Reading Time: 2 minutes
- मध्यमवर्गीय माणूस कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी हैराण असतो. त्याचं कायम कशाचंतरी नियोजन सुरू असतं, जमेल तशी त्याची पैशांची बचत सुरू असते. या मध्यमवर्गीयांचा कायम एका प्रश्नावर काथ्याकूट होत असते, तो म्हणजे त्यांना भरावा लागणारा आयकर अर्थात इन्कम टॅक्स. कमीतकमी कर भरावा लागावा असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
- सध्या सरकारने निम्न मध्यमवर्गीय माणसाला अडीच लाख उत्पन्नापर्यंत कर भरण्यापासून सूट दिली आहे. सध्या निवडणूकीचे दिवस सुरू होत आहेत. सरकारला मध्यमवर्गीयांची आठवण कायम निवडणूकीच्या काळातच येत असते. ती आताही आलेली आहे याचे संकेत मिळत आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात अरुण जेटली यासंबंधी घोषणा करणार असा कयास आहे.
- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवडणूकीच्या काळात मध्यमवर्गीय बलाढ्य वोट बँकेला खुश करण्यासाठी कर रचनेची सद्यस्थिती संपूर्णपणे बदलण्याचा विचार करताहेत.
- अडीच लाख पर्यंत उत्पन्न असताना मिळणारी कर सूट आता पाच लाखांपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे.
- अडीच ते पाच लाख उत्पन्न असता ५ टक्के आयकर भरावा लागतो. ५ ते १० लाख उत्पन्न असता १० टक्के आयकर भरावा लागतो. दहा लाखांहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के आयकराची तरतूद आहे.
- अडीच लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त आहे. ते आता पाच लाखपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याकडे सरकारचे पावले पडताहेत. (पाच लाख) पाऊले चालती करमुक्तीची वाट..
- याशिवाय, मागील वर्षी ५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी १५ हजार तर वाहतूक खर्चासाठी १९,२०० रुपयांचा भत्ता रद्द करून थेट २० हजारांच्या कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. आता निवडणूकीच्या दिवसांत हा निर्णयसुद्धा रद्द करून पुन्हा एकदा आरोग्य भत्ता (Medical Reimbursement) आणि वाहतूक भत्ता (Travelling Allowance) सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला खप दिलासा मिळणार आहे.
अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी | अंतरिम अर्थसंकल्पानंतर | |
करमुक्त उत्पन्न (Income) | रु. २,५०,०००/- पर्यंतचे उत्पन्न (Income) करमुक्त | रु. ५,००,०००/- पर्यंतचे उत्पन्न (Income) करमुक्त |
कराचा दर (Tax Rate) | ||
1. रु. २,५०,०००/- पेक्षा कमी | – | – |
2. रु. २,५०,०००/- ते रु.५,००,०००/- | ५% | – |
वैद्यकीय खर्च व वाहतूक खर्च | २०,०००/- | आरोग्य भत्ता – रु. १५,०००/-
वाहतूक भत्ता – रु.. १९,२००/- |
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2HcUNnm )
मार्चएंड पूर्वी आयकरासंबंधित करायच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी, आयकर खात्याची ई-प्रोसिडींग सुविधा
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
(Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा.)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :