर्च कमीत कमी ठेवणे आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा मान ठेवणे हे आपण सर्वांनी आजपासूनच शिकणं गरजेचं आहे. 
  • उपलब्ध असलेल्या पैशातच पुढील काही दिवस जगण्याची सवय ‘करिअर ब्रेक’ घ्यायची इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला लावून घेणं आवश्यक आहे. 
  • दर महिन्यात येणारा पगार इथून पुढे येणार नाही, हे समजून आपण आपलं महिन्याचं ‘कमीत कमी खर्चाचं बजेट’ तयार करणं आवश्यक आहे. 
  • बजेट तयार झाल्यावर खर्चाच्या यादीतील अत्यावश्यक खर्चांनाच त्या यादीत ठेवणे हे आपण दर महिन्यात करणं आवश्यक आहे. कोणत्या वस्तू किंवा सेवांशिवाय आपण जगू शकतो याचा विचार केला पाहिजे.

२. एक वर्षाचं आर्थिक नियोजन करणे: 

  • करिअर ब्रेक घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या बचत करण्याच्या पद्धतीचा फेरविचार केला पाहिजे. 
  • पुढील १ वर्ष कोणत्याही मिळकतीशिवाय आपण राहू शकतो इतक्या रकमेची बचत केली पाहिजे. 
  • जर तुमच्या घरात तुमच्याशिवाय अजूनही कमावणाऱ्या व्यक्ती असतील, तर हा कालावधी १ वर्षापेक्षा कमी सुद्धा केला जाऊ शकतो. 
  • तुमच्या मूळ कामासोबत इतरही कमावण्याचे मार्ग तयार करून ठेवणं कधीही चांगलं. कारण, तुम्ही ब्रेक घेतल्यानंतर मार्केट हे आधीसारखंच असेल याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. 
  • तुम्ही जर एका ठराविक तुमच्या बँकेत जमा करून ठेवली, तर निदान त्या व्याजावर तुम्ही महिन्याचे खर्च भागवू शकतात. 

३. ‘आपात्कालीन’ परिस्थितीसाठी पैसे जमा ठेवणे: 

  • आर्थिक नियोजन करताना काही पैसे हे ‘आपात्कालीन परिस्थिती’ साठी सुद्धा बाजूला ठेवणे गरजेचं आहे. 
  • ‘हे पैसे आपत्कालीन परिस्थितीशिवाय न वापरणे’ हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. 
  • तुम्ही करिअर ब्रेक घ्या अथवा नको घेऊ, पण ‘आपत्कालीन’ परिस्थितीसाठी पैसे बाजूला ठेवणे आजपासूनच सुरू करा. 
  • तुम्हाला जेव्हा दर महिन्यात पगार येणार नसेल तेव्हा अशी परिस्थिती ओढवली तर तुम्ही काय करणार ? याचं उत्तर स्वतःला नक्की द्या. 

विशेष लेख: Job or Business: नोकरी करू की व्यवसाय?

४. ‘मौज करण्यासाठी पैशांची सोय करून ठेवणे’: 

  • तुम्ही नोकरीवर नसल्यावर तुम्ही अगदीच तुमचं मन मारून जगू शकत नाहीत. 
  • तुमची, तुमच्या मित्रांची, नातेवाईकांची या काळात फिरायला जाण्याची इच्छा होऊ शकते. तेव्हा तुम्ही सर्व काही नाकारून घरात आनंदी बसू शकणार नाहीत. 
  • तुमच्या आजच्या कमाईचे १०% पैसे हे ‘मौज’ करण्यासाठी राखीव ठेवा. तुमच्या नोकरी न करण्याच्या काळात हेच पैसे तुमच्या कामी येतील. 

५. विमा उतरवणे: 

  • तुमच्या कंपनीकडून मिळणारं विमा कवच हे तुम्ही नोकरीत असेपर्यंतच मिळू शकतं. तुम्ही जेव्हा करिअर ब्रेक घेता तेव्हा तुमच्या आरोग्य विमा, जीवन विमा यांची काळजी ही तुम्हालाच घ्यावी लागते. त्याची सवय आजपासूनच लावून घ्या. 
  • तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाप्रमाणे तुमचा आरोग्य विमा आजच निश्चित करा आणि ते पैसे दरवर्षी तुम्हीच भरा, म्हणजे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहू शकतात.

६. पैसे कमावण्याचे अतिरिक्त मार्ग तयार करून ठेवणे: 

  • करिअर ब्रेक घेणे म्हणजे काहीच न करणे असं नाही. शेअर बाजार, घरी बसून काम करता येईल अशा संधीच्या शोधत रहाणं गरजेचं आहे. 
  • हे काम आजपासून सुरू केल्यास तुमच्या करिअर ब्रेक मध्ये तुम्हाला हेच कमाईचे मार्ग उपयोगी पडू शकतात. 

७. अपेक्षित खर्चाचं नियोजन करा: 

  • तुमच्या करिअर ब्रेकनंतर पुन्हा नोकरी सुरू करताना तुम्हाला कदाचित एखादा कोर्स करणं आवश्यक असू शकतं. 
  • तुमच्या क्षेत्रानुसार तो अभ्यास करूनच तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे. या कोर्सची फि किती असेल, हे तुमच्या बजेटमध्ये लिहून ठेवणं आवश्यक आहे. 

करिअर ब्रेक घेणे ही गोष्ट ऐकताना, वाचताना एखादी जादुई गोष्ट वाटू शकते. या ब्रेकमध्ये आणि ब्रेकनंतर येणाऱ्या सर्व आर्थिक गरजांचा अंदाज घेऊनच आपल्या जबाबदारीवर हा निर्णय घ्यावा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.