Reading Time: 4 minutes

1 जानेवारी 2025 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात आपण कदाचित काही आर्थिक चुका अनावधानाने केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. आपण मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही, असा संकल्प करूया. 

आपल्याला सहज हाताशी येईल, अशा ठिकाणी ही माहिती जपून ठेवा. यात एखादी अंतिम तारीख दिली असली, तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही. तसंच दंड भरावा लागून आपलं आर्थिक नुकसान होणार नाही.या वर्षातल्या काही लक्षात ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे- 

  • 31 जानेवारी 2025 /15 फेब्रुवारी 2025/28 फेब्रुवारी 2025 :
  • आर्थिक वर्ष 2024-2025 येत्या काही दिवसात संपेल. आपल्या अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची हीच वेळ आहे. 
  • आपण कर मोजण्याची जुनी पद्धत स्वीकारली असेल, तर काही गुंतवणूक /खर्च याची वजावट घेतल्यामुळे आपला आयकर कमी होऊ शकतो.पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक/ खर्च केले असतील तर त्याची सूचना विहित नमुन्यामधे, मालकाला द्यावी लागते. 
  • आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरच्या तीन पैकी कोणतीही अथवा एक वेगळीच अंतिम तारीख असू शकते. ती माहीती करून घेऊन पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक /खर्च केले असल्यास पुराव्यासह सदर तारखेच्या आत सादर केला तर त्याचा विचार करून अंतिम आयकर आकारणी होईल. 
  • हा फॉर्म आणि त्याचे पुरावे देण्यापूर्वी जर आपला कर अतिरिक्त कापला असेल तर तो समायोजित केला जाईल, तरीही अतिरिक्त कर कापला असल्यास तो आपणास मालकाकडून परत मिळणार नाही, तर विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून आयकर खात्याकडून परत मिळवावा लागेल. 
  1. 1 फेब्रुवारी 2025 : 
  • हा सन 2024-2025 चा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस. या वर्षी नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आपला पूर्ण अर्थसंकल्प 23 जून 2023 रोजी सादर केला. त्याचवेळी त्यांनी विद्यमान आयकर कायदा बदलून नवीन प्रत्यक्ष कर संहिता लागू केली जाईल असा संकल्प केला होता. त्यानुसार सदर नव्या कर धोरणाचा आराखडा सरकारने जाहीर केला असून त्यात प्रस्तावित केलेले बदल नवीन आर्थिक वर्षांपासून आमलात येतील, असे सांगण्यात येत आहे. त्यातील काही बदलांना मोठा विरोध होऊ शकेल. 
  • कदाचित काही सवलती अजून एक दोन वर्षं चालू राहतील, हे समजून घेऊन कोणते अंतिम बदल होतात ते पाहून आपल्या गुंतवणूक धोरणात नव्या आर्थिक वर्षात बदल करावा लागेल. 

महत्वाचे :वैयक्तिक पूर्वग्रहांचा सिद्धांत 

  1. 15 मार्च 2025/ 31 मार्च 2025: 
  • ज्या लोकांना चालू आर्थिक वर्षात अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो, त्यांनी 15 मार्च पर्यंत 100% आणि त्यानंतरच्या व्यवहारांवरील पूर्ण आयकर 31 मार्चपर्यंत भरणं अपेक्षित असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात. 
  1. 31 मार्च 2025 : 
  • चालू आर्थिक वर्षात (सन 2023- 2025) आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक/खर्च करण्याचा हा शेवटचा दिवस. 
  • (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती) या दिवशी गुंतवणूक किंवा खर्च करून तो आयकर विवरणपत्रात दाखवून कर सवलत मिळवता येईल. जुन्या पद्धतीने कर आकारणी मान्य असलेल्या लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो. 
  • अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास त्या देशांशी असलेल्या दुहेरी कर आकारणी धोरणानुसार तेवढ्या कराची सूट भारतात मिळते.
  • अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे. त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भारतीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील.

 

  1. 01 एप्रिल 2025 
  • नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, (सन 2025- 2026) नवीन वर्षात आपलं उत्पन्न किती होईल? नवीन थेट करप्रणाली लागू झाला तर किती कर लागेल? तो वाचवण्यासाठी काय काय तरतुदी आहेत याबाबत प्राथमिक विचार करू शकता. 
  • त्याप्रमाणे आपण मागच्या आर्थिक वर्षाचं म्हणजेच सन 2024-2025 चं आयकर विवरणपत्र भरू शकता त्यासाठी आवश्यक माहितीची जमावजमाव करायला सुरूवात करा म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी दमछाक थांबेल.
  •  जिथं-जिथं आपली मुळातून कर कपात होऊ नये, असं वाटत असेल तर आवश्यक तिथं  15 G/H फॉर्म भरून द्यावेत म्हणजे कर कापला जाणार नाही. 
  1. 15 जून 2025: 
  • सन 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख आहे. 
  • कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागच्या आर्थिक वर्षातल्या उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणाऱ्या फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची ही अंतिम तारीख आहे. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल. 
  1. 31 जुलै 2025:
  • ज्या करदात्यांना आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे लागत नाही, त्यांना मागच्या आर्थिक वर्षाचं म्हणजेच सन 2024- 2025 चे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची ही अंतिम तारीख आहे. ही तारीख मागील तीन वर्षांत बदलली नसल्याने योग्य मुदतीत विवरणपत्र दाखल करावे. 
  1. 15 सप्टेंबर 2025: 
  • सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची ही शेवटची तारीख आहे. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे. 
  1. 30 सप्टेंबर 2025:
  • ज्या करदात्यांना आपल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागते, त्याच्यासाठी आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची ही शेवटची तारीख आहे. ही तारीख अनेकांचे लेखापरीक्षण पूर्ण होत नसल्याने वाढवली जाते.
  •  पण भविष्यात ती वाढवली जाईलच याची खात्री देता येत नाही. तेव्हा अशा सर्वच करदात्यांनी याच मुदतीत विवरणपत्र दाखल करावे. 
  1. 30 नोव्हेंबर 2024
  • पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची ही अंतिम तारीख आहे. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते. मोबाईल अँपवरून आता हयात असल्याचा दाखला देणे सुलभ झाले आहे.
  1. 15 डिसेंबर 2025: 
  • सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची ही अंतिम तारीख आहे. या आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे. 
  1. 31 डिसेंबर 2025:
  • आर्थिक वर्ष 2024-2025 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची ही शेवटची तारीख आहे. 
  • 31 जुलै 2025 अथवा 30 सप्टेंबर 2025 किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी किंवा तारखेनंतर विवरणपत्र दाखल केले असल्यास, सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची ही अंतिम तारीख आहे. या मधील काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल. 

 

  वरील तारखांबाबत काही शंका असल्यास जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावं. याशिवाय अर्थसंकल्पामधल्या तरतुदींनुसार किंवा आयकर खात्याने घेतलेल्या निर्णयांमुळे किरकोळ बदल होऊ शकतात, त्यांची पुरेशी पूर्वसूचना देण्यात येते. 

 

©उदय पिंगळे 

अर्थ अभ्यासक 

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.