सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्याचे १० उपाय

Reading Time: 3 minutes

सोशल मीडियाचे व्यसन 

काही वर्षांपूर्वीपासून सोशल मीडियाचे अस्तित्व आहे पण आत्ता या काही वर्षातच याची इतकी सवय होऊ लागली आहे की या सवयीचं आपल्याला व्यसन लागले आहे. या व्यसनामुळे अगदी मानसिक अस्वास्थ्यातदेखील होऊ लागलं आहे, असं का? कारण आधी सोशल मीडिया जास्त करून फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरच वापरता येत होता किंवा अगदी मोबाईल किंवा टॅब्लेटवर जरी म्हणलं तरी ते सर्वांनाच परवडण्यासारखं नव्हतं पण आजची परिस्थिती बदलली आहे. 

आज अनेकांची कमाई तर वाढली आहेच पण स्मार्टफोन्सचे दरही अगदी सर्वसामान्यांनाच्या खिशालाही सहज परवडण्यासारखे आहेत. एखादा फोटो शेअर करणे, एखादा व्हिडिओ शेअर करणे या गोष्टी अगदी ‘चुटकीसरशी’ करता येते. सुरुवातीला सहजच किंवा उत्सुकतेपोटी मोबाईल पाहण्याची परिणती कधी सवयीत झाली हे कळलेही नाही. याचे अनेक दुष्परिणाम आज अनेकजण अनुभवत आहेत आणि यातूनच ‘डिजिटल डिटॉक्स’ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असे म्हणावे लागेल. अनेकांना अगदी अशक्य वाटणारी ही गोष्ट तितकीशी अशक्य नाहीये, फक्त काही बदल करण्याची गरज आहे. आज हेच १० सहजसाध्य बदल आज आपण पाहणार आहोत. 

हे नक्की वाचा: मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता 

सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्याचे १० उपाय

१. पुश नोटिफिकेशन्स बंद करणे: 

 • सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्यासाठी ही खूप महत्वाची पायरी आहे.
 • आपण काहीतरी कामात व्यग्र असू आणि अचानक एखाद्या मेसेजचा टोन वाजला की नकळत आपला हात मोबाईलकडे जातो.  
 • अनेकदा आपण फक्त संबंधित मेसेज पाहून फोन बाजूला ठेवला जात नाही, तर इतर मेसेज पण वाचत बसतो, यामध्ये  कितीतरी वेळ जातो. 
 • याच कारणांमुळे सर्व नोटिफिकेशन्स बंद करणे हा एक खूप प्रभावी उपाय आहे.

२. आपल्या प्राध्यान्य असणाऱ्या गोष्टींची यादी बनवा: 

 • आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यांचा प्राधान्य क्रम ठरवा आणि तो एका कागदावर लिहून काढा.  
 • हा कागद सतत तुमच्या डोळ्यासमोर राहील अशा ठिकाणी ठेवा. ज्यामुळे आपोआपच तुम्ही  सोशल मीडियापासून दूर राहायचा प्रयत्न कराल. 

३. वेळेचे बंधन घालून घेणे: 

 • ठराविक वेळाने ठराविक वेळच सोशल मीडियाला द्यायचा असा नियम घालून घ्यायचा म्हणजे अगदी त्यासाठी गजर लावून ठेवायचा आणि स्ट्रिक्टली काहीही झालं तरी फक्त तेवढाच वेळ  द्यायचा. 
 • दर २ तासातून १० मिनिटेच सोशल मीडियाचा वापर करायचा. यामुळे आपल्याला तंतोतंत माहित असते की आपण केव्हा फोन पाहणार आहोत. 

४. स्वतःला खुश करा: 

 • ही पण एक अत्यंत उपयुक्त कल्पना आहे. म्हणजे छोटे छोटे टास्क्स स्वतःला द्यायचे आणि ते पूर्ण केल्यावर थोडा वेळ सोशल मीडिया वापरण्याची ट्रीट स्वतःला द्यायची. 
 • यामुळे आपली कामेही वेळेत पूर्ण होतील, सोशल मीडियाचे व्यसन सोडवण्याची सवयही लागेल आणि सोशल मीडिया वापरण्याची ट्रीट मिळवल्याचा आनंदही मिळेल. 

५. नियमित वापरात नसलेले अँप्लिकेशन्स काढून टाका: 

 • सोशल मीडियापासून दूर राहण्याची सवय मोडण्यासाठी एक प्रभावी मार्ग म्हणजे आपण नियमित न वापरलेले अँप्लिकेशन्स आपल्या फोनमधून डिलीट करणे. 
 • हे जर कठीण वाटत असेल, तर याची सुरुवात स्वतःवर वेळेचं बंधन घालून करता येईल. म्हणजे ठराविक वेळी फोन अजिबात वापरायचा नाही.  
 • उदा. सकाळी नाश्ता करताना, जेवण करताना काहीही झालं तरी हातात फोन घ्यायचा नाही.

संबंधित लेख: तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का? …

६.  तुमच्यामध्ये आणि तुमच्या फोनमध्ये अंतर ठेवायला सुरु करा: 

 • शक्य तितका वेळ तुमचा फोन तुमच्यापासून दूर अंतरावर ठेवा.  
 • सतत फोन जवळ असेल तर हात फोनकडे जातो आणि तो तपासण्यात वेळेचे भान राहत नाही त्यापेक्षा तो लांब असेल तर मुद्दममधुन तपासणे आपोआप टाळले जाते.

७.आपल्या छंदांकडे लक्ष द्या, नवीन छंद जोपासा: 

 • सोशल मीडियाचे व्यसन या एका कारणामुळे आपण आपल्या अनेक छंदांना वेळ देऊ शकत नाही.
 • अशा अनेक गोष्ट असतात ज्या करायला आपल्याला आवडत असते पण काही ना काही कारणामुळे, कामात अति व्यग्र झाल्यामुळे आपण त्या गोष्टींना वेळ देऊ शकत नसतो. 
 • चित्र काढणे, रांगोळी काढणे, पुस्तक वाचन अशा अनेक गोष्टी. या गोष्टी करायला सुरुवात केली, तर त्यामध्ये मन रमेल आणि आपली सोशल मीडियाबद्दल वाटणारी ओढ आपोआप कमी होईल.

८.  एखादा पार्ट टाईम जॉब किंवा नवीन काहीतरी शिकण्याचा कोर्स लावा: 

 • सोशल मीडियाचे व्यसन सुटल्यावर रोज किमान २ ते ३ तास तरी वेळ मिळेल. 
 • या वेळेचा सदुपयोग आपण एखादा पार्ट टाईम जॉब किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी करू शकता.

९.  ट्रोल्सकडे दुर्लक्ष करायला शिका: 

 • बऱ्याचदा असं होत की आपण सोशल मीडियावर असताना एखादी ट्रोलिंग पोस्ट समोर येते आणि आपण त्याबद्दलचा आपला संताप त्याच्या कंमेंट्स मध्ये लिहितो, मग त्यावर आणखी कोणीतरी काहीतरी लिहीतं, मग त्याला आपण उत्तर देतो आणि यामुळे अकारण आपला मुड खराब होतो, चिडचिड वाढते, उगाच अस्वस्थ वाटू लागतं. 
 • हे सर्व टाळण्यासाठी समोर येणाऱ्या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करणे हे कितीतरी त्रासांवरच अत्यंत प्रभावी उत्तर आहे.

१०. लोकांना, आप्तेष्टांना, मित्र-मैत्रीणींना प्रत्यक्ष भेटा: 

 • सोशल मीडियावर सतत कनेक्ट राहिलेले आहोत पण आज आपण खरंच आपल्या जिवलगांपासून दूर झाले आहोत. 
 • आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना भेटा, त्यांना वेळ द्या त्यातून मिळणारा आनंद इतर कशातही नाही मिळणार.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Social Media Addiction in marathi , mobile addiction kase sodwal marathi mahiti 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!