आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स
आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जतन करून ठेवा. कोण जाणे कधी उपयोगी पडतील. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जग जवळ येत आहे. अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी आता सोप्या बनत चालल्या आहेत. अनेक प्रश्न एका क्लिकवर किंवा एका कॉलवर चुटकीसरशी सोडवले जात आहेत. कर हा तसा थोडा किचकट विषय आहे. त्यामुळे करदात्याच्या मनात टॅक्स, रिटर्न, रिफंड, पॅन (PAN) व टॅन (TAN) इ. च्या प्रक्रियेबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने प्रत्येक विषयाला अनुसरून वेगवेगळ्या हेल्पलाईन आणि टोल फ्री क्रमांक सुरु केले आहेत.
-
करदात्याला त्याच्या टॅक्स, पॅन (PAN) व टॅन (TAN) या संबंधित सर्वसाधारण प्रश्नांसाठी आयकर खात्याचा टोल फ्री नंबर १८००-१८०-१९६१ हा आहे. या नंबरवर सोमवार ते शनिवार सकाळी ८.०० ते रात्री ८०० या वेळेत कधीही संपर्क करुन आपल्या शंकांच निरसन करुन घेता येईल.
-
पॅन (PAN) व टॅन (TAN) च्या ऑनलाइन अर्जासंबधीतील (NSDL) समस्या, सुधारणा ई साठी ०२०- २७२१८०८० या नंबरवर सकाळी ७.०० ते रात्री ११.०० या वेळेत आठवडाभरात कधीही संपर्क करता येईल.
-
इन्कम टॅक्स रिटर्नच्या ‘इ- फायलिंग’ संदर्भातील किंवा वेबसाईटच्या ‘लॉग इन’ संदर्भातील अडचणींसाठी इ-फायलिंग हेल्पडेस्क (मदत विभाग) ०८०-४६१२२००० व टोल फ्री क्रमांक १८०० १०३ ००२५ या क्रमांकांवर सोमवार ते शनिवार सकाळी ९.०० ते रात्री ८.०० या वेळात संपर्क करता येईल.
-
ITR संदर्भातील प्रश्न, रिफंड आणि दूरुस्ती संदर्भातील अडचणी यासाठी १८०० १०३ ४४५५ किंवा ०८०-४६६०५२०० या क्रमांकांवर सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.०० ते रात्री १०.०० या वेळेत संपर्क करता येईल.
-
TRACES (TDS Centralized Processing Centre) संदर्भातील समस्या व माहितीसाठी, टीडीएस (TDS) स्टेटमेंट, फॉर्म १५ सीए (CA), फॉर्म १६, फॉर्म २६ AS, साठी १८००-१०३-०३४४ किंवा १२०-४८१४६०० या क्रमांकांवर सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत संपर्क करता येईल. किंवा [email protected] या ई -मेल आयडीवर मेल करता येईल. यासाठीचे ग्राहक सेवा केंद्र, गाझियाबाद- उत्तरप्रदेश येथे आहे.
-
याशिवाय जर आयकर अधिकाऱ्यांसंदर्भात कोणतीही तक्रार असेल, तर आयकर विभागाच्या वेबसाईटवर यासाठी प्रत्येक राज्यानुसार संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
-
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल काही तक्रार असेल, तर तुम्हाला तुमची तक्रार शासनाकडेही करता येते. यासाठी https://pgportal.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमची तक्रार शासनाकडे दाखल करु शकता.
- तसंच, जर तुमच्याकडे काळ्या पैशाविरुद्ध काही माहिती असेल, तर ती माहिती शासनापर्यंत पोचविणे हे तुमचे कर्तव्य आहे. सदर माहिती [email protected] या ई-मेल आयडीवर मेल करुन तुम्ही शासनाला कळवू शकता.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Income tax helpline nos, Tax helpline numbes, Income Tax Dept Helpline numbers