Charitable Trust Registration
Reading Time: 2 minutes

Charitable Trust Registration

आजच्या लेखात आपण धर्मादाय संस्थां म्हणजेच चॅरिटेबल ट्रस्टच्या नोंदणी संदर्भातील (Charitable Trust Registration) माहिती घेणार आहोत. आयकर कायद्याअंतर्गत या संस्थांनी ३० जून २०२१ पर्यंत पुन्हा नोंदणी आवश्यक आहे.

रामराम पाटील !”

नमस्कार गुरूजी

कसली गडबड चालली आहे ?”

अहो मास्तर, गावचा उरुस आहे ना, पुढच्या महिन्यात पंचाची मिटींग लावली आहे

खरंच की ! गावच्या ट्रस्टचे पण तुम्ही मुखीया !

होय मास्तर, गेल्या धा वर्षापासून आपल्या ट्रस्टचं काम चालू आहे. काही खंड नाही

अरे, बरं आठवलं, रेणू म्हणत होती आपला ट्रस्ट रजिस्टर केला पाहिजे ३० जुन पर्यंत

मास्तर अहो असं काय करता. गेली १० वर्ष आपण नोंदणीशिवाय काम करु का?

तसं नाही, रेणू म्हणाली…”

अरे हो, ती सीए झाली आहे ना ! मग काहीतरी पॉईंट असेल.”

मास्तरांनी रेणूला फोन लावला आणि पाटलांनी चहाची ऑर्डर सोडली. काही वेळात चहा आला. पहिला घोट पिऊन होताच, रेणू अवतरली.

ये रेणू बाळा“, पाटील म्हणाले, आणि एक चहा मागवला.

नको चहा, काका“, रेणूने सांगितले.

सारखा कॅलरीचा विचार नका करु, तुम्ही मुली

सगळ्यांचा चहा घेऊन झाल्यावर रेणूने विषयाला हात घातला.

ट्रस्टला दोन रजीस्ट्रेशन लागतात, एक महाराष्ट्र विश्वस्थ कायदा किंवा धर्मदाय संस्थांचा कायदा, सोसायटीच्या नोंदणीचा कायदा अथवा कंपनी कायदा. यामुळे धर्मदाय संस्था न्यास, सोसायटी किंवा कंपनी म्हणून अस्तित्वात येते“.

हो, आपल्या गावची संस्था ट्रस्ट आहे“.

बरोबर, परंतु आयकर आकारणीपासून संपूर्ण माफी मिळावी म्हणून आयकर कायद्यानुसार नोंदणी करावी लागते.

होय रेणू, आपल्या ट्रस्टची तशीच नोंदणी झाली आहे.”

काका, आयकर कायद्याने नोंदणीचा कायदा संपूर्ण बदलला आहे. त्यानुसार करमुक्ती मिळविण्यासाठी १ एप्रिल २०२१ रोजी अस्तित्वामध्ये असलेल्या प्रत्येक धर्मादाय संस्थेला पुन्हा नोंदणी करावी लागते. यामध्ये काही अपवाद नाही. सार्वजनिक न्याय, सोसायटी, अगर कंपनीची धर्मदाय कार्य करीत आहे. आणि ३१ मार्च २०२१ रोजी आयकर विभागाकडे नोंदणी झाली असेल तरीदेखील ३० जून २०२१ पर्यंत पुन्हा नोंद घ्यावी लागेल यामधून कोणासही सवलत नाही.”

यानंतर रेणूने, सार्वजनिक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांना आयकर माफ करून घेण्यासाठी झालेले इतर कायद्यामध्ये बदल सांगितले.

चॅरिटेबल ट्रस्ट, आयकर माफी आणि इतर कायद्यामध्ये बदल:

  • बदललेल्या कायद्यानुसार १ एप्रिल २०२१ रोजी अस्तित्वामध्ये असलेल्या आणि आयकर कायद्यानुसार करमुक्तीसाठी नोंदणी घेतलेल्या सर्व धर्मादाय संस्थांना एप्रिल २०२१ ते ३० जून २०२१ या मुदतीमध्ये पूर्वनोंदणीसाठी फॉर्म १०ए मध्ये अर्ज करावा लागेल.
  • नव्याने सुरू केलेल्या धर्मदाय संस्थांनादेखील वर्ष सुरू होण्यापूर्वी तीस दिवस आधी अशाच प्रकारे फॉर्म मध्ये अर्ज करावा लागेल.
  • पूर्वीपासून संस्था अस्तित्वामध्ये आहे पण आयकर कायद्याखाली करमाफीसाठी नोंदणी नसली आणि करमुक्तीचा लाभ हवा असल्यास असला फॉर्म क्र. १०ए मध्ये अर्ज करावा लागेल.
  • अर्ज संगणकीय माध्यमाने करावयाचा आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
  • ३१ मार्च २०२१ रोजी आयकर कायद्यानुसार करमाफीसाठी संस्था नोंदणी असल्यास त्या संस्थेस काही तपासणी करता नोंदणी दिली जाईल. ही नोंदणी पाच आर्थिक वर्षासाठी असेल. त्यानंतर परत अशी नोंदणी करावी लागेल. ज्यामुळे करमाफीचा लाभ सुरू राहील
  • नव्याने नोंदणी घेणाऱ्या संस्थांना तसेच जुन्या संस्थांना आयकर माफीची सवलत नसल्याने नोंदणी घ्यायची असल्यास फॉर्म क्र. १० ए मध्ये आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी एक महिना अगोदर नोंदणीसाठी आवेदन करावे. अशा संस्थांची नोंदणी ही तात्पुरती असेल.  
  • तीन वर्षांसाठी कार्य सुरू केल्यानंतर किंवा मुदतीअंती, जी घटना आधी घडेल त्यापूर्वी कायम नोंदणीसाठी आवेदन करावे लागेल. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आयकर विभाग आकारत नाही.

 “म्हणजेच रेणूबाई, आपल्या संस्थेला ३० जूनपूर्वी नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल तर !”

 मध्येच गुरुजी म्हणाले, “हेच तर सांगत होतो मी पाटील भाऊ !

 “गुरुजी पण तुमची लेक सीए आहे आणि तिनं झकास समजावलं, डोसक्यात शिरलं.

चला तर, रेणूबाई आत्ताच मुहूर्त करू अर्ज करायचा” 

बराय काका, तीन वाजता लॅपटॉप घेऊन येते ट्रस्टच्या ऑफिसात.

निघतो पाटील भाऊ, रामराम.

रामराम !

सीए चंद्रशेखर चितळे,

पुणे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Charitable Trust Registration Marathi mahiti, Charitable Trust Registration in Marathi, Charitable Trust and Income Tax Marathi Mahiti, Charitable Trust Income tax rules in Marathi, Charitable Trust Income tax rules Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.