Stock Market Investment
https://bit.ly/3oGgjSE
Reading Time: 3 minutes

Stock Market Investment – ५ महत्वाच्या स्टेप्स

शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market Investment) करण्याचा कोणताही ठराविक असा ‘फॉर्म्युला’ नाहीये. पण या लेखात दिलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीच्या काही महत्वाच्या स्टेप्स विचारात घेतल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल. कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी त्या शेअर्सबद्दल अथवा त्या कंपनीबद्दल प्रथम माहिती घेणे गरजेचे आहे. कंपनीबद्दल माहिती घेणे म्हणजे कंपनीचा व्यवसाय कसा कार्यरत आहे आणि कोणत्या प्रकारचे बदल, राजकीय निर्णय, जागतिक घडामोडी यांचा कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होईल याबद्दलची माहिती मिळवणे.

हे नक्की वाचा: आयपीओ गुंतवणूक करताना विचारात घ्या या महत्वाच्या गोष्टी

Stock Market Investment: ५ महत्वाच्या स्टेप्स 

१. वाचन –

  • वॉरेन बफेट, चार्ली मुंगेर म्हणतात की त्यांचे मुख्य काम दररोज शेकडो पाने वाचणे आहे!
  • मोतीलाल ओसवालचे अध्यक्ष श्री रामदेव अग्रवाल हेही पट्टीचे वाचक म्हणून ओळखले जातात.
  • यावरून आपल्याला एक तर समजले असेल की, शेअर बाजाराबद्दल तुम्ही तुमचे ज्ञान वाढवणे गरजेचे आहे. 
  • यासाठी दररोज इकॉनॉमिक टाइम्सचे वर्तमानपत्र वाचायचे. मनीकंट्रोल.कॉम नेहमी तपासत राहायचे. दररोज पुस्तके वाचा.
  • बिझनेस इनसाइडर इंडिया, ब्लूमबर्ग, गूगल, क्वार्ट्ज, ब्लूमबर्गक्विंट, गूगल न्यूज, मनीकंट्रोल.कॉम यासारख्या ऑनलाईन बातम्या वाचा.

२. बचत –

  • गुंतवणूक करायची म्हणजे सर्वात महत्वाचा पैसा! त्वरित बचत करायला सुरुवात करा. 
  • जर आतापर्यंत काहीच बचत केली नसेल तरी आता सुरू करा. 
  • बचत म्हणजे आपल्याला नेमके, बचत = उत्पन्न – खर्च असे सांगितले जाते, मात्र खरे पाहता खर्च = उत्पन्न – बचत असे असायला हवे. 
  • याचाच अर्थ प्रथम बचत आणि मगच खर्च! या पद्धतीने प्रत्येक महिन्याला बचत करायला सुरुवात केली, तर बचत व्हायला सुरुवात होईल.
  • बिल ॲकमॅनचा एक खूप छान विडिओची लिंक इथे देत आहोत ज्यामुळे आपल्याला स्टॉक एक्सचेंज मधील व्यवसायाची सुरुवात शून्यापासून सुरू होऊन एका लिस्टेड कंपनीमध्ये कशी होते हे समजेल. (https://www.youtube.com/watch?v=WEDIj9JBTC8)

विशेष लेख: शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी आणि कशासाठी?

३. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यामुळे होणारे फायदे – 

गुंतवणूकदाराला शेअर्स गुंतवणुकी मुळे प्रामुख्याने दोन गोष्टींचा फायदा होऊ शकतो.

कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशन:  

  • आपण जर १०० रुपयांनी एक शेअर खरेदी केला तर, ५ वर्षांनंतर कंपनीच्या कमाई मध्ये आणि व्यवसायाच्या विस्तारामध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे त्याची किंमत १००० रुपये होते. 
  • याचाच अर्थ इथे आपल्याला १०००% नफा मिळतो.

डिव्हिडेन्ड्स: 

  • समजा तुम्ही १०० रुपयांचे बॉन्ड किंवा कर्जरोखे (debenture) खरेदी केलेत, जे १० वर्षांसाठी ९% परतावा देतील आणि १० वर्षांनंतर कंपनी हे बॉण्ड रु. १५० ला परत घेते. यामध्ये तुमची कमाई ५० (१५० – १००) + ९० (१० वर्षात १०० पैकी ९%) – ६० (दर वर्षी सरासरी महागाई ६%) = ८० रुपये. आपला नफा येथे ८०% असणार आहे. 
  • आपल्याला एक लक्षात आलेच असेल की, बाँड्सच्या सुरक्षित स्वरूपामुळे बॉन्ड्सचा नफा मर्यादित असतो. तेच शेअर्स मध्ये मात्र अमर्यादीत नफा असतो. मात्र जर एखादी कंपनी तोट्यात गेली, तर बॉन्ड धारकांना प्रथम भरपाई/पैसे दिले जातात. 
  • दुसरीकडे शेअर्स मध्ये ज्याप्रमाणे अमर्यादीत नफा असतो त्याच प्रमाणे अमर्यादीत जोखीम देखील असते. अर्थातच शेअर्स होल्डरना बॉन्ड धारकांनंतर दुसर्‍या क्रमांकावर भरपाई दिली जाते.   
  • सन १९८० मध्ये विप्रो आयपीओमध्ये केलेली १० हजार रुपयांची गुंतवणूक आज 535 कोटीं पेक्षा जास्त असेल. यावरती काही बोलायची गरज नाही, हे आकडेच सर्व काही सांगतात. 
  • अर्थात शेअर मार्केट म्हणजे नेहमीच असे सगळे काही छान छान होत नसते कधी कधी तर गुंतवणूक केलेल्या शेअर्सची ९९% रक्कम सुद्धा गमवावी लागते.

४.शेअर्सवर परिणाम करणारे घटक- 

शेअर मार्केट मध्ये कंपनीच्या शेअर्सवर मुख्यतः दोन गोष्टींमुळे परिणाम होतात,

  1. गुंतवणूकदारांची भावना (जी की कोणत्याही प्रकारे प्रमाणित केली जाऊ शकत नाही)
  2. सकारात्मक किंवा नकारात्मक बातम्या (जसे की कंपनीचा चांगला किंवा वाईट निकाल, कर्मचार्‍यांचा संप इत्यादी. चांगल्या आणि वाईट बातम्या मोजल्या जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला नक्कीच यावरून गुंतवणूकीच्या अनुषंगाने निष्कर्ष काढता येतो.)

महत्वाचा लेख: गुंतवणूक करताना या मूलभूत चुका टाळा 

५. सुरुवात कशी करायची –

  • कोणताही व्यवसाय आणि त्याचे शेअर्स याबद्दल आपल्याला नेहमीच माहिती मिळत असते.  
  • आपण रोज वर्तमानपत्र वाचतो आणि स्थानिक तसेच जागतिक घडामोडींची नियमित माहिती मिळवतो.
  • एखाद्या बातमीच्या अनुषंगाने आपल्याला शेअर्सवर कसा परिणाम होऊ शकतो, हे देखील समजू शकते. 
  • यासाठी डिमॅट खाते उघडावे लागते. 
  • डिमॅट खात्यासाठी पुढील कागदपत्रे लागतात –
    •  पॅन कार्ड 
    • आधार कार्ड
    • सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
    • पैसे
  • डिमॅट खाते उघडण्यासाठी वेगवेगळे ब्रोकर असतात. त्यापैकी आपण कोणत्याही प्रस्थापित ब्रोकर निवडू शकता. 
  • वार्षिक देखभाल शुल्क, सेवा शुल्क, डिलिव्हरी आणि इंट्राडे व्यापार शुल्क यासारखे शुल्क ब्रोकरमार्फत आकारले जातात. याबद्दल सविस्तर माहिती करून घ्या. 

अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. 

– आदित्य कोंडावार 

96209 18600

(आदित्य कोंडावार हे शेअर मार्केट विश्लेषक असून गुंतवणुकीविषयी सल्ला देणारी JST Investment या फर्मचे संस्थापक आहेत. त्यांना संपर्क करण्यासाठी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधा.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…