Reading Time: 2 minutes
आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस
आयकर विवरणपत्र अचूक भरण्याच्या दृष्टीने फॉर्म २६/ ए एस याचे महत्व आपल्याला माहीती आहेच. यामध्ये-
- करदात्यांच्या उत्पन्नातून मुळातून कापून घेतलेला कर,
- त्यांनी विविध ठिकाणी भरून दिलेले १५/ जी किंवा १५/ एच फार्म त्यामुळे मिळवलेले करकपात न केलेले व्याज,
- जर तुम्ही विक्रेते असाल तर नियमानुसार मुळातून कापलेला कर,
- भरणा केलेला जसे की अग्रीम कर, मुळातून कापलेला कर,
- मुळातून जमा केलेला कर यासंबंधीची माहिती, मिळालेला कर परतावा,
- मोठया रकमेच्या व्यवहारांची माहिती,
- करदात्यांची आयकर नियमानुसार केलेली करकपात,
- अचल मालमत्तेची विक्री केल्यामुळे मुळातून झालेली करकपात,
- मुळातून करकपात मोजण्यात झालेली चूक इत्यादी गोष्टींची थोडक्यात पण नेमकी माहिती असते.
- ही सर्व माहिती एकत्रित असल्याने एकूण उत्पन्नाची अचूक मोजणी करण्यास उपयोग होतो. यात काही तफावत असेल, तर त्याच्याशी संबंधित व्यक्तीच्या लक्षात आणून देऊन त्यात दुरुस्ती करता येते.
- त्यामुळे फार्म २६/ ए एस ला वार्षिक एकत्रित कर विषयक पत्र (Consolidated Tax Credit Statement) असे म्हणता येईल.
नवीन फॉर्म २६ / ए एस
- सन २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सादर करीत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या फॉर्म मध्ये सुधारणा करून तो वार्षिक कर विषयक पत्र स्वरूपात न राहता त्यात रियल इस्टेट, भांडवल बाजारातील व्यवहाराच्या माहितीचा समावेश असेल असे सांगितले होते.
- यामुळे तो अधिक पारदर्शक होऊन संभाव्य करचोरी टाळता येईल.
- त्यामुळे नवीन स्वरूपातील बदललेला फॉर्म सर्व समावेशक वार्षिक माहिती व्यवहार पत्रक होईल.
- आयकर कायदातील २६/ ए एस ची तरतूद असलेले कलम २०३/एए बदलून त्या जागी २८५ / बीबी टाकण्यात आले आहे.
- यामुळे त्यात पूर्वीच्या माहिती बरोबरच चल अचल मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारांची माहिती दिली जाईल.
- तसेच मोठे व्यवहार ज्याच्या ज्यांच्यामार्फत होतात त्यांना हे व्यवहार कोणत्या व्यक्तीसाठी केले याचा तपशील आयकर खात्यास विहित नमुन्यात व कालावधीत द्यावा लागेल.
- पूर्वीप्रमाणेच यातील तपशील व आपली माहिती यात तफावत असल्यास ती आपणास दुरुस्त करून घेता येईल, यामुळेच आता अधिक पारदर्शकता येऊन हा फॉर्म म्हणजे वार्षिक करविषयक पत्र न राहता आपले वार्षिक व्यवहार माहिती पत्रक (Consolidated Tax Information Statement) होईल.
- याप्रमाणे केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने (CBDT) कायद्यातील बदल २१ मे २०२० रोजी राजपत्रात जाहीर केले असून ते आज १ जून २०२० पासून अमलात येतील.
- सर्व माहिती एकत्रितपणे असल्याने करदात्यास आयकर विवरण पत्र भरणे तर आयकर विभागास त्याची जलद तपासणी करून कारवाई यामुळे सोईचे होईल.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Form 26AS new rules in marathi, Form 26AS che navin niyam marathi
Share this article on :